Monday, 26 March 2012

षड्रिपू प्रेम --- इ --- मग रीपुयुक्त ओढ हि प्रेम नाही का? ------ ओढ आहे म्हणजे प्रेम नक्की आहेच आहे.

षड्रिपू प्रेम --- इ  --- मग रीपुयुक्त ओढ हि प्रेम नाही का? ------ ओढ आहे म्हणजे प्रेम नक्की आहेच आहे. किंबहुना यच्चयावत सर्व सामान्न्य मानव त्यासहितच प्रेम करत असतो. कारण  त्याच्या शिवाय प्रेम करण्याची त्याला सवयच नाहीये. किंबहुना ह्यालाच सर्वसामान्य माणूस प्रेम म्हणतो. आणि ते अयशस्वी झाले कि विरहाने  दुक्खी होतो.  देह  आणि त्याचे सुख दुखः त्यामुळे होणाऱ्या इच्छा हवेनाकोपण रुपात जी ओढ निर्माण करतात, त्यालाच आपण प्रेम म्हणतो ते प्रेम तर आहेच पण अपेक्षे सहित आहे म्हणून  यशस्वी  होईलच असे नाही. कारण त्याचे यश हे ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. म्हणूनच होणार नाही असेही नाही.  त्यातील अपेक्षा  जसजशा कमी होत  जातील तसतशी प्रेमाची जाणीव माणसाला जास्त स्पष्ट स्वच्छ होईल.  
१) कामामुळे ओढ निर्माण होते. त्याच प्रमाणे ५)लोभ, ६)मोह हे ओढ निर्माण करतात हे सर्वच जण जाणतात. पण ----------------
पण २)क्रोध, ३)मद, ४)मत्सर  ह्यातूनही ओढ निर्माण होते. हे कित्येकदा माणसाला जाणवतच नाही. वास्तविक कित्येकदा आपण ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला राग येतो मत्सर वाटतो मी पणा वाटतो त्याला आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षाहि जास्त  आठवत राहतो  हे आठवत राहणे म्हणजेच प्रेम. ज्याच्या बद्दल आपल्याला काहीच वाटत नाही त्याच्या बद्दल आपल्याला राग मत्सर मी पणा हि वाटत नाही, म्हणजे पर्यायाने प्रेम नाही कारण ओढ नाही. ह्या प्रेमाला परमार्थात विरोध भक्ती - प्रेम म्हणतात. म्हणजे पर्मार्थालाही हि भक्ती म्हणूनच मान्य आहे. हे निर्विवाद आहे. मग ह्या रीपुंकडे जर आपण मत्सराने पाहिले तर ते आपल्याला अधिकच चिकटतील. त्यांच्याकडे प्रेमाने पाहता आले तर???? त्यांना शरण जाऊन नव्हे पण प्रेमाने.

षड्रिपू प्रेम --- ड --- प्रेम प्रेम म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींमधले आकर्षण - ओढ. सकारण किंवा आकारण

षड्रिपू प्रेम --- ड  --- प्रेम प्रेम म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींमधले आकर्षण - ओढ. सकारण किंवा आकारण ओढ म्हणजे प्रेम. हि झाली प्रेमाची शास्त्रीय व्याख्या. ऐकायला जरा रुक्ष वाटेल पण सत्य आहे. यच्चयावत विश्व ह्या ओढीवर प्रेमावर तर पर्स्परांभोवती फिरते आहे. हि त्या विश्वशाक्तीची लीला आहे. क्षणभरही थांबत नाही. थांबला कि संपला. ओढ संपली म्हजेच प्रेम संपले. आणि प्रेम संपले म्हणजे सर्व विखुरले जाईल भुगा होऊन जाईल. हे खरे आणि वैज्ञानिक सत्य आहे. ह्याच एका प्रमुख शक्ती मूळे आपण पृथ्वीला  प्रेमाचा आदर्श म्हणजेच आई / जननी म्हणतो. कल्पना करा हे आकर्षण नसत तर?? तर आपल अस्तित्व असून भरकटले असते. आपण लाथा मारतो  खणतो तिचा  वाट्टेल तसा वापर करतो तरी ती आपल्याला दूर लोटत नाही हे प्रेम तिची ओढ. म्हणूनच हि जाणीव  आपल्याला कायम निदान रोज एकदा तरी हवी. कारण तिला तिच्या प्रेमाची नुसती जाणीव पुरेशी आहे. तिला कोणत्याच प्रकारच्या परत फेडीची अपेक्षा नाही.  ती जाणीव म्हणजेच आपले प्रेमाच्या  प्रतिसादाची  जाणीव/अपेक्षा. माणसाने कितीही दुर्लक्ष केले तरी अखंड आपल्याकडे ओढ ठेवणे हि ओढ म्हणजेच  अपेक्षाविरहित प्रेम रीपुंनी जराही लिप्त नसलेले प्रेम. हे फलदायी होणार नाही??? श्री रामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे ईश्वर आणि माणूस ह्याचे नाते लोहचुंबक आणि लोखंडाच्या नात्या सारखे आहे. लोखंडाला/आपल्याला गंज/रीपुगंज असतो त्यामुळे गंजलेले लोखंड/आपण ईश्वराकडे ओढले  जात नाही. आपला रीपुगंज गेला तर आपण क्षणात त्याच्याकडे ओढले जाऊ त्याला चिकटून जाऊ. क्षणभर हि दूर राह्हुच शकणार नाही.

षड्रिपू प्रेम --- क -- आता ह्यांचे प्रेम हि नेमकी काय संकल्पना / विचार आहे पाहूया.

