Monday, 17 October 2011

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ८ वा
विधी १५ वा ------- ऐरणी पूजन / झाल ठेवणे, --- म्हणजे वराकडील सर्व ज्येष्ठ व्यक्तींवर जबाबदारी देणे.   
केव्हा करावा ------ विवाह होमानंतर.
आवश्यक व्यक्ती -- गुरुजी,  वधु-वरचे आईवडील, व दोघांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती ------------ वधूच्या आईवडिलांनी कन्यादानाची सांगता वाराकुलाची  वृद्धी व्हावी म्हणून उमम्हेश्वर व १६ दिव्यांची पूजा व ऐरणी दान करयचे असते. प्रार्थना झाल्यावर वधूच्या आईने क्रमाने वरच्या त्याच्या आईवडिलांच्या व वराकडील अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या मस्तकावर ब्लाउज पीस धरून त्यावर वडिलांनी दिव्याची परडी धरून झाल्यावर झाल (परडी) खाली ठेवायची वधूच्या आईने वरच्या आईला सौभाग्य वायन द्यावे. (ऐरणी पूजनाचा संकेत - वधूने १६ वर्ष नंतर माहेरी दीपपूजन करायचे असते. त्यालाच माहेर पूजन असे म्हणतात. तेव्हा वधूवरांनी वधूच्या माहेरी हि पूजा करून वधूच्या माहेरच्यांचा सन्मान करायचा) दुपारचे भोजन -- या वेळी वधु पित्याने वराकडील सर्वांना भोजनाचे निमंत्रण द्यावे. ऐरणी पूजनानंतर वराकडील वराचे आई वडील काका मामा मावश्या भाऊ आत्या आदि मानकर्यांचा आजी आजोबा यांचा योग्यतो मान करावा. दुपारचे भोजन करावे. वधु व वर व वराकडील मानाच्या व्यक्तींची खास पंगत, हि पंगत झाल्यावर वरच्या आई व मानाच्या अन्य व्यक्तींना सुपारी साखर व चांदीच्या लवंग देतात. विहिणीला साडी. व्याह्यांना चान्देचे भांडे वरच्या भाऊ, भावजय व अन्य मानाच्या व्यक्तींना योग्यतो मानसन्मान देतात. विशेष सूचना ---- उभय पक्षामध्ये जे ठरले सेल त्या प्रमाणे मानपान ऐरणी पूजनाचे वेळीच किंवा भोजनानंतर देतात.

विधी १६ वा -------- वधूची पाठवणी  
केव्हा करावा ------- लग्न मंडपातील हा शेवटचा विधी 
आवश्यक व्यक्ती --- वधु / वर, वरची बहिण करवली, वधूचे आई / वडील प्रत्येक वधूच्या आईवडिलांच्या आयुष्यातला गहीवार्णारा क्षण.
माहिती ------------- वधु-वरांना गौरीहाराजाव्ल बसवून वधूच्या आईने वधूची मालत्यांनी ओटी भरावी. दोघांच्या हातावर दही घालून खावयास सांगावे.  वराचे उपरणे व वधूचा शेला यांच्या टोकांची वरच्या करवलीने गाठ मारावी व वराकडून वधूकडील ज्येष्ट व्यक्तींचा यथाशक्ती मानपान करावा. वराने गौरीहराच्या मखरात असलेली देवी व लाडूगडू घ्यावा व वधूसह स्वग्रही निघण्यापूर्वी सर्वांना दोघांनी नमस्कार करावा. व सर्वांचा निरोप घ्यावा. गौरीची मूर्ती उचलल्यावर त्या ठिकाणी वरमातेने साडी ठेवावी. देवीजवळ पूर्वी ठेवलेले सौभाग्य वायन व यावेळी ठेवलेली साडी से सर्व वधूच्या मामीला द्यावे.

विघी १७ वा -------- वराचे वधूसह स्वग्रही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मी पूजन नाम क्षमी  पूजन, नाव ठेवणे 
केव्हा करावा ------- वधूसह वराचा ग्रह प्रवेश 
आवश्यक व्यक्ती --- वधु/वर वराकडील घरची नातेवाईक. मुलीची पाठ राखीन/ आईवडील  
माहिती ------------- ग्रह  प्रवेश  करतांना वधूने उंबरठ्यावर तांदळाने भरून ठेवलेले माप सांडवून मग घरात प्रवेश करावा. बरोबर आणलेल्या देवीची तांदूळ पसरून ठेवलेल्या ताटात ठेऊन पूजा करावी  त्याचवेळी ताटात नववधूचे सासरचे नाव ताटातील तांदुळावर लिहावे, व देवी व नाम लक्ष्मी या दोघींची पूजा करावी. देवीला नवा दागिना घालावा. पूजा झाल्यावर वधूचे नाव सांगून साखर/पेढा घ्यावा. वधूची सासूने ओटी भरावी. वधूवरांनी देवांना व उपस्थित ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. वराचे आईने सुनेला शालू द्यायचा असतो. तसेच अन्य दागीनही द्यायचा असतो. सुनमुख पाहणे --- या वेळी मुलाच्या आईने मुलगा व सून यांना आपल्या मांडीवर बसवून त्या दोघांचे आरश्यात तोंड पहावयाचे व दोघांना पेढा/ साखर भरवून तोंड गोड करायचे वरच्या आई वडिलांचा व काका मामा मावशी आत्या भाऊ भावजय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा (आजी आजोबा ) योग्यतो मानपान करायचा सातो. या वेळी आईला दिलेल्या साडीला पोट झाकण्याची साडी म्हणतात. हा मानपानाचा कार्यक्रम आटोपल्यावर / सुरु असतांना वधूवरांनी घरच्या ज्येष्ट व्यक्तींना नमस्कार करावा. पेढे वाटावेत सुवासिनींना हळद कुंकू लाऊन वधूचे सासरचे नाव सांगावे.

विघी १८ वा --------- सर्व कार्यक्रम आटोपल्यावर --- देव देवल उठवणे, सूप पाखडणे  
केव्हा करावा ------- घरी आल्यावर शेवटी समाप्ती -- पान आजकाल वधूच्या घरी करवयाचे हे सर्व कार्यक्रम हॉल वरच करतात. 
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी वधु/वर वराकडील घरची नातेवाइक आपापल्या घरी / अलीकडे एकत्र हॉलवर   
माहिती ------------- आता वधु -वरांकडे ठेवलेले देवक उठवणे आईवडिलांनी देवक उठवणे. वराकडे वधूवरांनी त्यांच्या आईवदिलान्सामावेत देवाकाच्या पुजेस बसावे. देवक उठल्या नंतर कार्य समाप्ती निमित्त गुरुजींनी सूप वाजवून कार्य समाप्तीची घोषणा करावी. गुरुजींनी वधु वरांच्या पित्यांना कार्याप्रीत्यार्थ नारळ व आशीर्वादाचे तांदूळ द्यावेत. वधु-वरांच्या पित्यांनी गुरुजींची दक्षिणा  देऊन त्यांची पाठवणी करावी. कार्य निमित्त आलेले पाहुणे स्वग्रही जाऊ शकतात. रात्री वधु-वरांची मीठ - मोहोर्या घेऊन द्रिष्ट काढावी

अशा रीतीने हे कार्य समाप्त समाप्त झाले ---- सर्व -----होतकरू---- तरुण तरुणींना हे वर्ष आपापल्या लग्नाच्या कार्याने संपन्न होवो. आपल्या सर्वांचे सहजीवन संसार सुखाचा आनंदाचा आणि समुद्धीचा होवो हिच  शुभेच्छा

