ओमकार श्री गणेशाला वंदन करून मला जे जाणवले ते मी आपल्या समोर मांडत आहे. आपल्या सर्वांना तो सिद्धी विनायक प्रसन्न होऊदे.
श्री गणेश ओंकार ----- मी ओंकारामधील ध्वनी शास्त्राची माहिती देणार आहे. जे पूर्ण पणे भौतीकावर आधारित असून साधनेचे मूळ आहे भौतिक आणि सूक्ष्म ह्यांना जोडणारा हा दुवा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून ह्याला पर्यायी शब्द कोणत्याही भाषेत जातीत किंवा धर्मात कुठेही नाही. हे समजण्यासाठी काही प्रस्तावानेची गरज आहे. प्रथम हे लक्षात घ्या कि जगातील फक्त भारतीय भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या आहेत, बाकी कोणत्याही देशातील भाषा उच्चार शास्त्रावर आधारलेल्या नाहीत.उच्चारातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक ध्वनीला आपल्या लिपीत स्वतंत्र अक्षर आहे. ओमकार हा हि पूर्ण ध्वनी शास्त्रावर आधारलेला शब्द आहे. आपल्याडील मुळाक्षरे हीच मुळात ध्वनी शास्त्रावर आधारित आहेत म्हणजे ओष्ठ, तालव्य, मुर्घ्न्य, आणि कंठ्य ह्या पैकी तोंडात ज्या ठिकाणी स्वरांची निर्मिती होते त्या प्रमाणे त्या त्या प्रकारच्या अक्षरांचे गट केलेले आहेत. शिवाय अनुनासिक आहेत. आणि ह्या सर्वांवर स्वरांचे लेणे आहे ते म्हणजे बाराखडी अ ते अः मुख्य ५ स्वर व एकूण १२ स्वर प्रत्येक व्यंजन स्वरासाहित उच्चारले जातात. ध्यानिचा आपल्या शरीरवर मनावर तातडीने परिणाम होतो त्यामुळे ध्वनीला आपल्या परमार्थ शास्त्रात फार महत्व आहे. ध्वनीतून निर्माण होणारे शास्त्र म्हणजे संगीत शास्त्र. स्वामी विवेकानंद म्हणत संगीत हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
कंठात आकाराची उत्पत्ती होते निर्मिती होते अर्थात निर्मितीचा आनंद तोच ब्रम्हानंद सात्विक वृत्ती. चांगल्या गायकाच्या तोंडून आपण असा स्वर ऐकलात तर गाणार्याला आणि ऐकणाऱ्याला खरोखरच अत्यंत आनंद होतो. हा स्वर कंठातून येतो आणि बाहेर पर्यंत ऐकू येतो. उकराची उत्पत्ती तोंडाच्या माद्ध्यात होते तो स्वर तिथेच राहतो व अतिरिक्त स्वर बाहेर ऐकला येतो तो गंभीरच असतो म्हणून पालन करता राजस वृत्ती विष्णू (कल्पना) मकार - हे व्यंजन आहे - संपणारा नाशाचे प्रतिक तामसी वृत्ती महेश (कल्पना) शंकर शब्दाची उत्पत्ती आकाशातून होते पंचमहा भूतांपैकी पहिले ४ जाणायला सोपे आहेत त्यामुळे त्यांचे मानाने ध्यान करणे फार कठीण जात नाही पण आकाश हे सर्वात सूक्ष्म आहे त्यामुळे त्याच्याची तादात्म्य पावण्यासाठी शब्द हेच प्रभावी साधन आहे ओम हा पहिला शब्द आहे.
संत वान्ग्मायात आपल्याला अनेक ठिकाणी हा उल्लेख आढळेल कि प्रत्येक सजीव देहात एक अखंड नाद चालू असतो त्याला अनाहत नाद असे म्हणतात.ह्याचाच भौतिक उच्चार ओमकार. ओम्कारच का? ह्या शब्द/अक्षराच्या उत्पात्तीमागील कार्य कारण मीमांसा. प्रत्येक शक्ती हे एक पूर्ण वर्तुळ असते ती जिथून सुरु होते तिथेच येऊन परत मिळते तेव्हाच तिचा परिणाम व्यक्त होतो. हा भौतिक विज्ञानाचा सर्वांना माहित असलेला गुणधर्म आहे. उदाहरणार्थ वीज.