षड्रिपू प्रेम --- क  -- आता ह्यांचे प्रेम हि नेमकी काय संकल्पना / विचार आहे पाहूया. मुळात प्रेम म्हणजे नेमके काय? ----- आपल्या फेस बुक मद्ध्ये फेरफटका मारतांना माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि जास्तीतजास्त काव्य, मत किंवा विचार हे ----- प्रेम ह्या विषयावर आहेत. आणि त्यातही जास्त --- विरह - विराणी आहेत. अनेकांनी  अनेक  शब्दात आपापल्या प्रेमा विषयीचे विचार व्यक्त केले  आहेत. आपली प्रेमाबद्दलची भावना. प्रेम भावना. ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट होते कि माणूस प्रेमाचा अतोनात भुकेलेला आहे. आणि निर्माण झालेल्या वक्तव्य व काव्यावरून असे लक्षात येते कि त्याला ते पुरेसे किंवा हवे तसे मिळत नाहीये. कारण विरह जास्त आहे. प्रेमावर लिहिणाऱ्यान मद्ध्ये  मुलगे जास्त आहेत, मुली त्यामानानी  कमी आहेत. त्यातही, --- त्यातील बहुतेक जणांचा सूर असा आहे कि, --- मी प्रेम करतो पण माझ्यावर प्रेम करणारा किंवा करणारी नाही. म्हणून विरह. मी प्रेम करत नाही असे कोणीही म्हणतांना दिसत नाही. प्रत्येक जण प्रेम करतो/करते आहे. तरी त्या/ति-च्या वर मात्र कोणीच प्रेम करत नाही. --- हे जरा विसंगत वाटले. ह्याचा अर्थ सर्वच्या सर्व प्रेम करणारे एकतर्फी प्रेम करताहेत?   कि प्रेम म्हणजे नक्की काय ह्याचाच शोध अजून लागलेला नाही??   कि जे करताहेत ते प्रेम नाहीच आहे???   दुसरेच काहीतरी आहे????  प्रत्येकाचे शब्द वेगळे पण आशय एकच आहे. प्रेम म्हणजे काय ह्याचे उत्तर हि अनेकांनी अनंत प्रकारे दिले गेले आहे.
म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे?  हे हि जाणणे आवश्यक आहे. 

षड्रिपू प्रेम --- ब --- वास्तविक हे तथाकथित षड्रीपुच आपल्याला प्रेम करायला लावतात.

षड्रिपू प्रेम --- ब --- वास्तविक हे तथाकथित षड्रीपुच आपल्याला प्रेम करायला लावतात. म्हणजेच आपल्या मनाला दृश्याकडे ओढतात. कसे? ते समजण्यासाठी आपल्याला ते खरोखर कसे आहेत ते समजून घ्यायलाच हवे. हि गम्मत आहे नाही??? माणसाला त्याचे शरीर दत्त म्हणून मिळालेले आहे तसेच हे आपण ज्यांना रिपू म्हणतो ते हि दत्त म्हणूनच मिळालेले आहेत. मग देह मात्र आवडतो  आणि हे मात्र रिपू, हा सवतीमत्सर का?  हा प्रश्न मला पडला. आणि वाटले हि हि कदाचित माणसांच्या विचारातील  विसंगती आहे,  म्हणून अभ्यास करण्याच्या दृष्टीने मी फक्त ह्या तथाकथित रीपुंचा क्रम बदलून लिहितो म्हणजे माझे म्हणणे काय आहे आणि त्यांचे वेगळेपण नेमके कशात आहे ते लक्षात येते का ते पाहूया. मुळ क्रम --- १ काम २ क्रोध ३ लोभ ४ मोह ५ मद ६ मत्सर आणि नवीन क्रम पुढे पहा. 
अ) १) काम -----------ब) २) क्रोध, ३) मद, ४) मत्सर ------------क) ५) लोभ, ६) मोह
अ) काम हा नाना विकारी आहे असे समर्थ म्हणतात. म्हणजे काम (वासना) अनेक प्रकारचे विकार निर्माण करते. लोकापवाद निर्माण होतात.  काम हा इतर सर्वांचा कर्ता आहे.
ब) क्रोध, मद, मत्सर हे दुसऱ्याला ताबडतोप त्रास देतात. सर्वत्र दुरावा भेद निर्माण करतात. म्हणजे कौटुंबिक व सामाजिक कलहास तातडीने कारणीभूत होतात. तातडीने दुसऱ्याला  त्रासदायक होतात. तर मग "पुण्य पर उपकार, पाप ते पर पिडा"  हे संत तुकारामांचे वाक्य ग्राह्य धरले तर त्या न्यायाने माणसाकडून सरळ सरळ पापकर्म घडवतात. ह्यातील मद हा इतर सर्वांचा आधार आहे, त्याच्या आधारावर इतर सर्व आपल्या मनावर राज्ज्य करतात. म्हणून मी पण टाकता आले तर परमार्थ जमला असे नक्की म्हणायला हरकत नाही. हे परमार्थाचे सार आहे परमार्थाचा शेवटचा टप्पा आहे. ऐकायला सोपा वाटला तरी अचारायला महा कर्म कठीण आहे.   
क) लोभ आणि मोह हे दोन्हीही आकर्षणाचे प्रकार आहेत  एक बहिर्गामी दुसरे अंतर गामी आकर्षण. हे व्यक्तीला स्वार्थी बनवतात. माणुसकी पासून खाली खेचतात.  
हे झाले त्यांचे रीपुपण. त्यांचे हे सर्व गुण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. तरी मी त्यांना रिपू म्हणत नाही कारण हेच प्रेम करायलाही प्रवृत्त करतात हे हि नाकारता येत नाही. कसे ते पुढे पाहू. कारण प्रत्येक सर्व समान्न्या माणूस हा ह्यांच्या मुळेच प्रथम प्रेम करतो. हे कधीही नाकारता येणार नाही.    