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ७ वा
विधी १२  वा ------- कन्या दान 
केव्हा करावा ------- लग्नानंतर
आवश्यक व्यक्ती --- वधु-वर व वधूचे आईवडील .
माहिती ------------- आपल्या समस्त पूर्वजांना निरंतर सुख मिळावे म्हणून संकल्पपूर्वक, कन्येचे दान करावयाचे असते. (एखाद्या वस्तूवर असलेला अधिकार सोडून देऊन दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करणे म्हणजे दान होय.) कन्या दानाच्या निमित्ताने वधूपिता वधूवरांना संसारोपयोगी वस्तू देतो. समई तांब्या, फुलपात्र वगैरे (संध्येची पळी देऊ नये )
विशेष माहिती ---- कोणतेही दान करतांना देणाऱ्याचे हात वर पालथे व घेणार्याचे हात खालती उताणे असतात. इथे महत्वाचा फरक आहे वधूच्या वडिलांचे हात सर्वात खालती मद्ध्ये वधूचे हात आणि वरती वराचे हात आणि तीनही हात उताणे असतात. आणि पाणी सोडायला वधूची आई असते. ह्या मागचा हेतू असा आहे कि मुलगी हि वस्तू नव्हे. आईवडिलांनी तिचे जन्मापासून प्रेमाने पालन पोषण केलेले असते अश्या मुलीला उचलून देणे मनानी शक्यच नसते म्हणून तिचे वडील तिला आपल्या ओंजळीत घेऊन (तिचा हात ओंजळीत घेऊन) वाराला विनंती करतो कि तू हिला वर्चाय्वर माझ्या ओंजळीतून तुझ्या ओंजळीत अलगद उचलून घे. 

विधी १३ वा -------- कंकण बंधन 
केव्हा करावा ------- कन्यादानानंतर
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधू- वर 
माहिती ------------- सुत गुंडी, गाठीची हळकुंडे, वधूवरांनी कायम स्वरुपात एकमेकांच्या बंधनात पवित्र मानाने राहावे हा हेतू. विवाह होमाची तयारी झाल्यावर वराकडून वधूला शालू दागिने जोडवी विरोल्या मंगळसूत्र वगैरे द्यायचे असते ते आणून ठेवावे. ते पुढे विवाह होमाच्या आरंभी वधूला वरच्या आईने द्यायचे असते.
विघी १४ वा --------- विवाह होम  --------- ह्या होमांतर्गत एकूण ३ प्रमुख कार्य असतात. १ - लाजा होम-(अग्नीला लाह्या अर्पण करणे) २- सप्त पदी - पत्नी समवेत सात पाऊले चालणे व ३ - पाणिग्रहण - वधूचा हात वराने कायम स्वरूपासाठी स्वीकारणे.
केव्हा करावा ------- आताचे सर्व विधी कर्मानेच दिलेले आहेत
आवश्यक व्यक्ती --- गुरुजी, वधु/वर वधूचा भाऊ, सुवासिनी.
माहिती ------------- वधूच्या हातात वधूचा भाऊ लाह्या घालतो. नंतर वर आपल्या दोन्ही हाताने वधूची ओंजळ धरून त्या लाह्या अग्नीला अर्पण करतो. समृद्धीसाठी लाजा होम सांगितला आहे. वधूवरांनी लाह्यांच्या तीन आहुती द्याव्या. नंतर वधूचा कान पकडून, माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा असे सांगतो. वराने वधूच्या भावाला मान द्यावा शर्ट  पीस / पाकीट द्यावे. ७ पाऊले चालण्या मागचा हेतू १)आपल्या दोघांना भरपूर अन्न मिळावे, २)शरीर सामर्थ्य लाभावे, ३)धनवृद्धी व्हावी, सौख्य वृद्धी व्हावी, ५ प्रजा वृद्धी व्हावी, ६)वासंतादी ऋतू आनंददायक व्हावेत, ७)आत्यंतिक सख्या लाभावे. या वेळी वधूची बहिण वधूच्या पायाचा अंगठा आपल्या उजव्या हाताने धरून मर्यादा नीट राख असे सुचविते. बहिणीचा मान द्यावा तिला ब्लाउज पीस / पाकीट द्यावे.    
साप्त्पादिंची करणे वर दिली आहेत. त्यावर आपल्याकडे अनेकांनी अनेक प्रकार काव्य सुद्धा केली आहेत. पान मी पूज विधीच्या वेळी ज्या वैण्यानिक व मानसिक दृष्टीकोनातून त्या विषयाची मांडणी केली, त्या दृष्टीकोनातून सप्तपदी ह्या विधीमागाचे कार्य  कारण असे आहे कि आपण एखाद्या व्यक्ती बरोबर अनेकदा भेटलो बोललो तरी बरोबर चालत सहवास घडतो तेव्हाच मैत्री हि भावना प्रगल्भतेने जाणवते म्हणून सोबतीने फिरणे ह्याचे हे प्रतिक आहे. आपण अनुभव घेऊन पाहावे.  
पाणी ग्रहण चिरकाल सहजीवनासाठी पाणिग्रहण सांगितले आहे.
वरच्या आईने वधूला हळद कुंकू लाऊन शालू दागिने, जोडवी विरोल्या वधूला देणे. मंगल सूत्राच्या वाटीत दाबून भरावे व नंतर गुरुजी सांगतील तेव्हा वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे, वराने सोवळे नेसून पत्नी सह विवाह होम करावा

क्रमशः ------------- पुढील भागात - ऐरणी पूजन / झाल ठेवणे वधूची पाठवणी वराचे वधूसह स्वगृही आगमन, गृहप्रवेश लक्ष्मिपुजन नाम लक्ष्मी पूजन - नाव ठेवणे, देवक उठवणे. सूप पाखडणे


हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ६ वा
विधी ९ वा -------------- रुखवत ----------- हा सामाजिक / लौकिक विधी आहे.  विधी १० वा -- मधुपर्क
केव्हा करावा ------- लग्नापूर्वी
आवश्यक व्यक्ती --- करवली वर व वरची भावंडे तसेच मनाच्या अन्य व्यक्ती.
माहिती -------------  करवलीने किंवा अन्य महिलेने वरच्या डोळ्यात काजल घालावे. वरच्या गालाला गालबोट लावावे. नंतर वराची आई, करवली व अन्य व्यक्तींनी रुखवताच्या भोजनास बसावे, वधूच्या आईने वारला तुपाची आपोष्णी (आपोशन) द्यावी. केळे व दुध दये. नंतर वराने भोजनास आरंभ करावा. भोजन होईपर्यंत, वारला देऊन शल्लक राहिलेले दुध व केळे गौरीहर जवळ बसलेल्या वधूला नेऊन द्यावे. वधूने केळे खावे, दुध प्यावे, वराचे भोजन झाल्यावर हस्त मुख प्रक्षालन झाल्यावर वधूच्या आईने चांदीचा रुपया घालून केलेला ५ पानांचा गोविंद विडा वराला द्यावा. वधूच्या वडिलांनी वाराला मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यावे. गड्याकडून दहीभात ओवाळून टाकावा (दृष्ट काढावी) वधूच्या आईने वरच्या पायावर दुध, पाणी घालावे, लामण दिव्याने ओवाळावे, वधूच्या पित्याने आपल्या उजव्या हाताने वरचा उजवा हात धरून वाराला लग्नाच्या बोहोल्यावर न्यावे, व खुर्चीत बसवावे.

