षड्रिपू प्रेम --- अ -----
हा विषय सुरु करण्यापूर्वी एक महत्वाची विनंती करतो आहे कि काल मी लिहिलेल्या काव्याकडे कविता, कवित्व किंवा कविकल्पना म्हणून पाहू नये हे हात जोडून सांगतो आहे. ते एक वास्तव आहे हे अनेक निरीक्षणानंतर लिहिले गेले आहे. योगायोगाने ते काव्य रूप घेऊन आले. त्यातील आशयचा गंभीर पणे विचार केला जावा अशी इच्छा आहे. मी माझ्या लिखाणात पुराणे, इतिहास, राजकारण, धर्म आणि जात ह्या पाच गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या आहेत. कारण विकारांना बंधन नसतात ते सर्व ते माणसासाठी सारखेच असतात. माणूस हा स्वार्थी आहे त्यात स्वतःचा देह त्याला प्रिय आहे. त्याला सुधृढ निकोप ठेवण्यासाठी तरी त्याने आपले मन सुध्धा सुधृढ निकोप ठेवावे लागेल. मन जा निकोप असेल तर स्वाभाविकच सामाजिक संघर्ष कौटुंबिक हेवेदावे कमी होती आणि माणसातील दुरावे कमी होतील हे एकच भान मी माझ्या लिखाणात ठेवले आहे. हेतू एकच आहे अवघा रंग एक व्हावा. रंगी रंगवा श्रीरंग.
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
आता षड्रिपू प्रेम पाहूया हे ऐकायला थोडेसे चमत्कारिक वाटेल पण खरोखरच तसेच आहे. आपल्याला सर्वांना माणसाचे शाद्रीपुंच्या वरचे प्रेम माहित आहे. पण मी म्हणतोय शाद्रीपुंच्या मूळे माणसाच्या मनात निर्माण होणारे प्रेम. आपण ह्या सर्वांना शत्रू मानतो आणि ते दिसतात कसे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण हे नेमके कसे आहेत त्यांचा नेमका स्वभाव काय हे आपल्याला माहित नाहीये म्हणून त्यांचा स्वभाव कसा आहे ते आधी पाहूया, मग कळेल, जाणवेल आणि पटेल कि ते प्रेम करायलाही लावतात.
आपल्याकडे १) काम, २) क्रोध, ३) लोभ, ४) मोह, ५) मद, ६) मत्सर हे सहा रिपू म्हणजे माणसाचे शत्रू आहेत असे मानले आहे, पारमार्थिक तत्वज्ञानी तर हे अहोरात्र ओरडून सर्वांना सांगत असतात. आणि खरी गम्मत अशी आहे कि ह्यांच्या पैकी कोणत्या ना कोणत्या एका किंवा एकापेक्षा जास्त किंवा सर्व तथाकथित रिपुच्या कचाट्यातून एकही जण क्षणभर सुद्धा सुटलेला नाही. मग हे रिपू कसे ??? किंबहुना हे आपल्याला त्यांचा गुलाम करतात, त्यांच्या बंधनात ठेवतात म्हणून त्यांना आपण रिपू म्हणतो मानतो असे तर नाही??? वास्तविक ते आपल्याला कधीच बंधनात टाकत नाहीत आपणच आपणहून त्यांच्या बंधनात जातो.
आणखी एक गोष्ट अशी ती म्हणजे ह्या सर्वांनाच विकार असेही म्हणतात. पण वास्तव मला असे जाणवले कि ------------
पहिला प्रकार ----- त्यातील काम हा विकार आहे, पण ती इच्छाहि आहे आणि शक्तीही आहे हि गोष्ट सुद्धा आपण नाकारू शकत नाही.
दुसरा प्रकार ----- यातील काही रिपुंच्या अधीन झाल्यामुळे शारीरिक रोग निर्माण होतात.
तिसरा प्रकार ------ काहींच्या मुळे सामाजिक कलह निर्माण होतात. ते आहेत क्रोध, मद, आणि मत्सर. ह्यात भर पडते ती भीती, अपराधीपणा, आणि ह्या सगळ्यावर पांघरून घालण्याचा माणसाचा तुटपुंजा प्रयत्न म्हणजेच दांभिकपणा.

No comments:
Post a Comment