षड्रिपू प्रेम --- अ -----

षड्रिपू प्रेम --- अ -----
हा विषय सुरु करण्यापूर्वी एक महत्वाची विनंती करतो आहे कि काल मी लिहिलेल्या काव्याकडे कविता, कवित्व किंवा कविकल्पना म्हणून पाहू नये हे हात जोडून सांगतो  आहे. ते एक वास्तव आहे हे अनेक निरीक्षणानंतर लिहिले गेले आहे. योगायोगाने ते काव्य रूप घेऊन आले. त्यातील आशयचा  गंभीर पणे विचार केला जावा अशी इच्छा आहे. मी माझ्या लिखाणात पुराणे, इतिहास, राजकारण, धर्म आणि जात ह्या पाच गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या  आहेत. कारण विकारांना बंधन नसतात ते सर्व ते माणसासाठी सारखेच असतात. माणूस हा स्वार्थी आहे त्यात स्वतःचा देह त्याला प्रिय आहे. त्याला सुधृढ निकोप ठेवण्यासाठी तरी त्याने आपले मन सुध्धा सुधृढ निकोप ठेवावे लागेल. मन जा निकोप असेल तर स्वाभाविकच सामाजिक संघर्ष कौटुंबिक हेवेदावे कमी होती आणि माणसातील दुरावे कमी होतील हे एकच भान मी माझ्या लिखाणात ठेवले आहे. हेतू एकच आहे अवघा रंग एक व्हावा. रंगी रंगवा श्रीरंग.          
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
आता षड्रिपू प्रेम पाहूया हे ऐकायला थोडेसे चमत्कारिक वाटेल पण खरोखरच तसेच आहे. आपल्याला सर्वांना माणसाचे शाद्रीपुंच्या वरचे प्रेम माहित आहे. पण मी म्हणतोय शाद्रीपुंच्या मूळे माणसाच्या मनात निर्माण होणारे प्रेम. आपण ह्या सर्वांना शत्रू मानतो आणि ते दिसतात कसे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण हे नेमके कसे आहेत त्यांचा नेमका स्वभाव काय हे आपल्याला माहित नाहीये म्हणून त्यांचा स्वभाव कसा आहे ते आधी पाहूया, मग कळेल, जाणवेल आणि पटेल कि ते प्रेम करायलाही लावतात.   
आपल्याकडे १) काम, २) क्रोध, ३)  लोभ, ४) मोह, ५) मद, ६) मत्सर हे सहा रिपू म्हणजे माणसाचे शत्रू आहेत असे मानले आहे, पारमार्थिक तत्वज्ञानी तर हे अहोरात्र ओरडून सर्वांना सांगत असतात. आणि खरी गम्मत अशी आहे कि ह्यांच्या पैकी कोणत्या ना कोणत्या एका किंवा एकापेक्षा जास्त किंवा सर्व तथाकथित रिपुच्या कचाट्यातून एकही जण क्षणभर सुद्धा सुटलेला नाही. मग हे रिपू कसे ??? किंबहुना हे आपल्याला त्यांचा गुलाम करतात, त्यांच्या बंधनात ठेवतात म्हणून त्यांना आपण रिपू म्हणतो मानतो असे तर नाही??? वास्तविक ते आपल्याला कधीच बंधनात टाकत नाहीत आपणच आपणहून त्यांच्या बंधनात जातो.
आणखी एक गोष्ट अशी ती म्हणजे ह्या सर्वांनाच विकार असेही म्हणतात. पण वास्तव मला असे जाणवले कि ------------
पहिला प्रकार ----- त्यातील काम हा विकार आहे, पण ती इच्छाहि आहे आणि शक्तीही आहे हि गोष्ट सुद्धा आपण नाकारू शकत नाही. 
दुसरा प्रकार ----- यातील काही रिपुंच्या अधीन झाल्यामुळे शारीरिक रोग निर्माण होतात.
तिसरा प्रकार ------ काहींच्या मुळे सामाजिक कलह निर्माण होतात. ते आहेत क्रोध, मद, आणि मत्सर. ह्यात भर पडते ती भीती, अपराधीपणा, आणि ह्या सगळ्यावर पांघरून घालण्याचा माणसाचा तुटपुंजा प्रयत्न म्हणजेच दांभिकपणा.

माझे काव्य---- षड्रिपू रोग

माझे काव्य---- षड्रिपू रोग
काम तो जाणावा विषयाचा ओघ आवेग तयाचा आवरेना // आवरतात्यासी उपजते प्रेम जैसे दुग्धामृत स्त्रीचे स्तन //1//
तुटता स्वामित्व उफाळतो क्रोध   वाताचे विकार कंप वात // आवरता त्यासी विश्व येई हाती जैसा अर्जुनाचा श्रीकृष्ण सारथी //2//
लोभ तो वाढावी हवेनाकोपणा हावची मनाची चौर्य कर्म // रक्तावरी दाब हृदयविकार सोडीताची लाभे दीर्घायुष्य //3//
मोह तो मोहवी दृश्यात जीवाला   विस्मृती आळस मधुमेह // सोडिता तयासी दुखः जाई लया   आनंदते मन जाणतेपणी //4//
मी पण मनाला दृढजरी करी आधार जो देई सर्व विकार // आधीभौतीकांच्या दहाला वेदना सोडिता निरसे वेदना संचित //5//
मत्सर तो करी अद्वैताचे द्वैत   पोखरी देहाला कर्क रोगे // त्यागिता तयासी प्रेम आणि मैत्री आनंदे संसार आणि जग //6//
दंभ हा पदर दिद्हातभर  झाकितो   मनाला उघडे शरीर // मानाविकाराला झाकितो परी जे देहारोगे दावी जगाशी या //7//

नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन

नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन     
आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल कि कोणत्याही माणसाला भक्तीच्या मार्गाने भगवंताशी एकरूप होऊन राहणे शक्क्य आहे. त्या भक्तीतही नऊ प्रकार आहेत. माणसांच्या मानाच्या विविध प्रवृत्तीनुसार ते विचारात घेतले गेलेले दिसतात. जे मन उन्मन (उन्माद नव्हे) करून भगवंताशी जोडायचे आहे, तादात्म्य  पाववायचे आहे, त्या मनाची आपली आपल्याच बारकाव्याने  माहिती  हवी.  प्रेमाने माणसाच्या जीवनाला स्निग्धता येते मार्दव-मृदुता येते. म्हणूनच इतर सर्व प्रकारच्या योग  प्रकारां पेक्षा प्रेम व भक्ती  माणसाला भगवंताच्या स्वयंपाक घरापर्यंत घेऊन जाते. इथे स्वार्थ नसेल तर आपल्या चुकांना  ---माफक प्रमाणात--- क्षमाही आहे. लोकांकडून हा प्रकार सहज स्वीकारला  जाण्यामागचे हे हि एक कारण असू शकते.  स्थळ, काळ, वेळ, जात, धर्म, लिंग, देश, कोणतेही बंधन नसलेली सहज आचरणात आणता येईल असा भक्ती हा साधन प्रकार आहे. बुद्धी, मन, आणि शरीराला ज्यास्त  ताण/त्रास न देता अवलंबता येणारा साधन प्रकार. अनुसंधान हा भक्तीचा गाभा आहे अनुसंधान म्हणजे ईश्वराशी जोडले जाण्याच्या साधनेतील सातत्य, अखंडत्व. वास्तविक सर्व विश्व  त्याच्याशी  अखंडपणे जोडलेलेच आहे. किंबहुना तोच हे विश्व आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नसते. असली तरी वारंवार त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो.  त्यामुळे आपणच आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व आठवण करत राहावी लागते. त्या साठी आपल्याला साधन करावे लागते. करता-करविता मी नाही तो आहे. हि सुद्धा जाणीव आपली आपल्याला सतत करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रयत्नशील असणे म्हणजेच अहंकाराचा त्याग करून त्याच्याशी तादात्म्य पावण्याची साधना. क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे दोन्हीही भक्तीत अभिप्रेत आहे. जमेल तेव्हढा जास्तीत ज्यास्त प्रयत्न करून भक्तीचा आनंद अनुभवूया. भक्तीच्या आनंद डोही न्हावून जावूया. नेहमी प्रमाणे काही दिवसांतच पुढचा योग प्रकार सुरु करूया तो पर्यंत रोग आणि त्याची करणे हे चालू राहीलच.            