विधी १० मधुपर्क ----- लग्न मंडपात आलेल्या वराचे स्वागत (पूजन)
केव्हा करावा ------- बोहोल्यावर 
आवश्यक व्यक्ती ---गुरुजी, वधूचे आई वडील
माहिती ------------- वराचे स्वागत करून त्याला वस्त्र (सोवळे) जानवे, हार, दही, मध, तूप, एकत्र देणे. विडा दक्षिणा, फुलांची मुंडावळ, हे देऊन उपस्थितांना मंगलाक्षता देणे.
विघी ११ वा --------- मंगलाष्टके ---------- मुख्य लग्न (वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात)
केव्हा करावा ------- ठरवलेल्या मुहूर्ताच्या वेळी
आवश्यक व्यक्ती ---(वधूच्या मातापित्याने मंगलाष्टके ऐकायची नसतात) गुरुजी, वधु/वर त्या दोघांच्या कडे करा व दिवा धरायला एक  एक करवली व एक एक सुवासिनी. अन्तः पट धरण्यासाठी वधूचे मामा किंवा अन्य नातेवाईक व इतर सर्व नातेवाईक आप्त मित्र परिवार
माहिती -------------मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अन्तः पात दूर करावा. प्रथम वधूने व नंतर वराने आपापल्या हातातील हार एकमेकांना अर्पण करावेत. करवलीने वधु/वरच्या डोळ्यांना कार्यातील पाणी लावावे. सुवासिनीने हातातील लामण दिव्याने दोघांना ओवाळावे. वधूवरांना व गुरुजीनंना पेढा अत्तर गुलाबपाणी फुल वगैरे द्यावे नंतर विवाहास उपस्थित स्त्रीपुरुषांना पेढा पुष्प वगैरे द्यावे. वर्मातेचा मान -- लग्न झाल्यावर लगेच वधूच्या आईने विहिणीची (वरमातेची) साडी व नारळाने व साखरेने ओटी भरावी      
क्रमशः ------------- पुढील भागात -  कान्ण्यादान, कंकण बंधन, विवाह होम.


दू मराठी लग्न पद्धती ----- भाग ५ 
विधी ८ वा-------------- गौरीहर पूजा  ------- हि अन्नपूर्णा देवीची पूजा असते. ती केवळ वधूने करायची असते.
प्रकार १ ----- गौरीहर सजवणे साखरेची किंवा लाकडाची एकावर एक चिकटवलेली ५ बोळकी असतात. हि गौरीहराची बोळकी पाटावर मांडावीत (चार कोपऱ्यात एक एक) मुलीबरोबर देण्यासाठी (चांदीची) अन्नपूर्णेची मूर्ती आणावी. ती पाटावर माद्ध्याभागी ठेवावी. बाजूला वधूच्या आईने लाडू गडू ठेवावे. अशा प्रकारे आपल्या हौशीनुसार गौरीहर सजवावा.
प्रकार २ ----- वर व वधुकडून एकावर एक अशी ४ बोळकी चार कोपर्यावर शेजारी शेजारी ठेवावी. त्यावर मुलाकडून मंडपी (लहान मंडप) ठेवावा.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी - त्याच दिवशी
आवश्यक व्यक्ती ----- वधु व वधूची आई, वरची आई व अन्य ५ सुवासिनी यांनी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, दागिना असोला  नारळ या वस्तू वरच्या आईने वधूची ओटी भरावी. या वेळी वधु मामाकडील पिवळी साडी नेसून गौरीच्या पूजेला बसलेली असते. ती साडी नेसूनच लग्न लागायचे असते.
तेल्फालाच्या वेळी गौरीहरा जवळील दिव्यामाद्ध्ये तेल घालण्यासाठी तेल भरून तपेली व डाव (मोठ्ठा चमचा) गौरीहरा जवळ वरमातेने ठेवावा.
मूर्तीची पूजा करतांना "गौरी गौरी सौभाग्य दे, दारी आलेल्या वारला दिर्घुष्य दे." असे म्हणून हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. व एकाग्र चित्ताने कोणाशीही न बोलता वर लिहिलेली प्रार्थना (मंत्र) म्हणत एकत्र केलेले पांढरे तीळ व तांदूळ दोन्ही हातांनी चिमटीने वाहण्यास आरंभ करावा. हे कार्य मामा तेथे येऊन बोहोल्यावर जायला सूचना देईपर्यंत करीत राहावे.
क्रमशः ---------- विधी ९) रुखवत व १०) मधुपर्क





हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ४ ----- देवक ठेवणे
विधी ७ वा  -------------- देवक ठेवणे ---- ह्याला देवदेवक ठेवणे असेही म्हणतात. हा धार्मिक विधी आहे. ह्यात गणपती पूजन, पुंण्याहवाचन मातृका पूजन व नांदीश्राद्ध एव्हढे विधी अंतर्भूत आहेत.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी किंवा सोयीनुसार १, ४, ५, दिवस आगोदर ठेवता येते. काही संकट समयी अपरिहार्य कारण असल्यास विवाहाच्या आधी १० दिवस सुद्धा थेत येते. पण ते ठेवल्यावर वधु अथवा वराने घराच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते म्हणून आजकाल ते आदल्या दिवशी किंवा लाग्नाच्याच दिवशी लग्नापूर्वी ठेवतात. सर्व कार्य पुरे झाल्यावर हे उठवतात म्हणजे त्या देवतांच्या साक्षीने सर्व कार्य केले जावे असा संकेत आहे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही पक्षी स्वतंत्र पणे करयचे असते.
माहिती --------------  आज सोयीसाठी हा विधी हॉलवरच केला जातो. खर तर हा विधी वधूवरांच्या आई वडिलांनी आपापल्या घरी करायचा असतो. आणि लग्नाचा सर्व विघी पूर्ण झाल्यावर देवक उठवायचे असते.  ह्या विधीच्या वेळी मुलाच्या व मुलीच्या घरी वेगवेगळा संकल्प असतो.
वरपित्याचा संकल्प असा --------- माझा मुलगा ह्याच  देव व ऋषी व पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रमाणे धार्मिक संस्काराची बैठक घेऊन प्रजोत्पादन करण्यासाठी श्री पर्मेश्वर्प्रीत्यार्थम मी विवाह संस्कार करतो आहे.
वधु पित्याचा संकल्प असा ------- माझी मुलगी हिने भ्र्त्रासह आपल्या पतीसह कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या तसेच धर्माचरण करण्याकरिता अधिकार मिळण्यासाठी श्री परमेश्वराप्रीत्यार्थम विवाह संस्कार करतो आहे.
१) गणपती पूजन
२) पुंण्याः ह वाचन ----- वरुण पूजा
३) मातृका पूजन ----- या एकूण २७ देवता आहेत गौरी आदी १६ देवता, ब्राम्ही आदी ७ देवता, गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल वस्तू अशा २७ देवता आहेत. ह्या सर्व देवतांची पूजा सुपात सुपारी स्वरुपात मांडून करावयाची असते.
४) नांदी श्राद्ध ----- म्हणजे कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण होय. कर्त्याची आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पणजोबा, व कर्त्याच्या आईचे वडील, आजोबा, पणजोबा, व आईची आई, आजी, पणजी यांचे स्मरण असते. (नामोच्चार नाही) त्याच बरोबर मंडप पूजा करयची असते. त्याच्या ६ देवता आहेत नंदिनी, नलिनी, मैत्र, उमा, पशुवार्धिनी, शास्त्रागार्भा,-भगवती (दर्भ आंब्याच्या पानात गुंडाळून उंबराचे पान व दुर्वा गुंडाळून दोऱ्याने बांधून) त्याची पूजा करायची असते. (हे मांडवाचे खांब कल्पिलेले आहेत) खरा मांडव घातला असेल तर मांडवाच्या आग्नेय कोपऱ्यातील खांबांची- मेथीकादेवीची  पूजा करावी. तांदूळ, हळकुंड, सुपारी, रुमालात बांधून त्या खांबाला बांधून ठेवावी. देवक उठवल्यावर त्याचे विसर्जन करावे. अविघ्न कलश म्हणजे गणपतीची पूजा सुगड व त्यावर झाकण त्यात तांदूळ सुपारी खारीक बदाम हळकुंड तिलाच लाडू, कुलदेवतेचा नारळ पुजावा. अश्तागरात म्हणजे अलिबाग तालुक्यात मातृकापुजानात कुलदेवता असतेच म्हणून वेगळ्या नारळाची कुलदेवता म्हणून पूजा करण्याची प्रथा नाही. अन्य ठिकाणी कुलदेवता म्हणून नारळाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी सुग्डला व नारळाला सुत गुंडाळायचे असते.
क्रमशः ------------------------ गौरी हार पूजा




