Friday, 2 September 2011

प्रारब्ध म्हणजे --- पूर्व कर्म --- पूर्वीचे कर्म --- पूर्व जन्मीचे / जन्मांचे कर्म

प्रारब्ध
प्रारब्ध म्हणजे --- पूर्व कर्म --- पूर्वीचे कर्म --- पूर्व जन्मीचे / जन्मांचे कर्म वर्तमान हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे कर्माचे महत्व किती आहे ह्याची आपल्याला कल्पना येईल. म्हणून कर्म करत राहणे हे आवश्यक आहे. कारण ह्याच नियमाने आजचे कर्म हे उद्याचे प्रारब्ध आहे. आजचे कर्म माझ्या हातात आहे म्हणजे उद्याचे प्रारब्ध हि पर्यायाने माझ्या हातात आही पण आजचे परार्ब्ध माझ्या हातात नाही आणि ते टाळताही येत नाही. प्रारब्ध कोणालाच टाळता आलेले नाही. हे वास्तव जर नीट कळले तर निव्वळ प्रारब्धावर अवलंबून न राहता कर्म करण्याची जिद्द टिकून राहील. प्रारब्ध मानणे म्हणजे कर्म टाळणे नाही. प्रारब्ध हे बँकेतल्या सेविंग खात्यासारख आहे पण एक फरक आहे सेविंग खात्यात जमा मधून खर्चाची आपापसात वजाबाकी होऊन शिल्लक बाकी राहते प्रारब्धात मात्र थोडेसे वेगळे आहे त्यात पाप आणि पुंण्याची वजाबाकी होत नाही दोन्हींचे परिणाम भोगायला लागतात. ह्याच कारणाने एखाद्या सरळ माणसाला सोसणार नाहीत इतके भोग भोगायला लागतात आणि एखादा निव्वळ भोगासाठीच जन्माला आलेला दिसतो. म्हणूनच सामान्न्य माणूस गोंधळतो. आणि त्याची कर्म आणि सत्त्यावरची श्रद्धा डळमळीत होते. इतकेच काय त्याचा जन्माचे जन्माच्या ठिकाणाचे त्या वेळच्या परिस्थितीचे कारणच त्याचे पूर्व कर्म असते म्हणूनच आपल्याकडे जन्मापेक्ष्या मरणकाळ साधावा असे संत महंत  वारंवार सांगतांना आढळतात.
भोग आणि उपभोगाचे असे का तर काही गोष्टी खरेदी केल्या सारख्या असतात त्यांचे फळ आपल्याला ताबडतोप मिळते पण काही झाड लावण्या सारखे असते त्याचे फळ यायला आपल्याला वाट हि पाहायलाच हवी नाही का?

माणसाच्या बाबतीत एखादा यशस्वी झाला कि तो स्वतःला कर्तृत्ववान समजतो आणि इतर अनेक जण त्याच्या यशात आपला वाट असल्याचे दर्शवितात यशाला अनेक आईबाप असतात आणि अपयश पोरकं असत हे म्हण त्यातूनच आली अपयशी माणूस ह्याच्या नेमके उलट नेहमी आपल्याखेरीज दुसर्यावर आपल्या अपयशाचे खापर फोडत असतो. कर्म करायचेच पण प्रारब्धावर सोडून द्यायचे म्हणजेच फळाची अपेक्षा करायची नाही.

आता कर्म चांगले कोणते आणि वाईट कोणते हे कसे ओळखायचे ?? कर्म ते करणाऱ्याच्या साठी त्याच्या उद्देशाप्रमाणे त्याच्यावर परिणाम करते. एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण देतो १४ मार्च २०१० ला माझ्या नातीचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस होता. तो सोसायटीच्या गच्चीत होता त्याची जिन्यात वरच्या शेवटच्या लांदिंग मद्ध्ये दोन पोपटाची पिल्ले पडली होती एक मेलेलेच होते दुर्यात धुगधुग होती मी त्याला टिशू पेपर घालून बोक्ष मद्ध्ये घालून घरी आणले रोज कॉम्प्लान फळांचा रस वर्ण वगैरे ड्रोपर ने भरवून वाढवला एका नेत्चुर लवर आणि डॉक्टर मुलाला त्याला कसा सांभाळायचा त्याची माहिती घेतली व हे हि विचारले त्याला कधी सोडून देऊ. त्यावर तो मुलगा म्हणाला आता तुम्हीच त्याचे आईबाप तो बाहेर जगू शकणार नाही कारण त्याला लवकर सोडलेत तर उडता येणार नाही आणि उशीर झाला तरी जन्मजात सवय नसल्याने उडता येणार नाही आणि मुख्य म्हणजे त्याला नैसर्गिक जगातून अन्न मिळवणे तुम्ही शिकवूच सक्त नाही म्हणजे जगायचे तर पिंजर्यात नाहीतर मरण. ह्या नाम प्रारब्ध त्या पोपटाचे. आणि माझी भूमिका काय तर मी माझ्या हौसेसाठी लहान पिल्लू आईपासून वेगळे करून विकतात/ विकत घेतात तो प्रकार केलेला नाही त्याचा जीव वाचवा म्हणून त्याला सांभाळला हा माझा हेतो तसे मला फळ. तोच डॉक्टर मुलगा माझ्याकडे नंतर आला होता त्याच्या मित्राला पोपट हवा आहे तो द्याल का विचारायला आणि आमचे त्या पोपटा बरोबरचे वागणे पाहून माझ्या आईला म्हणाला आजी हा इथेच राहूदे तुमच्या इतके प्रेमाने त्याचे कुठेच होणार नाही. ह्या वरून आपल्याला हेतूच्या सुद्धाशुद्धातेतील फरक आपल्या लक्षात येईल. तू ज्या ज्या भावनेने माझ्या पर्यंत येशील त्या त्या भावनेने मी तुझ्यावर कृपा करतो असे भगवंत म्हणतात म्हणजेच त्या त्या प्रमाणे मी तुला फळ देईन.

 

No comments:

Post a Comment