नवविधा भक्ती ------- ७-दास्य,
माणसाच्या अनेक स्वभावापैकी दास्य हा हि एक स्वभावातील पैलू आहे. त्याला एखाद्याचे दास्य स्वीकारणे अपमानस्पद वाटत नाही. राग मानू नये पण काही जाण स्वभावतःच बरयाच औशी लाचार असतात. स्वामित्व त्याच्या स्वभावातच नसते. कधी कधी तर अगदी कोणत्याही भूमिकेतून लहानात लहान असलेया व्यक्तीशी सुद्धा हे दास्य वृत्तीने वागतात. अशा स्वभ्वाच्या माणसांना दास्य भक्ती हि सहज सोपी जाते. स्वाभाविकच अश्या माणसांमद्ध्ये अहंकार कमी असतो. त्यामुळे भक्त होणे त्यांना सहज शक्क्य होते. तोच स्वभाव वापरून इथे हे ईश्वरचे दास्य करतात. आणि पूजेच्या माद्ध्यामातून आपली सेवा ते ईश्वराला अर्पण करतात. अशा प्रकारची माणसे सत्गुरुसेवा करणे झटकन स्वीकारू शकतात. परमार्थी प्रवासात अंतिम सत्गुरू लागतोच. पण असा सत---गुरु आज भेटणे हे खरोखरच कठीण. खऱ्या सत्गुरुची लक्षणे जी स्वामी समर्थांनी दिली आहेत ती वाचल्यावर तरी आज कोणी सुबुद्ध माणूस अशा प्रकारचा गुरु करायला पटकन धजणार नाही. गुरु जो पर्यंत आपल्या मनातील दुसऱ्या विषयीची त्वेष बुद्धी नाहीशी करत नाही तो सत्गुरू असूच शकत नाही मग ती कोणतीही का असे ना. त्यामुळे ह्या वृत्तीचे लोक बऱ्याच वेळा फसवले जातात आणि हि स्वतःची झालेली फसवणूक त्यांच्या लक्षात येईपर्यंत कधी कधी आयुष्य खर्ची जाते. इतकेच काय पण आपण अशा गुरु? कडे जायला लागल्यावर ते लोकांनाहि लगेच तसे करण्याचा आग्रह करू लागतात. अवास्तव प्रचार करतात त्याचे एक उदाहरण मी पूर्वी दिले आहे. थेट ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचीच सेवा केली तर धोके कमी आहेत. पण त्या बाबतीत मानस सेवा मानस पूजा अपेक्षित आहे आणि ती कठीण आहे. मानस सेवा शिकवतांना फसविले जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून एकूणच हा भक्ती प्रकार बहुतेक वेळा सत्गुरू नावानी मिरवणाऱ्या लोकांच्या शिष्य रुपात जास्त आढळतो. त्यामुळे हा भक्ती प्रकार जरा धोकादायक आहे. सावधान जी काही भक्ती करायची ती थेट ईश्वरावरच करावी हेच खरे.
No comments:
Post a Comment