   
हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग ३ ----- वांग निश्चय, मुहूर्त पत्रिका पूजन,
विधी ४ था -------------- वांग निश्चय - आजच्या काळी साखरपुडा - रिंग सेरिमनी  ------- हा धार्मिक व सामाजिक दोनही प्रकारचा विधी आहे.
केव्हा करावा -------- वांग निश्चय म्हणजे विवाहाचा निश्चय. आजच्या कळत साखरपुडा. हा विधी विवाह ठरल्यावर विवाहाच्या आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. काही जण हा विधी विवाहाच्या दिवशीच विवाहापूर्वी करतात.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली, दोन्ही बाजूंचे काका मामा इत्यादी ज्येष्ठ व्यक्ती.
माहिती --------------  गणपती, वरून व शची म्हणजे इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी हिची पूजा करून त्यांच्या साक्षीने वधु वडिलांनी वरच्या वडिलांना सांगायचे कि मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देत आहे हे परस्परांना मान्य असून दोनही पक्षी आता तुम्ही मुलगी व आम्ही मुलगा पाहण्याची गरज नाही असे सांगायचे. वधु व वराकडील ज्येष्ठ पुरुष व्यक्तींचा व नातेवैकानंचा एकमेकांशी परिचय करणे, ह्यालाच व्याहीभेत असेही म्हणतात. याच वेळी वधूला दागिना देतात, साडी व ब्लाउजपीस, व मुंडावळ्या देतात.
विधी ५ वा - मुहूर्त पत्रिका पूजन  - हा धार्मिक / सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज असते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा. आपण ज्या पत्रिका वाटतो त्या वाटणे सुरु करण्या पूर्वी करावा.
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील.
माहिती -------------- मुहूर्ताच्या वेळेची पत्रिका म्हणजे कुंडली मांडून तिचे पूजन करतात तशी केलेली नसल्यास वर व वधूची जन्मपत्रिका एकत्र पूजतात.
विघी ६ वा - सीमांत पूजन - सीमंती- श्रीमंत पूजन  - हेच जावी पूजन होय.
केव्हा करावा -------- लग्नाआधी त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधूच्या  आई/वडीलांसामावेत वधु व वरची मोठ्ठी बहिण लग्न झालेली असल्यास आपल्या पती समवेत (ज्येष्टजामातापूजन) व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- गुरुजींच्या साक्षीने वधूच्या आईवडिलांनी जावी ज्येष्ठ जावई वराचे आई वडील भाऊ यांचा मान सन्मान करणे. त्याच वेळी वराचे पूजन करून पाय धुऊन पायावर स्वस्तिक काढून पोशाख, मुंडावळ, हार, वरदक्षिणा, सजवलेला नारळ देतात, अत्तर लाऊन गुलाबपाणी शिम्पाद्ल्यावर प्रथम मुलाच्या आईने व अन्य चार सुवासिंनिनी लामण दिव्याने (निरांजनाने) मुलाला औक्षण करावे. औक्षनानंतर प्रत्येकीने मुलाला पेढा भरवावा(बालविवाहाच्या काळी )/ द्यावा. वरच्या आईची, करवलीची (सुवासिनी असल्यास) ओटी भरावी. आईला गुळाची ढेप द्यावी. चांदीच्या वाटीत  हलवा द्यावा. उपस्थितांना अत्तर गुलाबपाणी पेढा द्यावा. तसेच मनाच्या (स्त्री / पुरुष ) सन्मान करावा.     
क्रमशः ------------- पुढील भागात - देवक ठेवणे


हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग २
विधी १ ला  --------------ग्रहमख / ग्रहयज्ञ
केव्हा करावा --------विवाह ठरल्यावर वधु व वर दोघांच्या घरी विवाहाच्या ५, ४, किंवा १ दिवस आगोदर करावा. त्यावेळीही वाईट दिवस नाहीना एव्हढे पाहावे. आपल्या कार्याला सर्व ग्रहांची अनुकुलता लाभावी म्हणून हि ग्रहांची शांत असते.
आवश्यक व्यक्ती ----- गुरुजी, वधु/वर, त्यांचे आई/वडील, कुंकू लावण्यासाठी सुवासिनी, करवली,
माहिती -------------- ग्रहमख - ह्यात सूर्यादी नवग्रह देवता, प्रत्येक ग्रहाच्या उजव्या बाजूला एक व डाव्या बाजूला एक ह्या प्रमाणे ९ * ३ = २७ देवता, ७ क्रतु साद गुंण्य्कार देवता. आणि अष्ट द्विक्पाल मिळून एकूण ४२ सुपाऱ्या देवता म्हणून पूजतात. सर्व्सामान्ण्यातः देवांची पूजा करतांना त्यांना नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. मूर्ती पूजेत हा नैवेद्द्य म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच प्रकारचा नैवेद्य किंवा देव देव्तान्न्च्या आवडीचा पदार्थ त्याला अर्पण करणे असे त्याचे स्वरूप असते. ग्रह हे अंतराळात आपल्या भोवताली फिरतांना दिसतात त्याच्या साठी जो नैवेद्द्य अर्पण करायचा तो हवन केल्याने त्यांना पोहोचतो अशी आपल्या शास्त्राची श्रद्धा आहे. सर्व देव्तान्न्च्या बाबतीत (अग्निमुखावैदेवाः) अग्नी हे देवांचे मुख आहे अशी कल्पना आहे. म्हणून कोणतेही हवन / यज्ञ हे ग्रह नैवेद्द्य होय 
विधी २ रा - केळवण - हा सामाजिक विधी आहे. गुरुजींची गरज नसते.
केव्हा करावा -------- विवाहा पूर्वी सोयीनुसार साधारण कोणत्याही शुभ दिनी करावा
आवश्यक व्यक्ती -----वधु व वर त्यांच्या आपापल्या घरी. त्यांचे आई वडील इष्ट मित्र व नातेवाईकांसमवेत यथाशक्ती एक अगर पंचा पक्वान्ने करून भोजन करावे.
माहिती -------------- खर तर वधूकडील मंडळींना केळवण भावनिक दृष्ट्या विशेष महत्वाचे वाटते. कारण त्या नंतर त्यांची मुलगी कायमची दुसरीकडे राहायला जाणार असते. वधु- वर लग्नाच्या दिवशी कार्यात एव्हढे व्यस्त असतात कि त्यांना निवांतपणे भोजन  करणे कठीण असते. म्हणून निवांतपणे सर्वांसमवेत भोजन कर्वे एव्हढाच लौकिक संकेत केल्वानामागे आहे. 
विघी ३ रा - व्याही भोजन - वराच्या आईवडिलांनी वधूच्या आईवडिलांना जेवायला बोलवायचे असते.
केव्हा करावा -------- लग्नापूर्वी सोयीनुसार कोणत्याही शुभ दिनी करावे.
आवश्यक व्यक्ती ----- वधूचे आई/वडील व जवळची घरची नातेवाईक म्हणजे वधूची भावंडे वगैरे भोजनाला बोलावावीत.
माहिती -------------- पूर्वी एकदा मुलेचे लग्न झाले कि तिला मुल होईपर्यंत मुलीचे आई/वडील तिच्याकडे अन्न ग्रहण करीत नसत. म्हणून लग्नापूर्वी त्यांना वरच्या आई/वडिलांनी जावायला बोलावण्याची प्रथा आहे ह्या वेळी वधूला मात्र बोलावत नसत हल्ली बोलावतात.
क्रमशः ------------- पुढील भागात वांग- निश्चय, मुहूर्त - पत्रिका पूजन, सीमांत पूजन - सिमान्न्ती