नवविधा भक्ती ------- ९-आत्मनिवेदन

नवविधा भक्ती ------- ९-आत्मनिवेदन  
कबुली ------- शेवटचा भक्तीचा प्रकार --- माणूस म्हटले कि चूक होणार. कोणताही माणूस अहंभावामुळे आपली चूक कधीच चटकन कबूल करत नाही. आणि चूक कबूल केल्या शिवाय सुधारणे शक्क्य नाही. कारण माझे चुकलेले काहीच नाही तर मग सुधारायचे काय? हा सहज प्रश्न आहे. आत्मनिवेदन म्हणजे भाग्वान्तासमोर आपली चूक कबूल करणे. आणि पुन्हा न करण्ण्याची  हमी देऊन मुक्त होणे. ह्यालाच आत्मनिवेदन म्हणतात इथे आडपडदा न ठेवता सर्व कबुली द्यायची आहे. वास्तविक भाग्वान्तासमोर गुप्त असे काही राहतच नाही. पण आपला प्रांजळपणा सिद्ध करणे ह्या भक्ती मद्ध्ये अभिप्रेत आहे. पुन्हा हि कबुली एकांतात द्यायची आहे. लोकां समोर द्यायला कमीपणा वाटतो तो हि इथे प्रश्न नाही. त्यामुळे भक्तीचा हा प्रकार म्हटल तर अचारायला सोपा आहे. पण तितकाच कठीण आहे कारण चुका करायची माणसाची सवय जायला वेळ लागतो. त्यामुळे कबुली एकांतात द्यायची असली तरीही भगवंत समोर द्यायची असल्याने माणूस झटकन तशीही कबुली द्यायलाही तयार होत नाही हे वास्तव आहे. कारण पुन्हा चूक न करण्याची हमी द्यायची असल्याने, जबाबदारीचे प्रचंड दडपण  माणसाच्या  मनावर येते. कारण जगाला  शहाणपणा  शिकवणे सोपे आहे पण स्वतःच्या मनाला आवरणे अतोनात कठीण आहे ह्याची सुप्त आणि परिपूर्ण जाणीव प्रत्येक माणसाला असते आणि ती  त्याला  झटकन  कबुली देवू देत नाही. हे वास्तव आहे. 
क्रिश्चन  समाजात हा प्रकार प्राधान्याने स्वीकारलेला आढळतो. आणि त्याच बरोबर प्रार्थना प्रकाराला सुद्धा क्रिशन समाजात विशेष स्थान आहे. कारण कबुली आणि प्रार्थना हे एकाच  नाण्याच्या  दोन बाजू आहेत. आपल्याकडे नामाला जितके महत्व आहे इतकेच ह्या समाजात आत्मनिवेदन व प्रार्थना ह्यांना आहे. चर्च मद्ध्ये दरवाज्यातच मद्ध्येच एक लाकडी जाली असते व तिच्या दोहोबाजूला बसायची सोय असते. त्याच्या एका बाजूला धर्मगुरू बसतो व दुसऱ्या बाजूला अत्मानिवेदक बसतो. इथे मात्र तो देवासमोर नाही धर्मगुरू समोर  आपल्या सर्व कर्माची  कबुली देतो. आणि मुक्त - मोकळा होतो. प्रार्थना हा सुद्धा फार प्रभावशाली भक्ती प्रकार आहे. वास्तविक सर्वच धर्मांच्या मद्ध्ये विविध प्रकारच्या प्रार्थना लिहून तयार असतात. बऱ्याच वेळा  त्या पाठ करून म्हणायचा प्रघात असतो. ह्यालाच आपल्याकडे संस्कार असे हि म्हणतात. (वास्तविक संस्कार हा फार मोठ्ठा आणि सखोल विषय आहे तो पुढे कधीतरी येईलच) पण आपण मुलांवर संस्कार करतो आहोत अशा कल्पनेने ज्या प्रार्थना म्हटल्या जातात त्या शरीराला सवय लावण्या पुरत्याच मर्यादित असतात. त्या सहसा मनात खोल जातच नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम फारसा  अनुभवायला येत नाही. पण कठीण प्रसंगी माणूस ज्या वेळी ईश्वरापुढे दीन होतो (लीन नाही) तेव्हा त्याच्या तोंडून पोटतिडीकीने जे काही सहजोद्गार येतात ---- तीच खरी त्याची प्रार्थना असते. ती प्रार्थना कार्य करते. भक्तीचा हा अतिशय सखोल भाव आहे मानाच्या आत आत खोल दडलेले ईश्वरासमोर व्यक्त करून अनन्य शरणागत होणे. आपल्याकडे पूजेच्या शेवटी हे देवा अनन्या असा मी तुला सर्व कुटुंबासहित शरण आलो आहे हि प्रार्थना हा अत्मानिवेदानाचाच प्रकार आहे. आपणही सर्वजण ईश्वराला अनन्य भावाने शरण जाऊन मुक्त आणि आनंदमय होऊन जावूया. भगवंताच्या भक्तिरसात न्हाऊन जावूया शुभं भवतु.

