Friday, 2 September 2011

दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान दान, ४)धर्म दान

दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान दान, ४)धर्म दान
Harshal जोशी       श्रावणी सोमवारचे उपास किती लोकांनी केले आणि त्यापैकी दानधर्म किती लोकांनी केला हे जरी शोधले तरी धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही हे पुराव्यासह सिद्ध करता येईल
दान ------- १)द्रव्य दान, २)अन्न दान, ३)ग्ञान  दान, ४)धर्म दान हे चार दानाचे प्रकार सांगितले आहेत त्यांची प्रत चढत्या क्रमाने आहे.
१)द्रव्य दान ---- सर्वात कमी दर्जाचे  पण कोणालाही  सहज करता येणारे. हे सर्वात कमी प्रतीचे कारण द्रव्य लवकर संपते देणारा देऊन देऊन किती देणार? म्हणजे उद्या संपल्यावर मी रिकामाच. हे एक कारण दुसरे कारण घेणारा हा याचक म्हणजे देणार्याचे  वर्चस्व  राहते  मिंधेपण राहते. 
२) अन्न दान ------- हे द्रव्य दानाहुन श्रेष्ठ. कारण देणार्याची वृत्ती घेणाऱ्यात येते, त्यामुळे अन्न देणारा किंबहुना अन्न बनवणारा प्रसन्न असला पाहिजे. कारण त्याच्या वृत्ती अन्न स्वीकाराणार्यात प्रवर्तित होतात. ह्याच कारणाने महाराज म्हणत कि संतांघरचे मागून खावे. तोच खरा प्रसाद असतो. प्रसादात आणखीन एक गोष्ट महत्वाची असते कि सर्वांना वाटून उरलेले खातो तो प्रसाद असतो. सर्व तृप्त झाल्यानंतर आपण तो ग्रहण करायचा असतो.  श्री गोंदवलेकर महाराजांनी अन्नादानाला अत्त्यंत  महत्व दिले त्यांनी  स्वतः तर प्रचंड प्रमाणात अन्न दान केलेच पण आपल्या चाह्त्यांकादुन व भक्तांकादुनही दान घडविले. आजही गोन्दाव्ल्याच्या त्यांच्या मठात कायम अन्न दान चालू असते हे सर्वग्न्यात आहे.
३) न्यान दान ----------- हे अन्न दानाहुन श्रेष्ठ. कारण न्यान म्हणजे कायमचा  ठेवा तो मरेपर्यंत टिकतो. न्यानाचा उपयोग माणूस त्याला हवा त्या वेळी योग्य प्रकारे करू शकतो आणि आपले कमी न होता दुसऱ्याला देऊही शकतो. दुसऱ्याला दिल्याने आपले कमी होत नाही. किंबुना त्याची खोली वाढतच जाते. कारण न्यान दोन प्रकारचे असते एक पृष्ठीय न्यान जे आज इन्फर्मेशन म्हणून वापरले जाते. पण ती इन्फर्मेशन कुठे कशी केव्हा वापरायची ह्याचे न्यान असणे म्हणजे नयनाला खोली असणे होय.  ते स्थळ काल वेळ उपयोग ह्या सर्व गोष्टी नीट विचारत घेऊन वापरता आले कि तो माणूस परिपक्व सखोल विचार करणारा समजावा. सुविचार माणसाला नेहमीच येग्य दिशा देतात. पण माणूस जेव्हा स्वतः विचार कार्याला लागतो तेव्हा त्याच्या बुद्धीची परिपक्वता वाढायला लागते. आज मार्कांवरून आपण मुलांची हुशारी ठरवतो पण तेच मुळात १० टक्के खरे आहे कारण आजच्या मितीला तरी १०वि -- १२वी प्रयान्त्चे मार्क ९० टक्के भाग पाठांतराचा असतो. मी स्वतः विज्ञान विचार शास्त्र असे शिबीर घेत असे तेव्हा एका मुलाबद्दल त्याची शिक्षिका व अर्थात पालकही  फार कौतुक करत होते. शिबीर झाल्यावर अपेक्षेप्रमाणे पालक विचारयला आले. आधी त्याच्या यशाचे कौतुक झाले नंतर विचारणे झाले त्यांना मी सांगितले कि तुमचा मुलगा १० वी १२ वी पर्यंत नक्की मेरीट मद्ध्ये येईल पण फुढे मात्र तो फारसा कुठेही दिसणार नाही. हे मी भविष्यकार म्हून केलेले भाकीत नव्हते तर सर्व मुलांच्या बरोबर त्याच्याशी केलेल्या संवादातून लक्ष्यात आलेला त्याच्या विचार शक्तीचा गुणांक मला तसे दर्शवित होता ते मी सांगितले आणि खरोख्कारच तो मुलगा पुढे ७० टक्के च्या वर जाऊ शकला नाही. म्हणजेच विचार शक्ती वाढवणे म्हणजेच नयनाची होळी वाढवणे आहे. त्याला सोपा उपाय आहे माझ्या आजपर्यंत च्या सर्व लिखाणाचे मर्म कार्या कारण सर्व काही म्हणजे प्रत्येक कार्याच्या कारणाचा शोध घेत मुळापर्यंत पोहोत्चले कि आपल्याला खरे वास्तव कळते नाहीतर निव्वळ इन्फर्मेशन म्हणजे पृष्ठभागावर तरंगणारे शेवाळे.  न्यान माणसाच्या स्व-उत्कार्ष्यालाही कारणीभूत होते. न्यान हे भौतिक आहे भौतिक उत्क्रांती साठी  उत्कर्षासाठी उपयोगी पडते.  
आता सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे धर्म दान वास्तविक मला माझ्या नियमाप्रमाणे ह्यावर बोलायचा अधिकार नाही पण फक्त वाचलेली माहिती देतो
४) धर्म दान ----- धर्माचे दान करणे आपण बहुतेक संतांची चरित्र अभ्यासालीत तर आपल्याला असे लक्ष्यात येईल कि त्यांनी त्यांच्या गुरूंकडून जे मिळवले असे ते म्हणतात तेच धर्म दान. अर्थात ते मिळवायलाही अधिकार लागतो. अधिकार हाच शब्द इथे वापरतात म्हणून तो जाणीवपूर्वक लिहिला आहे. आपण आज लौकिकात अधिकार ह्या शब्दाचा अर्थ सत्ता असा घेतो पण परमार्थात व अध्यात्मात ह्याचा अर्थ पात्रता असा आहे. आणि दान देणारा जरी कितीही दानशूर असला तरी घेणाऱ्याचा अधिकार नसेल तर तो ते स्वीकारू शकत नाही इक्तेच नाही तर जर अर्धवट पत्र्तेने त्याला काही मिळाले तर त्याचे फार नुकसान होऊ शकते.

