षड्रिपू प्रेम --- क -- आता ह्यांचे प्रेम हि नेमकी काय संकल्पना / विचार आहे पाहूया. मुळात प्रेम म्हणजे नेमके काय? ----- आपल्या फेस बुक मद्ध्ये फेरफटका मारतांना माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि जास्तीतजास्त काव्य, मत किंवा विचार हे ----- प्रेम ह्या विषयावर आहेत. आणि त्यातही जास्त --- विरह - विराणी आहेत. अनेकांनी अनेक शब्दात आपापल्या प्रेमा विषयीचे विचार व्यक्त केले आहेत. आपली प्रेमाबद्दलची भावना. प्रेम भावना. ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट होते कि माणूस प्रेमाचा अतोनात भुकेलेला आहे. आणि निर्माण झालेल्या वक्तव्य व काव्यावरून असे लक्षात येते कि त्याला ते पुरेसे किंवा हवे तसे मिळत नाहीये. कारण विरह जास्त आहे. प्रेमावर लिहिणाऱ्यान मद्ध्ये मुलगे जास्त आहेत, मुली त्यामानानी कमी आहेत. त्यातही, --- त्यातील बहुतेक जणांचा सूर असा आहे कि, --- मी प्रेम करतो पण माझ्यावर प्रेम करणारा किंवा करणारी नाही. म्हणून विरह. मी प्रेम करत नाही असे कोणीही म्हणतांना दिसत नाही. प्रत्येक जण प्रेम करतो/करते आहे. तरी त्या/ति-च्या वर मात्र कोणीच प्रेम करत नाही. --- हे जरा विसंगत वाटले. ह्याचा अर्थ सर्वच्या सर्व प्रेम करणारे एकतर्फी प्रेम करताहेत? कि प्रेम म्हणजे नक्की काय ह्याचाच शोध अजून लागलेला नाही?? कि जे करताहेत ते प्रेम नाहीच आहे??? दुसरेच काहीतरी आहे???? प्रत्येकाचे शब्द वेगळे पण आशय एकच आहे. प्रेम म्हणजे काय ह्याचे उत्तर हि अनेकांनी अनंत प्रकारे दिले गेले आहे.
म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे? हे हि जाणणे आवश्यक आहे.
म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे? हे हि जाणणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment