षड्रिपू प्रेम --- ड --- प्रेम प्रेम म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींमधले आकर्षण - ओढ. सकारण किंवा आकारण ओढ म्हणजे प्रेम. हि झाली प्रेमाची शास्त्रीय व्याख्या. ऐकायला जरा रुक्ष वाटेल पण सत्य आहे. यच्चयावत विश्व ह्या ओढीवर प्रेमावर तर पर्स्परांभोवती फिरते आहे. हि त्या विश्वशाक्तीची लीला आहे. क्षणभरही थांबत नाही. थांबला कि संपला. ओढ संपली म्हजेच प्रेम संपले. आणि प्रेम संपले म्हणजे सर्व विखुरले जाईल भुगा होऊन जाईल. हे खरे आणि वैज्ञानिक सत्य आहे. ह्याच एका प्रमुख शक्ती मूळे आपण पृथ्वीला प्रेमाचा आदर्श म्हणजेच आई / जननी म्हणतो. कल्पना करा हे आकर्षण नसत तर?? तर आपल अस्तित्व असून भरकटले असते. आपण लाथा मारतो खणतो तिचा वाट्टेल तसा वापर करतो तरी ती आपल्याला दूर लोटत नाही हे प्रेम तिची ओढ. म्हणूनच हि जाणीव आपल्याला कायम निदान रोज एकदा तरी हवी. कारण तिला तिच्या प्रेमाची नुसती जाणीव पुरेशी आहे. तिला कोणत्याच प्रकारच्या परत फेडीची अपेक्षा नाही. ती जाणीव म्हणजेच आपले प्रेमाच्या प्रतिसादाची जाणीव/अपेक्षा. माणसाने कितीही दुर्लक्ष केले तरी अखंड आपल्याकडे ओढ ठेवणे हि ओढ म्हणजेच अपेक्षाविरहित प्रेम रीपुंनी जराही लिप्त नसलेले प्रेम. हे फलदायी होणार नाही??? श्री रामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे ईश्वर आणि माणूस ह्याचे नाते लोहचुंबक आणि लोखंडाच्या नात्या सारखे आहे. लोखंडाला/आपल्याला गंज/रीपुगंज असतो त्यामुळे गंजलेले लोखंड/आपण ईश्वराकडे ओढले जात नाही. आपला रीपुगंज गेला तर आपण क्षणात त्याच्याकडे ओढले जाऊ त्याला चिकटून जाऊ. क्षणभर हि दूर राह्हुच शकणार नाही.
No comments:
Post a Comment