भावनांतून मुक्ती ---- ड --- वास्तविक देवाकडे जाण्याची माणसाला काहीच गरज नाही कारण तो तर सर्वत्र आहेच. अहो सर्वत्र कशाला आपल्या आतही आहे. मग शोधायचा कसा? कशाला? आणि कुठे?
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे कि मुक्ती हवी असेल तर देवांनाही मानव म्हणून जन्म घ्यावा लागेल. म्हणजे अलीकडे positive विचार करा हे सर्वदूर कानीकपाळी ओरड चाललेली आपल्याला ऐकू येते. पण ईश्वरा बद्दल बोलायचे झाले तर हे नाही हे नाही असेच बोलावे लागते कारण तो पंचा न्यानेन्द्रीयानी जनता येत नाही. कामेंद्र्यांच्या कक्षात येत नाही बुद्धीने आकलन होत नाही. मग अंदाज तरी कसा द्यायचा? मग भौतीकतली उदाहरणे देऊन नेती नेती म्हणजे न इति न इति म्हजेच हे नाही हे नाही असेच नाकार्थी सांगावे लागते.
खरे पारमार्थी संत म्हणतात जो देव दिसला असे म्हणतो तो एक तर खरोखरच संत असला पाहिजे नाहीतर वेद असला पाहिजे.
संत होणे हे देव होण्यापेक्षा हि कठीण आहे तो आपला विषय नाही मी म्हणेन ते जाणण्या पेक्षा आधी आपल्यातला माणूस शोधावा म्हणजे दुसऱ्यातील माणूस दिसायला लागेल. आपल्यातला माणसाने माणुसकीची ज्योत लावली तर देवाला ती दिसेल आणि तो ------- अरे तो बघा इथे माणूस दिसतोय म्हणत आपल्या कडे नक्कीच धा-आ-आ-आ-वत येईल. कारण त्यालाहि सध्या माणसे फारशी दिसत नाहीयेत. खरच देवच आज माणसाच्या शोधात आहे. त्याला दिसेल का एकतरी माणूस त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मद्ध्ये त्याला हवाय .............
No comments:
Post a Comment