नवविधा भक्ती ------- ८-सक्ख्य,

नवविधा भक्ती ------- ८-सक्ख्य,  
हा भक्तीचा अद्भुत प्रकार आहे. सखा म्हणजे मित्र आणि सखी म्हणजे मैत्रीण. तसे इथे फेसबुक मद्ध्ये अनेक मित्र असतात त्यातले तर ८०-८५ % आपण ओळखतही  नाही. किंवा  शाळा, कॉलेज, ऑफिस मधले सुद्धा बरेच मित्र मैत्रिणी असू शकतात. पण ते सखा किंवा सखी नाहीत. सखा किंवा सखी असणे म्हणजे दोन देह वेगळे असतात पण दोन मने मात्र पूर्णपणे एकच असतात. मागे एकदा माहिती देतांना सिम्प्ठेतिक वाय्ब्रेषण बद्दल लिहिले होते तो हा प्रकार आहे. समविचारी माणसात एकमेकांचे विचार सहज जाणले जातात. मानवी देहात जर आपल्याला असे अनुभव आले तर अशी दोन माणसे मग ते मित्र मैत्रीण कोणाही असोत सखा किंवा सखी असतात ते ईश्वरी भावाच्या जवळ आहेत असे मानायला काही हरकत नाही. कारण विशुद्ध मानाखेरीज हे कदापि शक्क्य नाही. कोणी कुणाला समजून घ्यावे लागत नाही. एकमेकांना एकमेक सहजभावे समजतातच. दोघांच्या एकमेकानमद्ध्ये कोणतेही एकमेकांनी माहित नसलेले गुपित नसतेच मुळी. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी ते एकमेकाबरोबर  असतांना तिसर्या कोणत्याही माणसांनी बोलावयाचे  असल्यास ह्या दोघांपैकी एकाला दूर जायची गरज नसते. अशारितीने मनाने एकरूप होणे म्हणजे सख्य भक्ती.     
ह्याची श्री रामान्संबंधी एक गोष्ट सांगतो. श्री रामांनी युद्धानंतर प्रत्येकाला काहीना काहीतरी दिले आणि पाठवणी केली. हनुमंताला देणे घेणे नव्हतेच. सीतामाई म्हणाल्या आता हा कधी जाणार. त्यावर श्री राम काय उत्तर देणार? तो हनुमानाला म्हणाला बाहेर उभा राहा त्यावर मारुती म्हणाला काम सांगा. त्यावर श्री राम म्हणाले मला जांभई आली तर तू टिचकी वाजवायची. आता हा बाहेर आणि श्री राम आत. त्याने विचार केला रामांना कधी जांभई येईल कसे काय कळणार आपण आपले सतत नाव घेतोच  त्या प्रत्येक नावाबरोबर एक टिचकी वाजवू झाले. पण भक्ताच्या ह्या अतर्क्य वागण्याने आणि त्याचे प्रेम राखण्यासाठी रामानंचा जो आ झाला तो बंदच होईना.
तशीच श्री कृष्णाची गोष्ट आहे नारद म्हणाले अरे भक्त सखा सर्व मी समजू शकतो पण तू त्या अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा हि करतोस हे कसे काय???? (तसे तर नारादाही भगवंताचे उत्तमच भक्त होते.) त्यावर भगवान म्हणजे श्री कृष्ण  नारदाला म्हणाले कि तो आत्ता झोपलाय त्याच्या केसांना कान लाव. नारदाने तसे केले त्यातून श्री कृष्ण श्री कृष्ण नाम ऐकू आले. नारद म्हणाले धन्य तो भक्त. आणि धन्य त्याची भक्ती. भगवंताचे मानवी रूप अवतरी रूप धारण केलेल्या स्थितीत ह्या प्रकारची बरीच उदाहरणे आहेत विशेषतः श्री कृष्णाच्या आयुष्यात राधा, द्रौपदी, ह्या सख्या आणि उद्धव, सात्यकी, अर्जुन हे सखे म्हणजे मननी एकरूप व्यक्तिमत्व होती.  माणसांच्या आयुष्यात हे अशक्य नाही. देवत्व नसले तरी उत्तम मानावत्वाचे  ते लक्षण आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.    

नवविधा भक्ती ------- ७-दास्य,

नवविधा भक्ती ------- ७-दास्य,
माणसाच्या अनेक स्वभावापैकी दास्य हा हि एक स्वभावातील पैलू आहे. त्याला एखाद्याचे दास्य स्वीकारणे अपमानस्पद वाटत नाही. राग मानू नये पण काही जाण स्वभावतःच बरयाच औशी लाचार  असतात. स्वामित्व त्याच्या स्वभावातच नसते. कधी कधी तर अगदी कोणत्याही भूमिकेतून लहानात लहान असलेया व्यक्तीशी सुद्धा हे दास्य वृत्तीने वागतात. अशा स्वभ्वाच्या माणसांना दास्य भक्ती हि सहज सोपी जाते. स्वाभाविकच अश्या माणसांमद्ध्ये अहंकार कमी असतो. त्यामुळे भक्त होणे त्यांना सहज शक्क्य होते. तोच स्वभाव वापरून इथे हे ईश्वरचे दास्य करतात. आणि पूजेच्या माद्ध्यामातून आपली सेवा  ते ईश्वराला अर्पण करतात. अशा प्रकारची माणसे सत्गुरुसेवा  करणे  झटकन  स्वीकारू शकतात. परमार्थी प्रवासात  अंतिम सत्गुरू  लागतोच.  पण असा सत---गुरु आज भेटणे हे खरोखरच कठीण. खऱ्या सत्गुरुची लक्षणे जी स्वामी समर्थांनी दिली  आहेत  ती वाचल्यावर तरी आज कोणी सुबुद्ध माणूस अशा प्रकारचा गुरु करायला पटकन धजणार नाही. गुरु जो पर्यंत आपल्या मनातील दुसऱ्या विषयीची त्वेष बुद्धी नाहीशी करत नाही तो सत्गुरू  असूच शकत नाही मग ती कोणतीही का असे ना. त्यामुळे ह्या वृत्तीचे लोक बऱ्याच  वेळा  फसवले जातात आणि हि स्वतःची झालेली फसवणूक त्यांच्या लक्षात  येईपर्यंत कधी कधी आयुष्य खर्ची जाते. इतकेच काय पण आपण अशा गुरु? कडे जायला लागल्यावर ते लोकांनाहि लगेच तसे करण्याचा आग्रह करू लागतात. अवास्तव  प्रचार  करतात त्याचे एक उदाहरण मी पूर्वी दिले आहे.  थेट ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचीच सेवा केली तर धोके कमी आहेत. पण त्या बाबतीत मानस सेवा मानस पूजा अपेक्षित आहे आणि ती कठीण आहे. मानस सेवा शिकवतांना फसविले जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून एकूणच  हा भक्ती प्रकार बहुतेक वेळा सत्गुरू नावानी मिरवणाऱ्या लोकांच्या शिष्य रुपात जास्त आढळतो. त्यामुळे हा भक्ती प्रकार जरा धोकादायक आहे. सावधान जी काही भक्ती करायची ती थेट ईश्वरावरच करावी हेच खरे.              

