Friday, 2 September 2011

दान आणि त्याग

 दान आणि त्याग
दान आणि दानाचे प्रकार आपण पहिले आता त्याग म्हणजे काय ह्याचा विचार करू. दान म्हणजे काय ते आपल्या सर्वांना माहित होतेच मी फक्त दानाचे प्रकार सांगितले. दान म्हणजे आपण कोणालातरी काहीतरी देणे हे आपण पहिलेच.

त्याग म्हणजे आपण काहीतरी सोडून देणे. त्यावेळेस आपण त्यागलेली वस्तू कोण घेतो त्याच्याशी त्याग करणाऱ्याला देणेघेणे काही नसते. म्हणजे त्याग हा व्यक्तिगत आहे. संपूर्णपणे स्वतःच्या व्यक्तिगत मुक्तीचा विचार त्यागात आहे. कारण त्याग म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या आड जे जे येईल त्याचा त्याग करणे होय. मुख्य म्हणजे हा त्याग मनातून आणि मनापासून झाला पाहिजे. एक एक वस्तू त्यागतांना  शेवटी  संसाराचा त्याग करणे म्हणजे संन्यास. त्याग हा थोडा थोडा नाही सर्व संग परित्याग म्हणजेच  खरा त्याग. संपूर्ण संन्यस्त वृत्ती तो हि मनापासून हवा नाहीतर ----------------- 

एक माणूस होता त्याने संन्यास घ्यायचा ठरवला आणि घरदार सोडून जंगलात जाऊन झोपडी बांधून राहू लागला. अगदी पंचा नेसून राहू लागला.  काही काल गेला. एकदा त्याच्या लक्षात आले कि त्याचा पंचा कुणीतरी कुणीतरी कुर्ताद्लाय, म्हणजे झोपडीत उंदीर आहे, मग उंदराला पकडायला त्यांनी मांजर पाळले, पुढे मांजराला दुध हवे म्हणून गाय पाळली मग गाईचे करणार कोण म्हणून बाई ठेवली शेवटी हे काही बरे दिसत नाही म्हणून तिच्याशी लग्न केले. हे रूपक आहे.

दान हे कर्मयोगाचे लक्षण आहे त्याग हे सन्यसस्थाचे लक्षण आहे. दान हे समाजाभिमुख आहे संन्यास हा समाजापासून दूर जाणे आहे. दान देतांना दान घेणार्याची पात्रता विचारात घेणे अभिप्रेत आहे. आणि ती एक सामाजिक जबाबदारी आहे. संन्यासात स्वतःच्या  मनावर विलक्षण  ताबा मिळविण्याचा कठोर अभ्यास आहे.  कर्म योगात कर्म करून फळाचा त्याग करायचा आहे संन्यासात कर्माचा त्याग आहे पण तो निव्वळ बाह्य कर्माचा त्याग नाही मनातील कर्माचा त्याग अभिप्रेत आहे निव्वळ बाह्य कर्माचा त्याग म्हणजे वर देलेली गोष्ट. मग अंतर कर्माचा त्याग म्हणजे काय?
माणसाचे मन हे क्षणभरही कर्माशिवाय राहू शकत नाही. ते जास्त करून भूत आणि भविष्यात रमते व काही तरी मिळवायचे असेल तर मात्र वर्तमानात राहते. लंबकाच्या आंदोलना प्रमाणे भूत वर्तमान भविष्य असे त्याचे आंदोलन चालू असते. त्याच  बरोबर संकल्प विकल्पांचे  ओझे सोबत घेवून ते आंदोळत असते. त्या मूळे घड्याळाचा लंबक घड्याळाच्या गतीला नियमित करतो तर ह्या संकल्प विकल्पांच्या ओझ्यामुळे  मनाचे आंदोलन अनियमित होते. हि मनाची स्थिती म्हणजेच मनाचे कर्म होय. ह्या सगळ्या स्ठीतीबारोबरच मनाच्या इच्छा म्हणजेच अनेक वासनाही त्याच बरोबर त्याला आणखी निरनिराळ्या दिशेला ओढत असतात. हि असते सर्वसामान्य मनाची अवस्था ह्या अवस्थेतून मनाला सोडविणे. म्हणजेच कार्माक्रमाने वासना मग संकल्प विकल्प त्यानंतर भूत भविष्यात आंदोलने ह्यांचा स्वतःची बुद्धी वापरून त्याग करणे म्हणजे संन्यास आयकायला फार कठीण नाही पण अचारायला अत्यंत कठीण म्हणूनच भौत जनहिताय संनायासापेक्षा कर्मयोग सोपा व ते हि कठीण असेल तर भक्ती / प्रेम योग सोपा असे सर्व संतांनी आपल्याला सांगितले आहे.
कर्म संन्यास ह्या प्रकारात सर्वात धोका हा कि कर्माचा सन्यास घेतल्यामुळे माणूस आळशी ---  जड बंन्तोच कारण मानतील कर्म थांबवणे हे महत्वाचे आहे हे त्याला बहुतौशी माहीतच नसते हा ह्या मार्गातील सर्वात मोठ्ठा धोका आहे. कारण आधी मनाचे कर्म थांबविणे हेच माहित नसते नंतर कळले तर कसे हा प्रश्न पडतो. ह्यावर श्री गोंदवलेकर महाराजांनी एक छान माहिती सांगितली आहे ती सांगून आजचा भाग संपवतो महाराज म्हणाले संसार करणे म्हणजे जात्यातून पीठ दालने आहे. जात्यातील दोन दला पैकी एक स्थिर व एक फिरत असते. दोनही फिरायला लागली तर पीठ दळले जाणार नाही. आपली स्थिती तशी असते आमचे मन व शरीर दोनही फिरत असते किंवा मन फिरते आणि शरीर स्थिर राहते म्हणून परमार्थ नीट होत नाही मन स्थिर ठेऊन शरीराला फिरत ठेवा म्हणजे संसाराचे पीठ छान दळले जाईल. ---------------
संन्यासालाही हाच नियम लागू आहे म्हणजे आळस व जडता जाईल व खरा संन्यास त्याग घडेल शुभम भवतु
 
 

No comments:

Post a Comment