नवविधा भक्ती ------- १-श्रवण, २-कीर्तन, ३-नामस्मरण, ४-पादसेवन, ५-अर्चन, ६-वंदन, ७-दास्य, ८-सक्ख्य, ९-आत्मनिवेदन
आत्तापर्यंत आपण साधनेचे चार योग प्रकार पाहिले. प्रेम योगाची माहिती मागे झाली. आता भक्ती म्हणजे काय ते पाहू. विविध वैचारिकते प्रमाणे नऊ प्रकारे भक्ती करता येते, यालाच नवविधा भक्ती असे म्हटले आहे. मराठी संतांनी भक्तीला सर्वात जास्त महत्व दिले आहे. भक्ती हि खरोखरच अद्भुत आहे. इतर साधक ईश्वराच्या दिवाणखाण्या पर्यंत जातात. पण भक्त थेट (डायरेक्ट) भगवंताच्या स्वयंपाकघरात जातो. हे भक्तीचे सामर्थ्य आहे. प्रेम आणि भक्ती तसे वेगळे नाही. जे प्रेम माणसावर केले जाते तेच प्रेम ईश्वरावर केले कि त्याला भक्ती म्हणतात. भक्त म्हणजे विभक्त नाही तो भक्त. ईश्वराशी सतत जोडलेला. पण एकरूप होत नाही. भक्ताला अद्वैत मानण्य नाही. तो ईश्वराशी द्वैत ठेऊन त्याचा सखा बनू पाहतो. त्याला समोरासमोर भेटू इच्छितो. आलिंगन देवू इच्छितो. त्याशिवाय त्याला समाधान होत नाही. म्हणजे दोघेही मनाने एक असले तरी देहाने वेगळेच असावे असे नेहमी भक्ताला वाटते. ज्ञानी मात्र ज्ञानाने संतुष्ट होतो. पण भक्त? -------- इच्छा समूळ नष्ट होणे, मुक्त होणे हे भक्ताला मान्य नाही. तो देहाने वेगळाच राहू इच्छितो. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, मला मुक्ती नको. जर तुझी भक्ती मला कायम लाभणार असेल तर मी कितीही वेळा गर्भवास भोगण्यास तयार आहे. मानवी देह हा सर्वात जास्त मोह पडणारा आहे. त्यामुळे बाकी वासना जश्या ह्या देहात अधिक तरलतेने अनुभवता येतात तश्या इतर योनीत त्या येत नाहीत. हाच नियम वासानाविरहित भक्तीला हि लागू होतो. भक्तीचा आणखी एक अद्भुत गुण म्हणजे लौकिकात भक्त ईश्वराचा दास दिसतो. पण प्रत्यक्षात इथे ईश्वरच भक्ताचा दास होतो. हे भक्तीचे सर्वात मोठ्ठे रहस्य आहे.
Please elaborate each bhakti path
ReplyDelete