हिंदू मराठी लग्न पद्धती ----- भाग १ प्रस्तावना व माहिती
हिंदू समाजात पूर्वी एकत्र कुटुंब बद्धती होती त्यामुळे घरात दर ३ -  ४ महिन्ण्यानी काहीनाकाहीतरी कार्य घडत असे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्या पिढी कडून पुढच्या पिढी कडे सहज न्यात होत जायच्या. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात कार्य काढले कि कोणकोणत्या गोष्टी लागतात हे माहित नसते. मला खुद्ध माझ्या मुलीच्या लग्नात हा अनुभव आला आणि तारांबळ झाली. त्यातून हे लिखाण करावे असे सुचले. कि जेणेकरून कार्य करतांना आपल्याला सर्व माहिती असावी. विविध विधींच्या साठी वेगवेगळी माणसे लागतात आणि ती ती माणसे त्या त्या वेळी हजर नसतील तर तारांबळ उडते म्हणून माहिती देतांना विधी - तो कधी करावा - त्या साठी लागणाऱ्या आवश्यक व्यक्ती - आणि काही आवश्यक माहिती. 
अशा पद्धतीने हे लिखाण केले आहे. हे लिखाण करतांना आमचे गुरुजी श्री वैशंपायन ह्यांनी धार्मिक बाबतीत काय करावे ह्याबद्दल पूर्ण माहिती देवून हे लिखाण जास्तीतास्त परिपूर्ण करण्यास मदत केली त्या बद्दल त्यांचे इथे मी आभार मानतो आणि माहिती देण्यास सुरुवात करतो

काही सूचना व माहिती
सामाजिक व लौकिक विधींना गुरुजींची जरुरी नसते. मात्र धार्मिक विधींना गुरुजींची आवश्यकता असते. अशा वेळी सामानाची यादी व कार्याचा दिवस वेळ ह्यांची माहिती आपण जे गुरुजी बोलावतो त्यांच्याकडून वेळोवेळी घ्यावी.
शुभ दिवस व अशुभ दिवस अलीकडे कालनिर्णय सारख्या बऱ्याच दिनदर्शिकेमधून दिलेले असतात. सामाजिक व लौकिक कार्यासाठी दिवस ठरवतांना अशा दिनदर्शिकेचा आधार आपण घेऊ शकतो. विवाह संस्कारातील कार्याची माहिती देतांना मुलगा म्हणजे वर आणि मुलगी म्हणजे वधु हे प्रचलित शब्द वापरले आहेत.
वैदिक विवाह पद्धतीत मातृका पूजन, नांदी श्राद्ध, देवक, वांग-निश्चय, झा ल म्हणजे ऐरणी पूजन हे कार्यक्रम ऐच्छिक असतात. मंगलाष्टके शेवटी गाईली जातात.
विशेष सूचना ----- वधु व वर यांचे आई वडील उभयता हयात नसतील तर त्यांचे ऐवजी कार्य करणारी व्यक्तीच वधु वर यांचे आई वडील समजावेत
क्रमशः --------------- १)ग्रहमख २)केळवण ३)व्याही भोजन

Sunday, 9 October 2011

देवत्व कल्पना --- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ---५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी

ईश्वर / देवत्व कल्पना  --- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ---५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण ९) बौद्ध १०) कलंकी  आणि सहव्वी कल्पना उपयुक्त सजीव उदाहरणार्थ गाय
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
आत्ता पर्यंत आपण ४ प्रकार पहिले १ ओमकार २ त्रिगुण ३ पंचा महाभूते ४सजीवांच्या उत्क्रांतीच्या पहिल्या ४ अवस्था ज्या प्राणी प्रकारात मोडतात. सजीवांच्या पहिल्या चार प्रकारात आपल्याला असे लक्ष्यात येईल कि त्यात देहाची उत्क्रांती होत गेली आहे. आणि एकदा मानव देह मिळाल्यावर त्याच्यातील बदल हा
प्रथम शारीरिक पण त्याच आकारात --- ५)वामन
नंतर बौद्धिक ------------------------------ ६)परशुराम
मग मानसिक ----------------------------- ७)राम
आणि बुद्धी आणि मनाचा सुरेख संगम -- ८)कृष्ण
हे बदल होत होत पुढे संहाराच्या जाणीवेतून एकदम विरक्ती ----- ९)बौद्ध 
आणि शेवट आत्ता चालू असलेला अराजक अस्थिर द्विधा मनसस्थितीतील माणूस --------- १०)कलंकी
ह्या सर्वांचा उंचावरून विचार करता असे लक्षात येते कि पहिले ३ मुळात देह नाहीत अद्वैत-एकटा, वृत्ती व निर्जीव पण निसर्गातील शक्ती आहेत. त्यांना मानव रूप कोणी कधी व का दिले ते कळत नाही. कदाचित निव्वळ अद्वैताची, वृत्तीची किंवा निव्वळ शक्तीची उपासना मानत स्थिर होणे कठीण असल्याने मानवी देह कल्पून त्यांना पूजणे सुरु झाले असावे. 
सजीवातील ज्या प्राण्यांना आपण देव मानतो तरी त्यांचे आजचे वास्तवातील स्थान मर्यादित दिसते.
आत्ता फक्त मानवी देहरूपी देव प्राधान्याने पूजले जातात असे जाणवते.
आज पर्यंत आपण देवत्वाचे प्रमुख प्रकार पहिले
आज मी काही प्रश्नावली आपल्या समोर ठेवत आहे.
अ) मी एखाद्या व्यक्तिरेखेला देव मानतो त्या मागील माझी भूमिका काय आहे? का र ण काय आहेत?
ब) मला देव हवा असे खरोखर मनापासून वाटते का? त्या साठी मी काय केले पाहिजे आणि ते मी करतो का?
क) माझ्या देवाकडून काही अपेक्षा आहे का? त्या पुऱ्या झाल्या का?
ड) देवत्व हे मी नेमके कुणाकुणाला बहाल करीन



देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,

देवत्व कल्पना -- चौथा प्रकार -- उत्र्क्रांतीवाद -- दशावतार -- १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह,
पाचवा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण,
सहव्वा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
 
चौथा प्रकार ------ दशावतार  - उत्क्रांतिवाद जो डार्विन च्या उत्क्रांतीवादशी जुळणारा आहे. सजीवांची उत्क्रांती हा एक वर्षानुवर्षे घडत आलेली क्रिया आहे. ती आपण नाही निसर्ग करत आला. हे जरी खरे असले तरी त्यात सजीवाचा हि काही वाट आहे ह्यात वाद नाही आपल्याकडे ८४ लक्ष योनी  म्हणजे सजीव  प्रकार आहेत असा पौराणिक उल्लेख आढळतो. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच हे दश अवतार आहेत. हे मात्र नक्की. आणि हे विस्ञान सिद्ध हि आहे.
आत्ता पर्यंत जे प्रकार पहिले त्यात शब्द वृत्ती आणि पंचमहाभुते ह्या पैकी कोणताच प्रकार सजीव नाही सजीवांची उत्क्रांती हि ह्या श्रुष्टीच्या उत्क्रांतीच्या पुढचा टप्पा आहे त्या मूळे त्याला हि देवत्व मानण्याची पद्धत आपल्याकडे दिसते. ह्याचे मी तीन भाग केले आहेत पहिले चार अवतार प्राण्यातील प्रगती दर्शवते पाच ते आठ हे मानवाची उत्क्रांती दर्शवते आणि पुढे नऊ व दहा हे आधुनिक आहेत जे जे वर जाते ते ते खाली येते त्याची प्रचीती देते   
दशव्तारांना देवत्व मानण्याची कल्पना हि सजीवांची सुरुवात ते आजचा मानव ह्या दोन प्रमुख स्थितींना जोडणारी महत्वाची कल्पना आहे.
१ ला अवतार- मत्स्य. आपल्याकडे ८४ लक्ष सजीव प्रकार आहेत अशी काल्पन आहे. आणि त्यांची प्रगती सुद्धा जलचर उभयचर भूचर अश्या क्रमाने झालेली आजच्या विज्ञान प्रधान युगालाही जान आहे. त्यातील बदलत्या टप्प्यातील शेवटचा टप्पा हा देवत्व मानला गेलेला दिसतो. मत्स्याच्या पुढची पायरी उभयचर २ रा अवतार कूर्म  ३ रा भूचर वराह व ४ था नरसिंह हे रूप मात्र विज्ञानाच्या उत्क्रांती वादाशी थोडे वेगळे दिसते.
ह्या उत्क्रांती वादाच्या मागची मानसिकता काय असावी ह्याचा आता विचार करू श्रुष्टीतील याच्या यावत सजीव मुक्ती साठी तडफडत आहे. त्याच्या अनेक इच्छांपैकी मुक्ती हि इच्छा आगदी प्रत्येकात अखंड आहे पण त्या साठी आपल्याला नेमके काय घडले म्हणजे आपण मुक्त होऊ? आपल्याला मोकळे वाटेल? असा विचार ज्या ज्या वेळी मनात घर करतो त्या त्या वेळी त्याला न लाभलेली गोष्ट लाभली तर आपल्याला मुक्त वाटेल हि सहज प्रवृत्ती निर्माण होते आगदी प्रत्येक सजीवत. हि मुक्तीची तीव्र इच्छाच त्याला उत्क्रांतीला मदत करते. आणि त्यातूनच त्याच्या प्रत्येक पूर्वीच्या योनिपेक्षा जरा उच्च योनी त्याला प्राप्त होते. ह्या बदलाचा वेग कमी असतो पण आन आपण प्रगत मानव विचार करू शकतो म्हणून ह्या मागच्या प्रगतीच्या आलेखाची आपल्याला करपणा येऊ शकते. त्यातील महत्वाचे टप्पे म्हणजेच दहाव्तारातील पहिले ४ अवतार होत.
   
     

देवत्व कल्पना- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश

ईश्वर / देवत्व कल्पना- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
आपल्याकडे देवत्वाच्या ५ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती 
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे ५ हे ह्याच प्रकारतहि येतात.
 
आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
(पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती) हि पहिला शब्द पहिला देव, दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती ह्यांनाच देव मानलेले आहे. 
ह्या प्रकारामाद्ध्ये आपल्याला असे लक्षात येईल कि पंचाम्हाभूतांनाच देव मानले आहे. पृथ्वी- माता, आई, जननी, धारण करती  -स्थूलतम, जड  ----- आप- पाणी, स्थूल, प्रवाही  ----- तेज- सूर्य, इंद्र, अग्नी स्थूल, प्रवाही+वाही स्थूल+सूक्ष्म  ----- वायू- स्थूल+वाही+सूक्ष्म, आकाश -----सूक्ष्म, स्थिर, सर्वव्यापी, सूक्ष्म    
श्री  कृष्णांच्या काळात आपल्याला ह्याचा देव म्हणून स्वीकार केलेला आढळतो त्याच बरोबर त्या काळात इडा देवी असाही उल्लेख आढळतो त्याचा विचार पुढे दुसऱ्या कोणत्या तरी प्रकरणात विस्ताराने येईलच. 
ईश्वराला आपल्या एकले पणाचा कंटाळा. त्यातून द्यैताचा खेळ त्याने सुरु केला त्याच्या इछेचा पहिला शब्द आला ओम त्या  शब्दातून प्रकटले अ उ म वृत्ती त्या पोसल्या गेल्या ज्याच्या आधाराने त्या पंचाम्हाभूतांना हि देवत्व आले. पहिले दोन प्रकार मानवाच्या स्वतःच्या देहाशीच निगडीत होते पंचा महाभूते बाहेरील होती ती देहाच्या बाहेरील असली तरी आपला देहाच मुळात त्यांच्या पासून निर्मिला गेलेला असल्यामुळे त्याचे गुणधर्म देहात होते. मन हे माणसाचा सूक्ष्म देहच असल्याने ते गुणधर्म मनातही स्पष्ट दिसतात. आणि आपला देह त्यांच्यापासून बनला आहे हि जाणीव असूनही त्याच्या अफाट शक्तीची जाणीव आणि त्याच बरोबर आपल्या अगतिकतेची जाणीव ह्यातून हा देवत्व प्रकार उत्पन्न झालेला दिसतो. नर देह पंच्म्हाभूतानंचा बनलेला आहे म्हणूनच त्यांचे सर्व गुणधर्म माणसात आहेत. माणसाच्या स्थूल देहात त्याचे भौतिक गुणधर्म आढळतात आणि माणसाचा सूक्ष्म देह जो त्याचे मन त्यात पान्चाचाम्हाभूतांच्या शक्तींचे गुणधर्म आढळतात. आणि ते सर्व गुणधर्म आपल्यात असूनही आपण त्या पंच्म्हाभूत्न्च्या आधीन आहोत. त्यातून स्वतःच्या कमीपणाची सुप्त जाणीवच त्यांना म्हणजे पंचाम्हाभूतांना देवत्व बहाल करते.
 
सूक्ष्मातून आलेला माणूस जडाच्या  विचारात गुरफटून जातो. जादाचीच आसक्ती बाळगतो  ह्यातूनच षड्रिपू प्रकट होतात. षड्रिपू म्हणजे देही विचार देहाच्या स्वार्थाचे विचार. स्वतःहून जडाच्या बंधनात पडतो आणि मग अडकल्याची जाणीव होते पण सुटायचे कसे कळत नाही म्हणून त्याच्याच कडे म्हणजे जादाकडेच मुक्तीसाठी आक्रोश करतो. ह्याचेच नाव अज्ञान.  
 
ह्या एकूण विस्तारावरू आपल्याला श्रुष्टीच्या विस्ताराची सुरुवात कशी झाली ह्याची थोडीशी कल्पना येईल आणि एकच एक  ईश्वर अनेक कसा झाला ह्याची आपल्याला कल्पना येईल इथे नुसती सुरवात आहे. एक गुणिले ३गुण गुणिले ५ महाभूते गुणिले त्यांच्या पाचपेक्षा जास्त शक्ती.  आणि ह्या सर्वांच्या वर्गातून निर्माण झाले दशावतार म्हणजे पृथ्वीवरचा सजीवांचा उत्क्रांतिवाद मग काय आकडे वर्गाच्या प्रमाणात वाढत गेले आणि मग सहजच मुळातल्या एकाच विसरला तो माणूस त्याला पुंन्हा त्याच्या स्व रुपाची जाणीव करून देणे जागे करणे म्हणजेच परमार्थ म्हणजेच स्वार्थ्शुन्न्यता.   

/ देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना

ईश्वर / देवत्व कल्पना-ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना
आपल्याकडे देवत्वाच्या ६ कल्पना आहेत कल्पना असे मी अशासाठी म्हणतो जो पर्यंत मला ती गोष्ट स्पष्ट पणे जाणवत नाही तो पर्यंत माझ्यासाठी ती कल्पनाच असते. आणि मला अजून पर्यंत तरी देव जाणवलेला नाही म्हणून माझ्यासाठी ती कल्पना आहे.
पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती),
दुसरा प्रकार ------- ब्रम्हा - विष्णू - महेश. ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना ------------ सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---------- सात्विक -- राजस-- तामसी हे त्यांचे स्वभाव म्हणजेच वृत्ती 
तिसरा प्रकार ----- पंचमहाभूते ----- पृथ्वी - आप (पाणी) - तेज - वायू - आकाश
चौथा प्रकार ----- सजीवांच्या उत्र्क्रांतीवादाचा म्हणजेच दशावतार १) मत्स्य, २) कूर्म, ३) वराह, ४) नारसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बौद्ध, १०) कलंकी (कली)
पाचवा प्रकार ----- युगपुरुष ----- महान पुरुष ----- कालपरत्वे समाजाला लाभलेले विविध प्रकारचे नेते. उत्क्रांतीवादाच्या मधील दशावतारांपैकी शेवटचे ५ हे ह्याच प्रकारतहि येतात.
 
आता दुसरा प्रकार ----- (पहिला प्रकार ----- ओंकार (गणपती), झाला) ----- ब्रम्हा - विष्णू - महेश. -----ह्या देवत्वाच्या मूर्तीच्या कल्पना आपल्या सर्वांना परिचित आहेत ह्या मागच्या संकल्पनांचा आता विचार करू. ह्या दुसर्या प्रकारात वृतींचा विचार केलेला दिसतो, आणि त्या वृत्तींनाच देव मानले आहे 
१) ब्रम्हा म्हणजे a कार ----- निर्मिणारा, निर्मितीचा आनंद मिळाल्यामुळे सदा प्रसन्न ----- सत्वगुणी. ह्या वेळी गुणांच्या बरोबर आणखीन एक जाणीव निर्माण झाली ती म्हणजे गती आणि काल. कारण निर्मिती म्हणजे कर्माबरोबर प्रवाह गती व काल संकल्पना हि निर्माण झाली म्हणजे गात काल-भूत काल, वर्तमान काल, व भविष्य काल म्हणजे तीनही काळाचे भान ठेऊन निर्मिती करायची. मागेहि पहायचे वर्तमानही लक्ष ठेवायचे  आणि भविष्याचे भान ठेवायचे म्हणजे तिथेही लक्ष ठेवायचे.   
२ विष्णू म्हणजे उकार ----- पालनकर्ता, पालन करणे म्हणजे जबाबदारी आली आणि जबाबदारी आली कि गांभीर्य आलच म्हणून गंभीर -------- राजसगुणी. इथे देह बुद्धी मन न्यानेद्रीये कर्मेंद्रिये सर्वांचा विकास साधायचा हे जबाबदारी माणसावर आहे. मग विश्व चालवणाऱ्या त्या ईश्वरावर केव्हढी जबाबदारी असेल आणि तो किती गंभीर असायला हवा. तसा तो नसेल तर आजच्या आपल्या राज्या/देश सारखी पूर्ण विश्वाची काय अवस्था होईल कल्पना करू शकाल आपण. तरीही तो त्याचे नियम सोडत नाही. म्हणूनच त्याला कृपाळू म्हणतात.
३ महेश म्हणजे मकार -----  नष्ट करणारा रागीट कारण राग आल्याशिवाय नाश करता येणार नाही  ----- तामसगुणी. तीनही गुणांचा समन्वय तो गजानन ओंम्कर स्वरूप ह्या ओंकार स्वरुपाची मी दिलेल्या माहितीखेरीज भरपूर माहिती आधीच उपलब्ध आहे त्यामुळे तीच मी परत देत नाही. आणि माझ्या दृष्टीकोनातून जी माहिती द्यायची ती ओमकार मद्ध्ये दिलीच आहे.  
आता ह्या दुसऱ्या प्रकारात ब्रम्हा विष्णू व महेश ह्यांना देव मानले आहे सत्व - रज - तम हे त्यांचे गुण  ---- सात्विक - राजस - तामस --- ह्या वृत्ती आहेत. अति पूर्व काळात हे देव मानले गेलेले दिसतात एकूण वास्तवाचा विचार केला तर त्रिगुणांनाच आदरणीय मानण्यात आलेले आहे. आणि त्यांनाच देवत्व बहाल केले आहे. हेच त्रिगुण माणसात कायम असतात. फक्त त्यांचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते त्या मूळे त्यांच्या  त्यांच्या  अधिकात्वा वरून आपण व्यक्तीचा स्वभाव ठरवतो . समाज व्यवस्थेचा विचार करता माणसाला नेहमीच समोरून चांगला माणूस ---- सात्विक माणूस भेटावा/लाभावा  असे वाटत असते पण आपणही पूर्णपणे सात्विक नसतो. ईश्वर संकल्पना करतांना मात्र तीनही गुणांना समान प्राधान्य दिले गेलेले  आढळते.
ह्या देवत्वाच्या कल्पनान मद्ध्ये सजीव नाहीये. वृत्ती किंवा जडलाच कल्पनेने मानवी देह योजलेले आहेत. ब्रम्हा तीनही काळाचे भान असलेला म्हणून तीन तोंडे कल्पिली. विष्णू अत्यंत धीरागाम्भ्रपणे कर्तव्य पालन करणारा नागावर आरूढ होऊनही शांत. आणि शंकर तर क्रोधी म्हणजे तो क्राध दोन डोळ्यातून बाहेर येण्याला कमी पडेल म्हणून तिसरा डोळा त्याला आहे त्यातून तो आग बाहेर सोडतो आणि सर्व भस्मसात होत हि कल्पना. पण त्यांना मानवी रूपे देण्याचे कधी सुरु झाले हे इतिहास किंवा पुराने कुठेही नमूद करत नाहीत. पण त्याच बरोबर हे हि सत्य आहे कि
सृष्टीच्या अस्तित्वासाठी सर्वांची सारखीच गरज आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र त्या कालच्या मानवी कल्पना करणाऱ्या मानवालाही आहे. 
आज मात्र आपण माणूस त्या वृत्तींना उच्च नीच भेदाने स्वीकारतो. त्यातल्या त्यात उच्च नीच ठरवतो. आणि त्यामुळेच निसर्गाने देलेल्या देणगीचा  आपल्याला नीट वापर करता येत नाही.
वृत्तींना देव मानायचे म्हणजे त्यांना जाणायचे. राजयोगाच्या साधनेत समाधीचे ३-४ प्रकार सांगितले आहेत त्यातील निर्विकल्प समाधी च्या पूर्वी  सविकल्प समाधीत पर्यंतच्या सर्व प्रकारात ह्या स्वतःच्या वृत्तींवर  मन एकाग्र करायचे असते. स्वतःच्याच वृत्तींवर स्वतःच मन एकाग्र करणे हे सोपे नाही. मनावर प्रचंड ताण येतो. मेंदूला थकवा येतो. मुळात ते समजायलाच कठीण आहे अशक्य नाही  भौतिक जाणीवेचा तो शेवटचा टप्पा आहे. तामसी विचार दूर सारून सात्विक विचार जाणीवपूर्वक करायचा. अशा सतत प्रयत्नाने आपण आपल्या मनाला सतत सात्विक विचार करायला शिकवतो होतो आणि शेवटी तो हि सोडून द्यायचा. तेव्हा निर्विकल्प समाधीकडे आपला प्रवास सुरु होतो. ह्यालाच  अनन्य म्हणजे निव्वळ बिनतक्रार विना अट शरणागती म्हणतात. हे पूजा, आरती करतांना आपण रोज तोंडाने म्हणतो पण मुळात हा मनाचा भाव आहे तो जमला तर उपयोग नाहीतर नुसताच आरतीतील घंटानाद. स्वानुभव घेऊन बघायच्या ह्या गोष्टी आहेत. असो   हे सर्व प्रकार सर्व सामान्न्यांसाठी कठीण (अशक्य नाहीत) आहेत. त्यामुळेच मूर्ती कल्पना आल्या आणि त्या जास्तीतजास्त रुजल्या. त्याचे कारण माणसाला दृश्याची जाणीव सवय जन्मापासून आहे. त्यामुळे त्याला ते  जाणणे  सोपे  जाते ती सवय इतकी आहे कि त्याला त्या गोष्टी स्वप्नातही दिसतात. ह्यातूनच पुढे भक्ती मार्गाची व्यवस्था झाली. हा सूक्ष्म कडून स्थूलाकडे नेणारा विचार आहे --- जडाकडे नेणारा  प्रवास आहे. आणि त्याचे आचरण हा त्याच जादाकडून सूक्ष्म जो परमात्मा त्याच्या कडे नेणारा प्रवास आपण प्रत्यक्षात करायचा आहे. म्हणजेच साधना करतांना त्या सहज जाणवणाऱ्या जादाचा आधार घेऊन सूक्ष्म पर्यंत जाणे म्हणजे परमार्थाचा प्रवास होय. आमची अडचण हि आहे कि आपण त्यात प्रवास करतच नाही फक्त जडताच घुटमळत राहतो. म्हणून अनुभव येत नाही निर्भेळ आनंद मिळत नाही. आयुष्याचे प्रश्न तर मुळीच सुटत नाहीत. कारण आम्ही ढोंगी आहोत. आपण बहुतांशी धार्मिक कृत्य  आपण धार्मिक आहोत असे जगाला दाखवण्यासाठी करतो. समाजात आपले थोडे तरी स्थान राहावे म्हणून करतो. चार लोक आपल्याला आस्तिक आहात असे म्हणावीत म्हणून करतो. स्वतःच्या मानसिक उत्कर्षासाठी करत नाही म्हणून अनुभव येत नाहीत. पुन्हा एकदा विवेकानंदांचे वाक्य नामुद   करतो  ""अन सेल्फिश नेस इस मोर पेइंग यु बट पिपल डोन्ट हाएव पेशंस टू प्रेक्टीस इट"" ------ हाएव पेशंस.शुभम भवतु         
 
