नवविधा भक्ती ------- ९-आत्मनिवेदन
कबुली ------- शेवटचा भक्तीचा प्रकार --- माणूस म्हटले कि चूक होणार. कोणताही माणूस अहंभावामुळे आपली चूक कधीच चटकन कबूल करत नाही. आणि चूक कबूल केल्या शिवाय सुधारणे शक्क्य नाही. कारण माझे चुकलेले काहीच नाही तर मग सुधारायचे काय? हा सहज प्रश्न आहे. आत्मनिवेदन म्हणजे भाग्वान्तासमोर आपली चूक कबूल करणे. आणि पुन्हा न करण्ण्याची हमी देऊन मुक्त होणे. ह्यालाच आत्मनिवेदन म्हणतात इथे आडपडदा न ठेवता सर्व कबुली द्यायची आहे. वास्तविक भाग्वान्तासमोर गुप्त असे काही राहतच नाही. पण आपला प्रांजळपणा सिद्ध करणे ह्या भक्ती मद्ध्ये अभिप्रेत आहे. पुन्हा हि कबुली एकांतात द्यायची आहे. लोकां समोर द्यायला कमीपणा वाटतो तो हि इथे प्रश्न नाही. त्यामुळे भक्तीचा हा प्रकार म्हटल तर अचारायला सोपा आहे. पण तितकाच कठीण आहे कारण चुका करायची माणसाची सवय जायला वेळ लागतो. त्यामुळे कबुली एकांतात द्यायची असली तरीही भगवंत समोर द्यायची असल्याने माणूस झटकन तशीही कबुली द्यायलाही तयार होत नाही हे वास्तव आहे. कारण पुन्हा चूक न करण्याची हमी द्यायची असल्याने, जबाबदारीचे प्रचंड दडपण माणसाच्या मनावर येते. कारण जगाला शहाणपणा शिकवणे सोपे आहे पण स्वतःच्या मनाला आवरणे अतोनात कठीण आहे ह्याची सुप्त आणि परिपूर्ण जाणीव प्रत्येक माणसाला असते आणि ती त्याला झटकन कबुली देवू देत नाही. हे वास्तव आहे.
क्रिश्चन समाजात हा प्रकार प्राधान्याने स्वीकारलेला आढळतो. आणि त्याच बरोबर प्रार्थना प्रकाराला सुद्धा क्रिशन समाजात विशेष स्थान आहे. कारण कबुली आणि प्रार्थना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याकडे नामाला जितके महत्व आहे इतकेच ह्या समाजात आत्मनिवेदन व प्रार्थना ह्यांना आहे. चर्च मद्ध्ये दरवाज्यातच मद्ध्येच एक लाकडी जाली असते व तिच्या दोहोबाजूला बसायची सोय असते. त्याच्या एका बाजूला धर्मगुरू बसतो व दुसऱ्या बाजूला अत्मानिवेदक बसतो. इथे मात्र तो देवासमोर नाही धर्मगुरू समोर आपल्या सर्व कर्माची कबुली देतो. आणि मुक्त - मोकळा होतो. प्रार्थना हा सुद्धा फार प्रभावशाली भक्ती प्रकार आहे. वास्तविक सर्वच धर्मांच्या मद्ध्ये विविध प्रकारच्या प्रार्थना लिहून तयार असतात. बऱ्याच वेळा त्या पाठ करून म्हणायचा प्रघात असतो. ह्यालाच आपल्याकडे संस्कार असे हि म्हणतात. (वास्तविक संस्कार हा फार मोठ्ठा आणि सखोल विषय आहे तो पुढे कधीतरी येईलच) पण आपण मुलांवर संस्कार करतो आहोत अशा कल्पनेने ज्या प्रार्थना म्हटल्या जातात त्या शरीराला सवय लावण्या पुरत्याच मर्यादित असतात. त्या सहसा मनात खोल जातच नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम फारसा अनुभवायला येत नाही. पण कठीण प्रसंगी माणूस ज्या वेळी ईश्वरापुढे दीन होतो (लीन नाही) तेव्हा त्याच्या तोंडून पोटतिडीकीने जे काही सहजोद्गार येतात ---- तीच खरी त्याची प्रार्थना असते. ती प्रार्थना कार्य करते. भक्तीचा हा अतिशय सखोल भाव आहे मानाच्या आत आत खोल दडलेले ईश्वरासमोर व्यक्त करून अनन्य शरणागत होणे. आपल्याकडे पूजेच्या शेवटी हे देवा अनन्या असा मी तुला सर्व कुटुंबासहित शरण आलो आहे हि प्रार्थना हा अत्मानिवेदानाचाच प्रकार आहे. आपणही सर्वजण ईश्वराला अनन्य भावाने शरण जाऊन मुक्त आणि आनंदमय होऊन जावूया. भगवंताच्या भक्तिरसात न्हाऊन जावूया शुभं भवतु.
No comments:
Post a Comment