भाग ३ --------------- ६ ओगस्ट
गणेश उत्सव मद्ध्ये प्रथम प्लास्टर च्या मूर्ती नंतर उत्सवामागील हेतू आणि आता लिहिणार आहे पूजेच्या मागील मानस शास्त्र
पूजा विशेषतः मूर्तीपूजा हि हिंदुधार्मातच फक्त आहे प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी पूजा करतो ती तो कशी करतो ते तंत्र त्याला पुर्नामाने माहित असते पण पूजा प्र्काकारामागाची मानसिकता मात्र आपल्याला माहित नसते माझ्या सर्वच लिखाणाचा गाभा कार्या कारण सर्व काही हा आणि हाच आहे हे करत असतांना मी चमत्कारांना जराही जवळ केलेले नाही
आजचा विषय आहे पूजा विधीमागाचे मानसशास्त्र
पूजा हि शोडष (सोळा) उपचारांनी केली जाते. त्या ;प्रत्येक उपचार मागचा कार्यकारण भाव आणि शेवटी मूळ पूजे मागचा कार्यकारण भाव असे ह्या लिखाणाचे स्वरूप असेल
आज फक्त सोळा उपचारांची माहिती देतो उद्या त्या मागील मानसिकतेचा विचार करू
शोडशौपचार पूजा
१ ध्यान -- मनातील सर्व इतर इच्छा दूर सारून ध्येय वस्तूच्या (आराद्ध्य देवतेच्या) ठिकाणी तद्रूप होणे
२ आवाहन -- प्रतीकात्मक मूर्तीत सपरिवार आयुधे व शक्तीन्च्यासह येऊन प्रतिष्ठीत होऊन पूजन स्वीकारे अशी प्रार्थना
३ आसन -- बसायला आसनं देऊन हात धुवायला पाणी देणे त्याच बरोबर दुध दही मध गान्दाक्ष्तापुश्प अर्पण करणे
४ आचमनीय -- मुखाप्रक्ष्यालन यासाठी कपूर मिश्रित सुगंधी व पवित्र पाणी देतात (वापरतात) आजच्या काळात सांगायचे तर फ्रेश व्हा
५ स्नान व अभिषेक -- सध्या पाण्याने स्नान नंतर पंचामृत स्नान मग उष्णोदक स्नान मग अभिषेक सुगंधी जल तेल उसाचा रस व दुध यांचा अभिषेक करतात.
६ वस्त्र - उपवस्त्र -- देवाला वस्त्र अर्पण करणे - देणे.
७ गंध - कपाळाला गंध लावणे
८ अक्षता - हा मुख्य उपचार नव्हे. पिंजर मिश्रित अखंड तांदुलांना अखाता म्हणतात. एखादा उपचार उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी अक्षता वाहतात. अक्षता या बाल. समृद्धी व आयुष्य देणाऱ्या आहेत.
९ कुंकू -- पुरुष देवतेचे आवाहन करतो ते सपत्नीक असल्याने कुंकू वाहावे
१० पुष्प -- सुगंधी व त्या त्या देवाला आवडणारी फुले,दुर्वा, बेल, तुळस, पत्री(हि सर्व औषधी वनस्पतीनंची असते-- त्याची माहिती सुद्धा पुढे देणार आहे), हे सर्व देवाला अर्पण करावे.
१३ धूप -- धूप हा सुगंधी असतो पर्याय म्हणून सुगंधी अगरबत्ती लावावी. त्यामुळे माणसाचे मन प्रसन्न राहते.
१२ दीप -- स्वयंप्रकाशित व दुसऱ्याला प्रकाश देणारा दिवा लावावा
१३ नैवेद्द्य -- देवाच्या आवडीचा पदार्थ त्याला अर्पण करणे - देणे. तो देवाच्या उजव्या हाताजवळ ठेवावा .
१४ आरती -- आर्तीक्य स्तुती जयजयकार हा देवाचा करावा
१५ प्रदक्षिणा -- देवाभोवती देवाला उजव्या हाताकडे ठेऊन गोल फेरी मारणे.
१६ प्रार्थना -- सर्वात माग्त्वाचे - हे वर केलेले सर्व उपचार हे कशासाठी हे देवाला माहित असतेच पण हे प्रार्थना ऐकल्यावर तो ते होर्सेस माउथ ऐकतो व स्मित हास्य करत प्रसन्नतेने आशीर्वाद देतो ---------- बिचराआआआआआ
मागणे, विनम्र होणे, अनन्य शरणागत होणे, देवापुढे आपले इष्ट असेल ते मागणे म्हणजे प्रार्थना. आदर व विनवणी हे भाव असतात. जगात गुप्त व प्रकट अशा महान शक्ती वावरतात आपले सामर्थ्य तुलनेने कमी असते. म्हणून या शक्तींनी आपल्या कार्यात विघ्न आणू नये, देवाने आपल्या कार्यसिद्धीसाठी सहाय्य करावे. अखिक बाल द्यावे, आणि काम क्रोद्धांवर अंकुश राहून बुद्धीचे स्थैर्र्य व मानसिक बाल वाढावे हि अपेक्षा प्रर्थ्नेद्वारा पूर्ण व्हावी हा प्रार्थनेचा हेतू आहे
आजची माहिती हि निव्वळ माहिती आहे त्या मागची मानसिकता सोमवारच्या दिवशी पाहूया
No comments:
Post a Comment