नवविधा भक्ती ------- ८-सक्ख्य,
हा भक्तीचा अद्भुत प्रकार आहे. सखा म्हणजे मित्र आणि सखी म्हणजे मैत्रीण. तसे इथे फेसबुक मद्ध्ये अनेक मित्र असतात त्यातले तर ८०-८५ % आपण ओळखतही नाही. किंवा शाळा, कॉलेज, ऑफिस मधले सुद्धा बरेच मित्र मैत्रिणी असू शकतात. पण ते सखा किंवा सखी नाहीत. सखा किंवा सखी असणे म्हणजे दोन देह वेगळे असतात पण दोन मने मात्र पूर्णपणे एकच असतात. मागे एकदा माहिती देतांना सिम्प्ठेतिक वाय्ब्रेषण बद्दल लिहिले होते तो हा प्रकार आहे. समविचारी माणसात एकमेकांचे विचार सहज जाणले जातात. मानवी देहात जर आपल्याला असे अनुभव आले तर अशी दोन माणसे मग ते मित्र मैत्रीण कोणाही असोत सखा किंवा सखी असतात ते ईश्वरी भावाच्या जवळ आहेत असे मानायला काही हरकत नाही. कारण विशुद्ध मानाखेरीज हे कदापि शक्क्य नाही. कोणी कुणाला समजून घ्यावे लागत नाही. एकमेकांना एकमेक सहजभावे समजतातच. दोघांच्या एकमेकानमद्ध्ये कोणतेही एकमेकांनी माहित नसलेले गुपित नसतेच मुळी. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी ते एकमेकाबरोबर असतांना तिसर्या कोणत्याही माणसांनी बोलावयाचे असल्यास ह्या दोघांपैकी एकाला दूर जायची गरज नसते. अशारितीने मनाने एकरूप होणे म्हणजे सख्य भक्ती.
ह्याची श्री रामान्संबंधी एक गोष्ट सांगतो. श्री रामांनी युद्धानंतर प्रत्येकाला काहीना काहीतरी दिले आणि पाठवणी केली. हनुमंताला देणे घेणे नव्हतेच. सीतामाई म्हणाल्या आता हा कधी जाणार. त्यावर श्री राम काय उत्तर देणार? तो हनुमानाला म्हणाला बाहेर उभा राहा त्यावर मारुती म्हणाला काम सांगा. त्यावर श्री राम म्हणाले मला जांभई आली तर तू टिचकी वाजवायची. आता हा बाहेर आणि श्री राम आत. त्याने विचार केला रामांना कधी जांभई येईल कसे काय कळणार आपण आपले सतत नाव घेतोच त्या प्रत्येक नावाबरोबर एक टिचकी वाजवू झाले. पण भक्ताच्या ह्या अतर्क्य वागण्याने आणि त्याचे प्रेम राखण्यासाठी रामानंचा जो आ झाला तो बंदच होईना.
तशीच श्री कृष्णाची गोष्ट आहे नारद म्हणाले अरे भक्त सखा सर्व मी समजू शकतो पण तू त्या अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा हि करतोस हे कसे काय???? (तसे तर नारादाही भगवंताचे उत्तमच भक्त होते.) त्यावर भगवान म्हणजे श्री कृष्ण नारदाला म्हणाले कि तो आत्ता झोपलाय त्याच्या केसांना कान लाव. नारदाने तसे केले त्यातून श्री कृष्ण श्री कृष्ण नाम ऐकू आले. नारद म्हणाले धन्य तो भक्त. आणि धन्य त्याची भक्ती. भगवंताचे मानवी रूप अवतरी रूप धारण केलेल्या स्थितीत ह्या प्रकारची बरीच उदाहरणे आहेत विशेषतः श्री कृष्णाच्या आयुष्यात राधा, द्रौपदी, ह्या सख्या आणि उद्धव, सात्यकी, अर्जुन हे सखे म्हणजे मननी एकरूप व्यक्तिमत्व होती. माणसांच्या आयुष्यात हे अशक्य नाही. देवत्व नसले तरी उत्तम मानावत्वाचे ते लक्षण आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
No comments:
Post a Comment