भावनांतून मुक्ती ---- क --- आजची समाजाची अवस्था अशीच आहे. माणसाला जसे मन म्हणजेच त्याचे सूक्ष्म शरीर असते तसे समाजाला सुद्धा मन असते त्याला समाजमन म्हणतात. समविचारी माणसे एकत्र येतात व त्यांचा गट बनतो. अशा अनेक गटांचा समाज बनतो. त्यामुळे ज्या एका समान विचारांनी तो गट बनतो त्यांचे एकत्रित विचार हे त्या गटाचे मन असते. पण त्यातही व्यक्तिगत विचारांचे मोहोळ त्याच्या भोवती असतेच. असतेच त्यामुळे असे गट स्वतःच संभ्रमावस्थेत असतात. कारण एकच एक विचार निश्चित नसतो प्रत्येक माणूस वेगवेगळ्या विचाराने म्हणजेच उद्देशाने एकत्र आलेला असतो त्यामुळे असे समाज गट वरवर जरी एक दिसले तरी आतून भंगलेलेच असतात. कारण त्यापैकी कोणाचाच स्वार्थ सुटलेला नसतो, आणि तो हि वेगवेगळा असतो. अगदी देवाधर्माच्या नावाने निर्माण झालेल्या गटांची सुद्धा ह्यापेक्षा वेगळी स्थिती नसते. नाव देवाचे आणि समस्या भौतिक अशी ह्यांची वस्तुस्थिती असते. त्यामुळे यश येत नाही. देवाच्या दारात गरीब भिकारी असतात तर मंदिरात श्रीमंत भिकारी असतात जो मागतो तो भिकारी नाहीका ?? देव कुणालाच नको असतो त्याने आपल्यासाठी काहीतरी करावे आपले भौतिक भोग पुरवावेत हि भिक मागायला माणूस त्याच्या कडे जातो.
No comments:
Post a Comment