Wednesday, 1 February 2012

भावनांतून मुक्ती ---- अ

भावनांतून मुक्ती ---- अ --- आता पुन्हा एकदा मुक्ती ह्या विषयाकडे वाळू मागे आपण मुक्तीचे ४ प्रकार/पायरया बघितल्या त्या वरून असे लक्षात येईल कि माणसाला कशा कशातून मुक्त व्हावेसे वाटते? तर ज्या ज्या ठिकाणी माणसाला पारतंत्र्याची जाणीव होते त्या त्या गोष्टीतून मुक्त व्यावेसे वाटते. भौतिकात आपल्यावर हक्क गाजवणाऱ्या  समाज गट अथवा व्यक्तीच्या पासून मुक्त व्हावे असे  माणसाला  वाटते. पण सूक्ष्मात काय?  मन हे माणसाचे सूक्ष्म शरीर आहे. त्यातील विकार  व भावनांचे सुद्धा आपण गुलाम होत असतो. पण हि जाणीव माणसाला फार उशिरा होते. हि जाणीव झाल्यावर  त्यांच्या कचाट्यातून सुटण्याची इच्छा होते. त्या क्षणी, त्या माणसाच्या जीवनात खऱ्या अर्थाने परमार्थाची  सुरुवात  होत असते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. दुसऱ्याने  लादलेल्या गुलामगिरीमुळे त्याच्यावर राग येणे त्याचा मत्सर वाटणे हे स्वाभाविक आहे. त्यातूनच तर क्रांती जन्माला येते. पण भावनांच्या बंधनातून सुटायचे असेल तर त्यांचा राग किंवा मत्सर  करून चालत नाही. कारण मागे जाऊन नीट विचार केला तर आपल्याला असे नक्की जाणवेल कि भौतिकात  सत्तेसाठी दुसरा माणूस आपल्याला गुलाम करू इच्छितो इथे मात्र त्या भावनांनी आपल्याला गुलाम केलेले  नसते तर आपणच अज्ञानाने त्यांची गुलामगिरी स्वखुशीने  स्वीकारलेली  असते.  असे आहे तर मग त्यांच्या गुलामगिरीतून सुटणे वास्तविक आपल्या हातात आहे. तरीही असे जाणवते कि माणसाचे मन सवयींचा गुलाम असल्यामुळे हि मानतील क्रांती करणे त्याला भौतिक  क्रांतीपेक्षा  जास्त अवघड जाते. 

No comments:

Post a Comment