नवविधा भक्ती ------- ६-वंदन,

नवविधा भक्ती ------- ६-वंदन,               
वंदन म्हणजे नमस्कार करणे, नमणे. नतमस्तक  होणे, शरण जाणे, वर्चस्व स्वीकारणे,  स्वतःला न्यूनतम  मानणे, म्हणजे वंदन. माणसाने नम्र राहणे हे ह्या प्रकारत अभिप्रेत आहे. कोणत्याही साधना शिवाय नामस्मरणाच्या खालोखाल सहज शक्क्य आणि सोपा असा हा प्रकार आहे. नम्रता हि अशी शक्ती आहे कि बऱ्याच अशक्क्य गोष्टी आपल्या ह्या वृत्तीने सहज साद्ध्य होतात. ज्या गोष्टी ज्ञानाने साधणे शक्य होत नाहीत त्या नम्रतेने सहज शक्क्य होतात. सर्वानविषयी आदर बाळगणे हि वृत्ती व्यवहारालाही फार फार उपयोगी असते. पण बऱ्याच वेळा माणसे दिन होतात पण लीन होत नाहीत. वंदनाने लीनता अंगी येते. मनाला  स्थिरता येते. मानाच्या स्थिरते मूळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे हा भक्ती प्रकार सामाजिक दृष्ट्या हि अत्यंत महत्वाचा आहे. चमत्काराला  नमस्कार  घडतो  असे म्हणतात पण नमस्कारनेहि  चमत्कार घडतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. तो असा कि समोरच्या माणसाची कठोरता नक्की कमी होते. आणि हे खरोखर फार फार कठीण आहे. ते म्हणजे मन पालटणे.  म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी  आपल्या मित्रांना उत्तर दिले कि माणसाचे मन पालटणे फक्त ह्यांनाच (रामकृष्ण पराम्ह्न्सांनाच) शक्क्य होते म्हणूनच तुझ्या दृष्टीने अशिक्षित असणाऱ्या ह्या माणसाला मी गुरु केले. भक्तीने मन पालटत नाही पण मृदू होते अनुकूल सुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपण हि भक्ती नक्की अनुसरावी. आणि अनुभव घ्यावा. नमस्कारात एक हात आपले मन आणि दुसरा हात हे समोरच्याचे मन जोडले जाणे हे अभिप्रेत आहे.  वंदनात मनाचे अर्पण आहे हात जोडले आता माझे काय राहिले? हि भावना ह्या भक्तीप्रकारचे सार आहे.  ईश्वर हा चराचरात भरलेला आहे अर्थात तो यच्चयावत सजीवत आहेच आणि माणसात तो प्रकट होवू शकतो इतक्या उत्कटतेने  व्यापून आहे  म्हणून वारकरी पंथात आपल्याला असे लक्षात येईल कि प्रत्येक समोरच्या माणसाला वंदन करण्याची  प्रथा आहे मग तो वयाने मनाने पैशाने कितीही  लहान  असु दे त्यात ईश्वर आत्मरूपाने भरून आहे ह्या वास्तवाची जाणीव त्या वेळी प्रत्येक माळ-धारकाच्या   मनात वास करत असते. आणि विठ्ठलाकडे  जातांना तर ते लोटांगण घालत जातात. हे लीनातेची पराकोटी आहे. मात्र हे सर्व मनात घडणे ह्याला फार मोठ्ठा अर्थ आहे. त्यातच परमार्थ आहे.           

नवविधा भक्ती ------- ५-अर्चन,

नवविधा भक्ती ------- ५-अर्चन,
अर्चन म्हणजे अर्पण. भक्ती हि सगुण असते. ह्या भक्ती प्रकारात पूजा आहे. पूजा म्हणजे आदर सत्कार. आवाहन वगैरे षोडश उपचार पूजा हे सर्व आले. इथे ईश्वराला म्हणजे आपला जो कोणी देव  आपण  मानत असू त्याला जे जे आवडते ते ते त्याला अर्पण करणे म्हणजे अर्चन भक्ती. हे करता करता भक्त स्वतःला अर्पण करतो. म्हणजेच त्याचे मी पण अर्पण करतो. पूजा हा सगुण भक्तीचा सर्वांना माहित असलेला प्रकार आहे. पूजा प्रकार हा साग्रसांगीत  आहे. हा कर्मकांडाचा एक भाग आहे. पण हे कर्मकांड करत असतांना मनाची स्थिती काय आहे हे आपले आपण जाणीव करून घेणे आवश्यक आहे. भक्तीचे अवडंबर माजविणे हे आपल्यातली ढोंगी वृत्ती दर्शवते. त्यामुळे अत्यंत प्रचलित असून त्या मार्गाने जाणारे  आपल्याला खूप दिसतात त्या मनाने पारमार्थिक प्रगती साधलेले फार फार थोडे असतात. पूजा प्रकारची सविस्तर माहिती मी पूर्वी दिली आहे आणि ती ३-४ दिवस चालली होती पैकी एक लिंक इथे देत आहे.

नवविधा भक्ती ------- ४-पादसेवन,

नवविधा भक्ती ------- ४-पादसेवन,    
चौथी भक्ती पादसेवन. ईश्वरापुढे नतमस्तक होणे. त्याच्या पायाशी राहणे. ईश्वरापुढे स्वतःला न्यूनतम समझने. ज्या माणसांना न्यूनगंड आहे अश्यानसाठी सुद्धा हा प्रकार सोपा पडेल असे म्हटले तर अयोग्य होणार नाही. कारण मी नाही तू. हि भावना ह्या भक्ती प्रकारात प्रबळ आहे. म्हणजे नकारत्मक  विचार करणारा माणूसही ईश्वर भक्ती सहज करू शकतो. साधनेच्या पायारीतील शेवटची पायरी अनन्य शरणागती हीच इथे पाहिली पायरी आहे. अर्थात  बाह्य शरणागती हा आभास असतो. मनाची अनन्न्यता अत्यंत महत्वाची आहे. बाकी काही नको फक्त शरणागत व्हा बाकी सर्व मी म्हणजे ईश्वर पाहून  घेईल. हा ह्या भक्तीचा आदि मद्ध्य आणि अंत आहे. वरवर हा प्रकार साधा सोपा वाटला तरी अंतरात अचारायला अत्यंत कठीण आहे.  कारण सर्वच प्रकारचा शेवट हा अनन्ण्यातेत आहे. हि अनन्न्यातच अत्यंत कठीण. स्वत्वाचे मूळ स्वतःहून नष्ट करणे हे वाटते तितके सोपे नाही. स्वतःचा अहं स्वतःहून नष्ट करणे.      

