नवविधा भक्ती ------- ६-वंदन,
वंदन म्हणजे नमस्कार करणे, नमणे. नतमस्तक होणे, शरण जाणे, वर्चस्व स्वीकारणे, स्वतःला न्यूनतम मानणे, म्हणजे वंदन. माणसाने नम्र राहणे हे ह्या प्रकारत अभिप्रेत आहे. कोणत्याही साधना शिवाय नामस्मरणाच्या खालोखाल सहज शक्क्य आणि सोपा असा हा प्रकार आहे. नम्रता हि अशी शक्ती आहे कि बऱ्याच अशक्क्य गोष्टी आपल्या ह्या वृत्तीने सहज साद्ध्य होतात. ज्या गोष्टी ज्ञानाने साधणे शक्य होत नाहीत त्या नम्रतेने सहज शक्क्य होतात. सर्वानविषयी आदर बाळगणे हि वृत्ती व्यवहारालाही फार फार उपयोगी असते. पण बऱ्याच वेळा माणसे दिन होतात पण लीन होत नाहीत. वंदनाने लीनता अंगी येते. मनाला स्थिरता येते. मानाच्या स्थिरते मूळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे हा भक्ती प्रकार सामाजिक दृष्ट्या हि अत्यंत महत्वाचा आहे. चमत्काराला नमस्कार घडतो असे म्हणतात पण नमस्कारनेहि चमत्कार घडतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. तो असा कि समोरच्या माणसाची कठोरता नक्की कमी होते. आणि हे खरोखर फार फार कठीण आहे. ते म्हणजे मन पालटणे. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी आपल्या मित्रांना उत्तर दिले कि माणसाचे मन पालटणे फक्त ह्यांनाच (रामकृष्ण पराम्ह्न्सांनाच) शक्क्य होते म्हणूनच तुझ्या दृष्टीने अशिक्षित असणाऱ्या ह्या माणसाला मी गुरु केले. भक्तीने मन पालटत नाही पण मृदू होते अनुकूल सुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपण हि भक्ती नक्की अनुसरावी. आणि अनुभव घ्यावा. नमस्कारात एक हात आपले मन आणि दुसरा हात हे समोरच्याचे मन जोडले जाणे हे अभिप्रेत आहे. वंदनात मनाचे अर्पण आहे हात जोडले आता माझे काय राहिले? हि भावना ह्या भक्तीप्रकारचे सार आहे. ईश्वर हा चराचरात भरलेला आहे अर्थात तो यच्चयावत सजीवत आहेच आणि माणसात तो प्रकट होवू शकतो इतक्या उत्कटतेने व्यापून आहे म्हणून वारकरी पंथात आपल्याला असे लक्षात येईल कि प्रत्येक समोरच्या माणसाला वंदन करण्याची प्रथा आहे मग तो वयाने मनाने पैशाने कितीही लहान असु दे त्यात ईश्वर आत्मरूपाने भरून आहे ह्या वास्तवाची जाणीव त्या वेळी प्रत्येक माळ-धारकाच्या मनात वास करत असते. आणि विठ्ठलाकडे जातांना तर ते लोटांगण घालत जातात. हे लीनातेची पराकोटी आहे. मात्र हे सर्व मनात घडणे ह्याला फार मोठ्ठा अर्थ आहे. त्यातच परमार्थ आहे.
No comments:
Post a Comment