 
 
 
 
   

देवत्व कल्पना ----- पहिला प्रकार ----- ओमकार

देवत्व कल्पना ----- पहिला प्रकार  ----- ओमकार
श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे.
श्री गणेश ओंकार ----- मी ओंकारामधील ध्वनी शास्त्राची माहिती  देणार आहे. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असून साधनेचे मूळ आहे भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  म्हणून ह्याला पर्यायी शब्द कोणत्याही भाषेत जातीत किंवा धर्मात कुठेही नाही. हे समजण्यासाठी काही प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त  भारतीय भाषा  उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत.उच्चारातून निर्माण होणाऱ्या  प्रत्येक ध्वनीला आपल्या  लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. ओमकार हा हि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. आपल्याडील मुळाक्षरे हीच मुळात ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत म्हणजे ओष्ठ, तालव्य, मुर्घ्न्य, आणि  कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात.  ध्यानिचा आपल्या शरीरवर  मनावर तातडीने  परिणाम होतो  त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनीतून  निर्माण होणारे शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
कंठात आकाराची उत्पत्ती होते निर्मिती होते अर्थात निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद सात्विक वृत्ती. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा स्वर ऐकलात तर गाणार्याला  आणि ऐकणाऱ्याला खरोखरच अत्यंत आनंद होतो. हा स्वर कंठातून येतो आणि बाहेर पर्यंत ऐकू येतो. उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते तो स्वर तिथेच राहतो व अतिरिक्त स्वर बाहेर ऐकला येतो तो गंभीरच असतो म्हणून पालन करता राजस वृत्ती विष्णू (कल्पना) मकार  - हे व्यंजन आहे - संपणारा  नाशाचे प्रतिक तामसी वृत्ती महेश (कल्पना) शंकर  शब्दाची उत्पत्ती आकाशातून होते पंचमहा भूतांपैकी पहिले ४ जाणायला सोपे आहेत त्यामुळे त्यांचे मानाने ध्यान करणे फार कठीण जात नाही पण आकाश हे सर्वात सूक्ष्म आहे त्यामुळे त्याच्याची तादात्म्य पावण्यासाठी शब्द हेच प्रभावी साधन आहे ओम हा पहिला शब्द आहे.  
संत वान्ग्मायात आपल्याला अनेक ठिकाणी हा उल्लेख आढळेल  कि प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो  त्याला अनाहत नाद असे म्हणतात.ह्याचाच भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का?  ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे.  उदाहरणार्थ वीज.

हेच तत्व विचारलाहि लागू होते.  विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच प्रत येते.  हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच  माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. तसेच ग्ञान आत आहे बाहेरून आघात होतो तेव्हा ते बाहेर येते जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची आणि प्रतिभेची कला आतून बाहेर येते प्रतिभाहि  आतून बाहेर येते. ह्या ग्ञान, कला, इच्छा, सर्वच  गोष्टी लोक कल्याणाला पूरक  आहेत. अश्या सर्व गोष्टींना समाईक  असा शब्द/ अक्षर म्हणजे ओमकार होय. कारण त्याची उत्पत्ती हि आतून बाहेर होते.

ओम्काराची उत्पत्ती आतून बाहेर अशी होते. अ ची उत्पत्ती कंठातून होते. उ हा तोंडाच्या माद्ध्यात निनादतो आणि म कार हा ओठावर येऊन ओठ बंद होऊन संपतो पण त्यातही अशी गम्मत आहे कि मकार पूर्ण म्हटल्यास त्यातून आकार बाहेर येतो म्हणजेच आतून बाहेर येणारा, आणि अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे कि ह्याला दुसरा शब्द नाही. अक्षर नाही. म्हणूनच  हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा म्हणजेच अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच ओंकाराचे हे भौतिक रूप आहे. म्हणूनच  हा सिद्ध मन्त्र हि आहे.
 ह्या शब्दात २ स्वर आहेत व म हे व्यंजन आहे. ह्याचा उच्चार  करतांना   जिभेचा कुठेही वापर होत नाही. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राज्योगाच्या  साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आला आहे.  

वास्तविक ह्याला प्रतिशब्द नाही पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम प्राधान्याने वापरला जातो कारण  आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू राम ह्या शब्दाचा उच्चार र+आ  - म अशा प्रकारे होतो व शेवट म असल्याने प्रत्यक्ष उच्चारल्यावर आपल्या लक्षात येईल कि याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. आधुनिक शास्त्रात काही लोकांचे   म्हणणे  आहे कि  ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला जोडून हाकार म्हटला तर त्या हकारामुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणि पुढे जाऊन पहिले तर र्हीम शब्द  रहीम शब्दाच्या जवळ जातो राम शब्दाची जुळणारा आहे. अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या  कल्पनेतून आले मूळ  अ उ म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे.
ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्या गणेशाची साधना करूया शुभम भवतु.