नवविधा भक्ती ------- ४-पादसेवन,
चौथी भक्ती पादसेवन. ईश्वरापुढे नतमस्तक होणे. त्याच्या पायाशी राहणे. ईश्वरापुढे स्वतःला न्यूनतम समझने. ज्या माणसांना न्यूनगंड आहे अश्यानसाठी सुद्धा हा प्रकार सोपा पडेल असे म्हटले तर अयोग्य होणार नाही. कारण मी नाही तू. हि भावना ह्या भक्ती प्रकारात प्रबळ आहे. म्हणजे नकारत्मक विचार करणारा माणूसही ईश्वर भक्ती सहज करू शकतो. साधनेच्या पायारीतील शेवटची पायरी अनन्य शरणागती हीच इथे पाहिली पायरी आहे. अर्थात बाह्य शरणागती हा आभास असतो. मनाची अनन्न्यता अत्यंत महत्वाची आहे. बाकी काही नको फक्त शरणागत व्हा बाकी सर्व मी म्हणजे ईश्वर पाहून घेईल. हा ह्या भक्तीचा आदि मद्ध्य आणि अंत आहे. वरवर हा प्रकार साधा सोपा वाटला तरी अंतरात अचारायला अत्यंत कठीण आहे. कारण सर्वच प्रकारचा शेवट हा अनन्ण्यातेत आहे. हि अनन्न्यातच अत्यंत कठीण. स्वत्वाचे मूळ स्वतःहून नष्ट करणे हे वाटते तितके सोपे नाही. स्वतःचा अहं स्वतःहून नष्ट करणे.
No comments:
Post a Comment