भाग ४ ----------------- ७ ओगस्ट
प्लास्टर च्या मूर्ती --- उत्सवामागील हेतू --- पुजेची माहिती --- ह्या नंतर आता पूजेचे मानसशास्त्र पाहूया
प्रस्तावना ----- आपल्यातील गैरसमज किंवा अर्धवट समज काढून टाकण्यासाठी म्हणून इथे मला इथे प्रस्तावना करणे आवश्यक वाटले कारण आपल्या पूजे बद्दलच्या कल्पना मी पुढे दाखवून दिलेल्या नक्कीच नसाव्यात. सोपस्कार तेच आहेत ह्यात नवीन काहीच नाही नवीन आहे तो दृष्टीकोन.
प्रथम पूजा हि क्रिया नेमकी काय असते ह्याचा विचार करू. वास्तविक हे सर्व आपल्याला माहित आहे पण असे तुल्नात्मिक आपण कधीच विचार करत नाही म्हणून पूजा करतांना त्याचा कार्य कारण भाव आपल्याला पूजा करतांना लक्षात येत नाही
पूजा आपल्यापैकी बरेचजण रोजही करत असतील त्यातील तंत्र बहुतेक जणांना माहित असते. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण पाहतो आपल्याकडे आपल्या आवडीची व्यक्ती येणार असेल आणि त्याची आधी कल्पना असेल तर आपण काय करतो. येणारी व्यक्ती आल्यावर तिच्या साठी काय काय करायचे त्याचा विचार सुरु होतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी प्रमाणे पदार्थ करायचे ठरतात मग अर्थातच त्या प्रमाणे आवश्यक ती खरेदी सुरु होते तिच्या आवडीचे खाणे प्रेसेंत द्यायची वस्तू ह्या सर्वांची निवड होते हि सर्व प्रक्रिया घडत असतांना सहजच आपण त्या व्यक्तीचे चिंतन करतो. स्मरण करतो हा मानवी स्वभावाचा सहजभाव आहे. म्हणजेच त्याचे ध्यान घडते. ती व्यक्ती आल्यावर आपण तिला बसायला सांगतो आसन देतो. बाहेरून आल्याबरोबर गुल पाणी देतो (आचमन) स्नान हे ती व्यक्ती घरी राहणार असेल तर घडतेच ते मात्र आपण त्या व्यक्तीला घालत नाही पण मला आठवते मी लहान असतांना आमच्या चाळीतील एका घरी मला दर वर्षी आषाढी एकादशीच्या नंतरच्या द्वादशीला ब्राम्हण म्हणून बोलावत असत तेव्हा मला ते अंघोळ सुद्धा घालीत सात मी त्या वेळी सात आठ वर्ष्यांचा असेन वस्त्र उपवस्त्र आपणही घरी आलेल्याला आपापल्या ऐपतीप्रमाणे व नात्या प्रमाणे काही ना काहीतरी देतो.आता गंध अक्षता कुंकू पुष्प धूप दीप नैवेद्य आरती प्रदक्षिणा आणि प्रार्थना हे मात्र आपण फक्त देवासाठी अर्पण करतो. पण आपल्या घरी येणारी स्त्री असेल तर कुंकू फुल हे आपण त्यांना हि देतो. येणाऱ्या व्यक्तीला आपण आवडते खाण्याचे पदार्थ करतो तोच देवासाठी नैवेद्य असतो. अश्या रीतीने पूजा क्रियेचा तौलनिक विचार केला तर हे सर्व आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी करत असतो. हेच प्रेम व हाच प्रेमयोग. त्या प्रिय व्यक्तीच्या ठिकाणी देव ठेवला कि त्याच क्रीयेला आपण पूजा म्हणतो. हीच भक्ती आणि हाच भक्तियोग होय. ह्या वरून पूजा करतो म्हणजे नेमके काय करतो ते आता आपल्याला नक्की लक्ष्यात येईल. पूजा म्हणजे यथासांग स्वागत, आदर, सत्कार, कौतुक, प्रेमाचे व्यक्तीकरण, दुसऱ्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केलेली प्रक्रिया हे सर्वकाही ह्यात येते. हा झाला पूजा क्रियेचा उहापोह
ह्यावरून आपल्या हे हि लक्ष्यात येईल कि प्रत्यक्ष व्यक्ती किंवा देव जरी आपल्याकडे एक दोन दिवस येणार असेल तरी त्याच्या पूर्व तयारी पासून त्याचे चिंतन घडते ध्यान घडते मानसिक सहवास घडतो असे मनापासून वागणाऱ्या घरी जाण्याचा योग आपल्याला आला तर आपल्याला मी अनुभवाने सांगतो त्या भावनेची जाणीव आपल्यालाही होते, व तीच क्रिया वरवरची असल्यास त्याचीही जाणीव नक्की आपल्याला होते. देव तर भावाचा भुकेलेला आहे मग बाह्य उपचारापेक्षा आपुलकी व मानसिक प्रेम किती महत्वाचे आहे ते आपल्या लक्षात येईल. आपल्या रोजच्या जीवनाच्या रहाटइशी पुजेची तुलना केल्ल्य्ने आपल्या सर्वांच्या हे हि लक्षात येईल कि आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा नेमके काय करतो ह्याची नेमकी कल्पना येईल. हा विषय बराच खोल आहे त्यामुळे आणखीन किमान एक कदाचित दोन भागात सांगावे लागेल पुढच्या भागात पूजेतील प्रत्येक उपचाराचा उहापोह करू

No comments:
Post a Comment