नवविधा भक्ती ------- २-कीर्तन,
दुसरी भक्ती कीर्तन. आपल्याला जे आवडते ते दुसऱ्याला सांगितल्या शिवाय माणसाला चैन पडत नाही. इथे फेस बुक वर पहा. एखाद्या पोस्ट वर कॉमेंट्स टाकतांना सुद्धा कित्येक जण निव्वळ कॉमेंट्स न टाकता आपले संपूर्ण अनुभव किंवा वाचलेले इथे सदर करतो. ह्या सहज स्वभावामुळे. जेजे ऐकले तेते सांगावे, रंजक करून सांगावे जेणेकरून दुसऱ्यासही ते मनोमनी आवडेल ह्या नाम कीर्तन. मात्र इथे हे सर्व काही सांगणे असते ते सर्व ईश्वरासंबंधी असते. त्याचे गुण, रूप, कार्य, आवड निवडी, सर्व काही तो भक्त दुसऱ्याला सांगतो, त्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. हीच कीर्तन भक्ती. कीर्तन हे रंजक असते. कीर्तनात संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, वक्तृत्व आहे, प्रतिभा असणेही अपेक्षित आहे, हे सर्व गुण कीर्तनकाराच्या अंगी असणे आवश्यक आहे कि ज्या मुळे. ऐकणाऱ्यावर त्याचा उत्तम प्रभाव पडेल. हा भक्त सतत ईश्वरचे गुणगान लोकांना सांगत कीर्तन भक्ती सिद्ध करतो. हे त्याचे सांगणे संपतच नाही कारण त्याच्या मनात सतत आपल्या ईश्वराचेच विचार येत असतात. सगुण ईश्वर तर सर्व गुण संपन्न आहे. त्यामुळे त्याची गुण सांगून सांगून संपतच नाहीत त्यामुळे कीर्तनातून त्याची भक्ती सतत सुरु राहते.
No comments:
Post a Comment