हेच तत्व विचारलाहि लागू होते. विचार /व/ इच्छा हि सुद्धा अशीच एक शक्ती आहे कि ती जिथून सुरु होते इथेच प्रत येते. हा भौतिकाचा नियम आहे. म्हणजेच माझ्यापर्यंत बाहेरून आलेले प्रत्येक विचार हे मुळात माझेच आहेत. म्हणजेच माझा कोणी त्वेष करत असेल तर तो मुळात मीच करत आहे आणि नंतर तोच फिरून माझ्याकडे येत आहे. ह्याच कारणाने स्वतःचे चांगले करण्याचा मार्ग म्हणजे दुसऱ्याचे चागले चिंतने. तसेच ग्ञान आत आहे बाहेरून आघात होतो तेव्हा ते बाहेर येते जसे नाद हा घंटे माद्ध्येच आहे बाहेरून आघात केल्यावर तो आपल्याला ऐकू येतो इतकेच. तीच अवस्था कलेची आणि प्रतिभेची कला आतून बाहेर येते प्रतिभाहि आतून बाहेर येते. ह्या ग्ञान, कला, इच्छा, सर्वच गोष्टी लोक कल्याणाला पूरक आहेत. अश्या सर्व गोष्टींना समाईक असा शब्द/ अक्षर म्हणजे ओमकार होय. कारण त्याची उत्पत्ती हि आतून बाहेर होते.
ओम्काराची उत्पत्ती आतून बाहेर अशी होते. अ ची उत्पत्ती कंठातून होते. उ हा तोंडाच्या माद्ध्यात निनादतो आणि म कार हा ओठावर येऊन ओठ बंद होऊन संपतो पण त्यातही अशी गम्मत आहे कि मकार पूर्ण म्हटल्यास त्यातून आकार बाहेर येतो म्हणजेच आतून बाहेर येणारा, आणि अनंत, न संपणारा (अन एंडिंग) असा हा एकाच शब्द/अक्षर आहे कि ह्याला दुसरा शब्द नाही. अक्षर नाही. म्हणूनच हा शब्द/अक्षर पवित्र आहे कारण फक्त आतून बाहेर येणारा म्हणजेच अपेक्षा विरहिततेचे प्रतिक. म्हणूनच ओंकाराचे हे भौतिक रूप आहे. म्हणूनच हा सिद्ध मन्त्र हि आहे.
ह्या शब्दात २ स्वर आहेत व म हे व्यंजन आहे. ह्याचा उच्चार करतांना जिभेचा कुठेही वापर होत नाही. म्हटले तर तीन अक्षरे पण उच्चार एकच म्हणून हा एकाक्षर मंत्र होतो आपल्याकडे राज्योगाच्या साधनेसाठी प्राधान्याने उपयोगात आला आहे.
वास्तविक ह्याला प्रतिशब्द नाही पण आपल्याकडे देव देवता अनेक आहेत. जपासाठी राम प्राधान्याने वापरला जातो कारण आता राम ह्या शब्दाचे ओम्कारशी साधर्म्य काय ते पाहू राम ह्या शब्दाचा उच्चार र+आ - म अशा प्रकारे होतो व शेवट म असल्याने प्रत्यक्ष उच्चारल्यावर आपल्या लक्षात येईल कि याचा उच्चार हि ओम्कार समान आहे. आधुनिक शास्त्रात काही लोकांचे म्हणणे आहे कि ह्या राम शब्दा ऐवजी र्हीम म्हटले कि त्यातील र ला जोडून हाकार म्हटला तर त्या हकारामुळे होणाऱ्या आघातामुळे मूळ मन्त्र अधिक प्रभावी होतो. आणि पुढे जाऊन पहिले तर र्हीम शब्द रहीम शब्दाच्या जवळ जातो राम शब्दाची जुळणारा आहे. अर्थात हे इतर शब्द हे अनेकेश्वर देवत्वाच्या कल्पनेतून आले मूळ अ उ म ----- ओम हा अव्यक्ताचे प्रतिक आहे. म्हणूनच हा आद्य व अंतिम मूलमंत्र आहे.
ह्याचे चिंतन करून आपण सर्व त्या गणेशाची साधना करूया शुभम भवतु.

No comments:
Post a Comment