नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन
आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल कि कोणत्याही माणसाला भक्तीच्या मार्गाने भगवंताशी एकरूप होऊन राहणे शक्क्य आहे. त्या भक्तीतही नऊ प्रकार आहेत. माणसांच्या मानाच्या विविध प्रवृत्तीनुसार ते विचारात घेतले गेलेले दिसतात. जे मन उन्मन (उन्माद नव्हे) करून भगवंताशी जोडायचे आहे, तादात्म्य पाववायचे आहे, त्या मनाची आपली आपल्याच बारकाव्याने
माहिती हवी. प्रेमाने माणसाच्या जीवनाला स्निग्धता येते मार्दव-मृदुता येते. म्हणूनच इतर सर्व प्रकारच्या योग प्रकारां पेक्षा प्रेम व भक्ती माणसाला भगवंताच्या स्वयंपाक घरापर्यंत घेऊन जाते. इथे स्वार्थ नसेल तर आपल्या चुकांना ---माफक प्रमाणात--- क्षमाही आहे. लोकांकडून हा प्रकार सहज स्वीकारला जाण्यामागचे हे हि एक कारण असू शकते. स्थळ, काळ, वेळ, जात, धर्म, लिंग, देश, कोणतेही बंधन नसलेली सहज आचरणात आणता येईल असा भक्ती हा साधन प्रकार आहे. बुद्धी, मन, आणि शरीराला ज्यास्त ताण/त्रास न देता अवलंबता येणारा साधन प्रकार. अनुसंधान हा भक्तीचा गाभा आहे अनुसंधान म्हणजे ईश्वराशी जोडले जाण्याच्या साधनेतील सातत्य, अखंडत्व. वास्तविक सर्व विश्व त्याच्याशी अखंडपणे जोडलेलेच आहे. किंबहुना तोच हे विश्व आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नसते. असली तरी वारंवार त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे आपणच आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व आठवण करत राहावी लागते. त्या साठी आपल्याला साधन करावे लागते. करता-करविता मी नाही तो आहे. हि सुद्धा जाणीव आपली आपल्याला सतत करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रयत्नशील असणे म्हणजेच अहंकाराचा त्याग करून त्याच्याशी तादात्म्य पावण्याची साधना. क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे दोन्हीही भक्तीत अभिप्रेत आहे. जमेल तेव्हढा जास्तीत ज्यास्त प्रयत्न करून भक्तीचा आनंद अनुभवूया. भक्तीच्या आनंद डोही न्हावून जावूया. नेहमी प्रमाणे काही दिवसांतच पुढचा योग प्रकार सुरु करूया तो पर्यंत रोग आणि त्याची करणे हे चालू राहीलच.
No comments:
Post a Comment