भावनांतून मुक्ती ---- इ --- मुक्ती/गुरु/मी
आत्तापर्यंत आपण पाहिले कि माणसाला मुक्तीची जाणीव होणे ओढ लागणे आणि त्यासाठी वैचारिक प्रयत्न करणे हि पारमार्थिक लक्षण आहेत. बऱ्याच जणांचे असे मत आहे कि त्यासाठी गुरु लागतो. पण मी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आलो त्यांना विचारले तुम्ही ह्या गुरूंच्या कडे का जाता? त्यावर प्रत्येकांनी उत्तरादाखल जे सांगितले ते बहुतौंशी असे होते कि त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी अडचणी होत्या. त्या सुटाव्यात हि इच्छा घेऊन ते त्या गुरूंच्या कडे जायला लागल्यावर सुटल्या. असे सर्वसाधारण उत्तर होते. म्हणजे अडचणी ह्या बंधन निर्माण करतात हि सर्वसामांन्य आणि स्पष्ट अशी मानवी धारणा दिसते. ह्याचा दुसरा अर्थ असा निघतो मला उपभोग देही सुख हवे आहे भोग मात्र नकोत. म्हणजे संपूर्ण मुक्ती नकोच आहे. पण आव मात्र परमार्थाचा धार्मिकतेचा असतो हि मुल समस्या आहे.
परमार्थात तर म्हटले आहे कि त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी जाहला --- परमार्थाचा --- मुक्तीचा. म्हणजे मानवाला अनेक प्रकारचे भोग त्रास भोगावेच लागतात त्याचे प्रकार शास्त्रकारांनी केले आहेत. वर्गीकरण केले आहे. ते असे --- आधिभौतिक, आधिदैविक, अध्यात्मिक, म्हणजे ज्या प्रकारचे आपण पूर्वाआचरण केले असेल त्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला निसर्गनियमाने येतात. निव्वळ प्रतीक्र्याच नाहीत तर त्या भोग रूपाने भोगायलाच लागतात. त्याने माणूस इतका पोळला जातो कि त्याचे मी पण नष्ट होते. त्याक्षणी तो परमार्थाचा अधिकारी होतो. असे पारमार्थिक वचन आहे. आत्ता मी मुद्दाम अधिकारी शब्दाबद्दल लिहिणार आहे. आपण अधिकारी शब्द सर्व्सामान्ण्यातः सत्ता ह्या अर्थाने वापरतो. पण परमार्थी लिखाणात, विचारात, अधिकारी होत्ने ह्याचा स्पष्ट अर्थ ज्या गोष्टीची आपण अपेक्षा धरतो ती मिळायला आपण पात्र होणे. जी हवी ती सायुज्य मुक्ती मिळायला-लाभायला लायक, होणे असा आहे. म्हणून ह्या अधिकारी शब्दापासून फार सावध राहावे लागते कारण अधिकार म्हणजे मी आलाच म्हणजे अहंकार आलाच मग मुक्ती कुठची मिळायला? हा गुरु मी आणि मुक्ती ह्या त्रीपुतीतील विरोधाभास आहे ह्याची जाणीव करून देणे हे मला संयुक्तिक वाटले ---- निर्मम व्हावे शुभम भवतु.
No comments:
Post a Comment