 सर्वच प्रकारचे दान स्वीकारण्यासाठी पात्रता असणे हे वरील सर्व दानाच्या बाबतीत सुद्धा लागू आहे. कारण न्यान देणारे गुरु /शिक्षक हे एकाच वेळीस ४०--५० विद्यार्थ्यांना शिकवीत असतात पण सर्वांचे यश वेगळे असते कारण त्यांची धारण क्षमता वेगवेगळी असते. ह्याचा अर्थ न्यानार्जानात शिक्षकाला महत्व आहेच पण त्या पेक्षा जास्त महत्व विद्यार्थ्याला आहे कारण त्याची क्षमता असणे हेच महत्वाचे आहे नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी किंवा खडकावर टाकलेले बीज ठरेल. म्हणजे विद्यार्थी सतत उत्सुक पाहिजे जिज्ञासू पाहिजे माहिती विचारणारा नाही तर शोधणारा पाहिजे म्हणजे न्यान प्राप्त होते जे खरे म्हणजे आतून बाहेर येते स्वामी विवेकानंद म्हणतात नाद घंणतेत असतोच आपण बाहेरून फक्त आघात करायचा असतो कि तो बाहेर येतो हे आतून बाहेर येणारे न्यान म्हणजेच खोली असलेले न्यान
दान हे कलियुगातील दर्माचे एकमेव साधन आहे कारण बरेच साधना प्रकार लोप पलेले आहेत. काही विकृत पद्धतीने समाजासमोर मांडले जातील आणि जाताहेत. काही साधनाप्रकार आपल्या आत्ताच्या समाजव्यवस्थेमूळे व मानवाच्या शारीरिक क्षमतेमुळे आचरणे कठीण होऊन बसेल म्हणून दान हेच शेवटचे साधन राहील.........  पण................ १) दान हे  सत्पात्री हवे २)दान ह्या हाताने दिलेले त्या हाताला कालताकामा नाही. ३) दिलेल्या दानाची कोठेही वाच्यता करताकामा नये ४) समजा आपली काही चोरी झाली तर त्याचे दान करा असे जॉयस मायर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या त्याचा अर्थ असा कि ते तुम्ही मनातून दान करा, ती वस्तू दान केली आहे असेच समजा, मनापासून मनातून सोडून द्या, हे खरे दान आहे.  ढोल ताशे वाजवत बोंबलत  करतो  केल्या दानाची विविध प्रकारे प्रसिद्धी करत करतो ती जाहिरात झाली. ते दान फुकट जाते त्याने लौकिक मिळेल काही काल पण मानसिक समाधान शुन्य. म्हणून दान करणे हे ज्या गोष्टीचे दान करयचे आहे ती वस्तू मनातून पूर्णपणे काढू टाकणे मन पूर्ण मोकळे करणे म्हणजेच स्वच्छ करणे होय. प्रयत्न करून पाहूया प्रसन्नतेचा अनुभव घेऊया
   
 

No comments:

Post a Comment