नवविधा भक्ती ------- ३-नामस्मरण,

नवविधा भक्ती ------- ३-नामस्मरण,      
तिसरी भक्ती नामस्मरण. महाराष्ट्रीय संतांनी ह्या भक्ती प्रकाराला सर्वात ज्यास्त महत्व दिले आहे. त्याला कारणही तसेच आहे.  प्रथम आपण ऐकतो मग ऐकलेले लोकांना सांगतो आणि मग ---- "सहजच" ---- त्याचा ध्यास घेतो, धावा करतो, सतत स्मरण करतो, त्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. सहज निदिद्ध्यास हेच प्रेमाचे लक्षण आहे. हे प्रेम ईश्वरावर करतो तीच भक्ती. ह्यात बेचैनी, विरह वेदना, प्रत्यक्ष भेटीची आस, कडाडून भेटण्याची इच्छा हे सर्व भाव अंतरभूत आहेत. श्रावण भक्ती साठी सांगणारा  किंवा लिहिणारा तरी लागतो. कीर्तन भक्ती साठी कोणीतरी ऐकणारा लागतो. नामस्मरणाला दुसरा कोणी लागत नाही. माझे नाम मी माझ्या  मनात घेतो इथे दुसरा कोणी लागत नाही. नामाला स्थळ, कळ, वेळ, देश, धर्म, जात, लिंग, शौच अशौच कशाचेही बंधन नाही. त्यामुळे भक्ताची मनाची तयारी असल्यास नाम अखंड  चालू  राहू शकते. हे नामाचे महत्व आहे. ह्यालाच अनुसंधान म्हणतात आणि नामाचे हे अखंडत्व राहणे फक्त नामस्मरण भक्तीत शक्य आहे. प्रीयातामचे/ईश्वराचे नाम घेण्यासाठी कधी सांगावे लागत नाही. हे सर्व वास्तव  विचारात घेता भक्तीचा सर्वात प्रभावी, सहज  साद्ध्य, सोपा, सर्व प्रकरच्या माणसांना पेलणारा प्रकार आहे असे  म्हटले  तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून हा भक्ती प्रकार आपल्या समाजात  विशेष  प्रचलित झाला. त्यामुळे नवविधा भक्तीच्या मद्ध्ये हा मुकुट आहे / तुरा आहे.   

नवविधा भक्ती ------- (२-कीर्तन,३-नामस्मरण,) ह्या मद्ध्ये थोडेसे

नवविधा भक्ती ------- (२-कीर्तन,३-नामस्मरण,) ह्या मद्ध्ये थोडेसे   
आज माद्ध्येच एक वेगळ्या विचारवर भाष्य करत आहे कारण काही विनंती आली आणि अशा प्रकरची विनंती शंका कुशंका आल्यावर त्यांचे वेळीच निरसन होणे जास्त योग्य आहे असे मला वाटते म्हणून रोजच्या क्रमशः लिखाणात थोडा खंड  घेवून हे लिहित आहे.  
DNYAN VIDNYAN MANCH (ज्ञान विज्ञान मंच) --- मद्ध्ये  गजानन बोढे गुरूजी Vinayak Phadkeji 'अध्यात्म आणि विज्ञान' यावर एखादी POST टाकल्यास अतीव आनंद होईल ... गुरुजी खरोखर फारच सुंदर अपेक्षा केलीत. आपल्याला अनेक धन्ण्यावाद. आपल्या मुले मी हे लिहायला आज प्रवृत्त झालो.    आपल्याकडे आपले तत्वज्ञान, संस्कृती,  अद्ध्यात्म,  हे विज्ञाननिष्ठ आहे अशी नेहमी ओरड केली जाते. ते तसे खरोखरच आहे पण आपलाच समाजाकडून होणारा   सगळ्यात  कहर म्हणजे. आधुनिक  भौतिक  प्रगत  वैज्ञानिक  शोधांशी ते जोडण्याचा आटापिटा केला जातो. हे माझ्या मते वृथा आहे. कारण एकीकडे आम्ही भोगी नाही असे ठाम प्रतिपादन करतो आणि दुसरीकडे आमचीही भौतिक प्रगती किती आणि कशी आहे ते शोधण्याचा आटापिटा करतो. पूर्वी बोलणाऱ्याच्या सब्दात शाप उश्शाप वर देण्याचे सामर्थ्य होते. स्वतःच्या देहावर आणि मनावर संपूर्ण पणे स्वतःचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे अंमल गाजविणे हे घडत होते. जो माणूस स्वयं सिद्ध असतो तो दुसऱ्याला ताब्यात ठेवू शकतो. ह्या सर्व शक्ती माणसाच्या मनात, विचार, भावना, कल्पना, विवेक बुद्धी, ह्या  रूपाने  वास करत असतात. परमार्थ हे मनाचे विज्ञान आहे. ते देहबुद्धी पासून दूर नेवून मनाला अंतर्मुख करून आत्मबुद्धी अवलंबायला शिकवते. मग त्या आपल्याच मनात उतरून काय शोध  लागतात ते पाहणे म्हणजेच परमार्थ. असे असतातंना भौतिक प्रगतिशी त्याची सांगड घालण्याचा आटापिटा करण्याची काहीच गरज नाही, नाही का? किंबहुना त्या शक्ती  घालवल्या  मुळेच माणूस आज जनावाराहून हीन होत गेला. आत असलेल्या शक्तीचा शोध घ्यायचे सोडून तो बाहेरून शक्ती, आधार, मदत, मिळवायच्या मागे लागला आणि मानसिक  दृष्ट्या  अपंग  झाला. लाचार झाला भिकारी झाला. त्यात आमची संस्कृती भोगी नाही असे ओरडून ओरडून प्रत्यक्षात मात्र भौतिक शोधान्न्च्या मागे लागतो ह्या पेक्षा वेगळी विसंगती नाही. का ह्याला ढोंगी पणा म्हणायचे? ते आपणच आपले ठरवावे. मानवी देह हा पंचा महा भूतानंचा बनला आहे. त्यामुळे त्या पंचा महा भुतानचं सर्व शक्ती व गुणधर्म मानवी देहातही  सदैव वास करून आहेत. त्याचा शोध घेणे अधिक शक्तीशाली आहे. त्याने मानवता अधिक वाढीला लागेल. पर्मार्ठीकता म्हणजे मानवी मनाची उत्क्रांती आहे. त्यात जे साधते ते देवादिकांनाही  साधत नाही. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेत स्पष्ट सांगितले होते कि. तुमचे प्रचंड वाटणारे भौतिक शोध हे मानवी मानाच्या  अंतर्मनात  लागणाऱ्या  शोधांचे  मंद  प्रतिध्वनी आहेत. ह्याच वाक्याने मी आयुष्यभर प्रभावित  होऊन त्या दृष्टीने विचार करू लागलो आणि कोणत्याही धार्मिक संस्कार मागे मानाच्या  सहज  शक्ती कश्या  वापरल्या जात  असाव्यात ह्याचा तर्कबुद्धीने शोध घेत गेलो त्यातूनच आजवर मी माझे सर्वच लिखाण करत आलो आहे. हे माणसाच्या मनाचे विज्ञान आहे ज्यावर सर्व अध्यात्म  आधरलेले आहे. हा एक दृष्टीकोन आहे जो मी अहं म्हणून सांगत नाही पण आजवर माझ्या तरी कधी वाचनात आलेला नाही म्हणून मी लिहिण्याचे धाडस केले.    

