Monday, 26 March 2012

षड्रिपू प्रेम --- ब --- वास्तविक हे तथाकथित षड्रीपुच आपल्याला प्रेम करायला लावतात.

षड्रिपू प्रेम --- ब --- वास्तविक हे तथाकथित षड्रीपुच आपल्याला प्रेम करायला लावतात. म्हणजेच आपल्या मनाला दृश्याकडे ओढतात. कसे? ते समजण्यासाठी आपल्याला ते खरोखर कसे आहेत ते समजून घ्यायलाच हवे. हि गम्मत आहे नाही??? माणसाला त्याचे शरीर दत्त म्हणून मिळालेले आहे तसेच हे आपण ज्यांना रिपू म्हणतो ते हि दत्त म्हणूनच मिळालेले आहेत. मग देह मात्र आवडतो  आणि हे मात्र रिपू, हा सवतीमत्सर का?  हा प्रश्न मला पडला. आणि वाटले हि हि कदाचित माणसांच्या विचारातील  विसंगती आहे,  म्हणून अभ्यास करण्याच्या दृष्टीने मी फक्त ह्या तथाकथित रीपुंचा क्रम बदलून लिहितो म्हणजे माझे म्हणणे काय आहे आणि त्यांचे वेगळेपण नेमके कशात आहे ते लक्षात येते का ते पाहूया. मुळ क्रम --- १ काम २ क्रोध ३ लोभ ४ मोह ५ मद ६ मत्सर आणि नवीन क्रम पुढे पहा. 
अ) १) काम -----------ब) २) क्रोध, ३) मद, ४) मत्सर ------------क) ५) लोभ, ६) मोह
अ) काम हा नाना विकारी आहे असे समर्थ म्हणतात. म्हणजे काम (वासना) अनेक प्रकारचे विकार निर्माण करते. लोकापवाद निर्माण होतात.  काम हा इतर सर्वांचा कर्ता आहे.
ब) क्रोध, मद, मत्सर हे दुसऱ्याला ताबडतोप त्रास देतात. सर्वत्र दुरावा भेद निर्माण करतात. म्हणजे कौटुंबिक व सामाजिक कलहास तातडीने कारणीभूत होतात. तातडीने दुसऱ्याला  त्रासदायक होतात. तर मग "पुण्य पर उपकार, पाप ते पर पिडा"  हे संत तुकारामांचे वाक्य ग्राह्य धरले तर त्या न्यायाने माणसाकडून सरळ सरळ पापकर्म घडवतात. ह्यातील मद हा इतर सर्वांचा आधार आहे, त्याच्या आधारावर इतर सर्व आपल्या मनावर राज्ज्य करतात. म्हणून मी पण टाकता आले तर परमार्थ जमला असे नक्की म्हणायला हरकत नाही. हे परमार्थाचे सार आहे परमार्थाचा शेवटचा टप्पा आहे. ऐकायला सोपा वाटला तरी अचारायला महा कर्म कठीण आहे.   
क) लोभ आणि मोह हे दोन्हीही आकर्षणाचे प्रकार आहेत  एक बहिर्गामी दुसरे अंतर गामी आकर्षण. हे व्यक्तीला स्वार्थी बनवतात. माणुसकी पासून खाली खेचतात.  
हे झाले त्यांचे रीपुपण. त्यांचे हे सर्व गुण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. तरी मी त्यांना रिपू म्हणत नाही कारण हेच प्रेम करायलाही प्रवृत्त करतात हे हि नाकारता येत नाही. कसे ते पुढे पाहू. कारण प्रत्येक सर्व समान्न्या माणूस हा ह्यांच्या मुळेच प्रथम प्रेम करतो. हे कधीही नाकारता येणार नाही.    

No comments:

Post a Comment