Monday, 26 March 2012

नवविधा भक्ती ------- १-श्रवण

नवविधा भक्ती ------- १-श्रवण
पाहिली भक्ती श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये आहेत. पण ज्ञान मिळवण्याची  सुरुवात दृष्य आणि श्रवण म्हणजे डोळे आणि कान ह्याने होते. त्यात हि कानाने म्हणजे ऐकून ज्ञान संपादनाची क्रिया  सर्वात आधी सुरु होते. इतकेच काय गर्भावस्थेत आईच्या  कानावर  पाडणाऱ्या  शब्दांचाहि परिणाम गर्भावर होत असतो. आता तर हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच श्रवणाने ग्रहण केलेले ज्ञान दीर्घ काळ स्मरणात राहते. म्हणून श्रावण हा भक्तीचा पहिला प्रकार ठरला. इथे भक्त ईश्वराचे गुणगान ऐकतो. त्याचे विचार ऐकून आत्मसात करतो. जिथे जिथे म्हणून ईश्वराचे  ईश्वराच्या नामाने कोणतेही कार्य चालले असेल ते श्रावणाच्या माद्ध्यामातून त्याला कळले तरी तो त्यात संतुष्ट होतो. ईश्वराबद्दलचे जे जे काही विचार ऐकायला मिळतील ते आपल्या र्हुदयात साठवून ठेवतो. श्रावण माद्ध्यमाने ईश्वराशी सतत अनुसंधान ठेवतो.    

No comments:

Post a Comment