नवविधा भक्ती ------- २-कीर्तन,

नवविधा भक्ती ------- २-कीर्तन,  
दुसरी भक्ती कीर्तन. आपल्याला जे आवडते ते दुसऱ्याला सांगितल्या शिवाय माणसाला चैन पडत नाही. इथे फेस बुक वर पहा. एखाद्या पोस्ट वर कॉमेंट्स  टाकतांना सुद्धा कित्येक जण निव्वळ कॉमेंट्स न टाकता आपले संपूर्ण अनुभव किंवा वाचलेले इथे सदर करतो. ह्या सहज स्वभावामुळे. जेजे ऐकले तेते सांगावे, रंजक करून सांगावे जेणेकरून दुसऱ्यासही  ते मनोमनी आवडेल ह्या नाम कीर्तन. मात्र इथे हे सर्व काही सांगणे असते ते सर्व ईश्वरासंबंधी असते. त्याचे गुण, रूप, कार्य, आवड निवडी, सर्व काही तो भक्त दुसऱ्याला सांगतो, त्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. हीच कीर्तन भक्ती. कीर्तन हे रंजक असते. कीर्तनात  संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, वक्तृत्व आहे, प्रतिभा असणेही अपेक्षित आहे, हे सर्व गुण कीर्तनकाराच्या अंगी असणे आवश्यक आहे कि ज्या मुळे.  ऐकणाऱ्यावर   त्याचा उत्तम प्रभाव पडेल. हा भक्त सतत ईश्वरचे गुणगान लोकांना सांगत कीर्तन भक्ती सिद्ध करतो. हे त्याचे सांगणे संपतच नाही कारण त्याच्या मनात सतत आपल्या ईश्वराचेच विचार येत असतात. सगुण ईश्वर तर सर्व गुण संपन्न आहे. त्यामुळे त्याची गुण सांगून सांगून संपतच नाहीत त्यामुळे कीर्तनातून त्याची भक्ती सतत सुरु राहते.     

नवविधा भक्ती ------- १-श्रवण

नवविधा भक्ती ------- १-श्रवण
पाहिली भक्ती श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये आहेत. पण ज्ञान मिळवण्याची  सुरुवात दृष्य आणि श्रवण म्हणजे डोळे आणि कान ह्याने होते. त्यात हि कानाने म्हणजे ऐकून ज्ञान संपादनाची क्रिया  सर्वात आधी सुरु होते. इतकेच काय गर्भावस्थेत आईच्या  कानावर  पाडणाऱ्या  शब्दांचाहि परिणाम गर्भावर होत असतो. आता तर हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच श्रवणाने ग्रहण केलेले ज्ञान दीर्घ काळ स्मरणात राहते. म्हणून श्रावण हा भक्तीचा पहिला प्रकार ठरला. इथे भक्त ईश्वराचे गुणगान ऐकतो. त्याचे विचार ऐकून आत्मसात करतो. जिथे जिथे म्हणून ईश्वराचे  ईश्वराच्या नामाने कोणतेही कार्य चालले असेल ते श्रावणाच्या माद्ध्यामातून त्याला कळले तरी तो त्यात संतुष्ट होतो. ईश्वराबद्दलचे जे जे काही विचार ऐकायला मिळतील ते आपल्या र्हुदयात साठवून ठेवतो. श्रावण माद्ध्यमाने ईश्वराशी सतत अनुसंधान ठेवतो.    

नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन

नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन     
आत्तापर्यंत आपण साधनेचे चार योग प्रकार पाहिले. प्रेम योगाची माहिती मागे झाली. आता भक्ती म्हणजे काय ते पाहू. विविध वैचारिकते प्रमाणे नऊ प्रकारे भक्ती करता येते, यालाच नवविधा भक्ती असे म्हटले आहे. मराठी संतांनी भक्तीला सर्वात जास्त महत्व दिले आहे.  भक्ती हि खरोखरच अद्भुत  आहे. इतर साधक ईश्वराच्या  दिवाणखाण्या  पर्यंत जातात. पण भक्त थेट (डायरेक्ट) भगवंताच्या स्वयंपाकघरात जातो.  हे भक्तीचे सामर्थ्य आहे. प्रेम आणि भक्ती तसे वेगळे नाही. जे प्रेम माणसावर  केले जाते तेच प्रेम ईश्वरावर केले कि त्याला भक्ती म्हणतात. भक्त म्हणजे विभक्त नाही तो भक्त. ईश्वराशी सतत जोडलेला. पण एकरूप होत नाही. भक्ताला अद्वैत मानण्य नाही. तो ईश्वराशी द्वैत ठेऊन त्याचा सखा बनू पाहतो. त्याला समोरासमोर भेटू इच्छितो. आलिंगन देवू  इच्छितो. त्याशिवाय त्याला समाधान होत नाही. म्हणजे दोघेही मनाने एक असले तरी देहाने वेगळेच असावे असे नेहमी भक्ताला वाटते. ज्ञानी मात्र ज्ञानाने संतुष्ट होतो. पण भक्त? -------- इच्छा समूळ नष्ट होणे, मुक्त होणे हे भक्ताला मान्य नाही. तो देहाने वेगळाच राहू इच्छितो.   म्हणून तर संत तुकाराम  महाराज म्हणतात, मला मुक्ती नको. जर तुझी भक्ती मला  कायम लाभणार  असेल तर मी कितीही वेळा गर्भवास भोगण्यास तयार आहे. मानवी देह हा  सर्वात जास्त मोह पडणारा आहे. त्यामुळे बाकी वासना जश्या ह्या देहात अधिक तरलतेने अनुभवता येतात तश्या इतर योनीत त्या येत नाहीत. हाच  नियम  वासानाविरहित भक्तीला हि लागू होतो.  भक्तीचा आणखी एक अद्भुत गुण म्हणजे लौकिकात भक्त ईश्वराचा दास दिसतो. पण प्रत्यक्षात इथे ईश्वरच  भक्ताचा  दास होतो. हे भक्तीचे सर्वात मोठ्ठे  रहस्य  आहे.