उपास - उपवास
अजून श्रावण महिना सुरु आहे. ह्या महिन्यात सणानबरोबर आपल्याकडे उपवासही केले जातात. तसे आपल्याकडे वर्षभरही अनेक प्रकारचे उपास केले जातात. उपवास ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक अर्थ उपवास (उपास हा त्याचा अपभ्रौंश आहे) म्हणजे लंघन आणि दुसरा अर्थ उप वास म्हणजे ईश्वराजवळ वास म्हणजे वास्तव्य. हे वास्तव्य हि अर्थात मनाचेच आहे.
आज पर्यंत आपण मनाचा शरीरावर परिणाम होतो म्हणून मन स्वच्छ ठेवणे का आवश्यक आहे त्याचा विचार केला. शरीर आणि मन हे एकमेकाला पूरक आहेत कारण शरीर हे स्थूल आहे तर मन हे सूक्ष्म शरीर आहे त्या मूळे ते दोन्हीही परस्परावलंबी आहेतच. म्हणजेच शरीर आजारी असेल तरी माणसाचे मन स्थिर राहत नाही हा हि अनुभव आपल्या सर्वांना आहे. म्हणून केवळ मनाचे शुद्धीकरण पुरेसे नाही पण शरीर सुद्धा स्वश्च शुद्ध ठेवायला पाहिजे. शरीर आतून शुद्ध ठेवण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे लंघन करणे.
आपण नीट पहिले असेल तर जनावर सुद्धा आजारी असतील तर लंघन करतात. पूर्वी डॉक्टर सुद्धा आपण आजारी पडल्यास लंघन करण्याचा सल्ला देत असत. आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे भुकी तो सुखी. आणि जेवतांना सुद्धा सावकाश जेवा म्हणायची पद्धत आहे ते प्रत्यक्षात सावकाश नसून स अवकाश आहे म्हणजे पोटात आवकाश म्हणजेच जागा ठेऊन जेवावे. पोटाला तडस लागेपर्यंत जेऊ जाये कारण खालेल पचन होण्यासाठी ते जठरात नीट ढवळले गेले पाहिजे. ते धवालाण्यासाठी थोडी जागा ठेवणे आवश्यक आहे. ह्या सर्व वरून उपवासाचे म्हणजे लंघन करण्यामागचे महत्व आपल्याला सहज कळेल. जगायला माणसाला थोडासाच आहार लागतो वर खातो ते रोगांसाठी.
आता उपवास म्हणजे त्याच्या (ईश्वरा) जवळ वास म्हणजे वास्तव्य. आता ईश्वराजवळ वास्तव्य म्हणजे अर्थातच मनाचे. आपल्याला देह भान विसरण्याचा अनुभव आहे. आपण आपल्या कामात मनापासून मग्न असलो कि आपण देहभान विसरतो म्हणजे तहान भूक विसरतो. त्याच प्रमाणे ईश्वराच्या चिंतनात देहभान विसरून जेव्हा उपवासाने उपास घडतो तो खरा उपवास होय. श्रावण भाद्रपद ह्या काळात आपल्याकडे उपवास जास्त प्रमाणात केले जातात त्याचे कारण तो काल पावसाचा असतो व सर्वसामांन्य पणे पचन क्रिया मंदावते म्हणून पोटाला जरा विश्रांती देणे हे हि आवश्यक असते हे एक कारण आहे.
नवग्रहांचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो त्यातून जे शास्त्र निर्माण झाले ते ज्योतिष शास्त्र त्या बद्दल इथे मी काहीच बोलत नाहीये. पण सूर्य चंद्राच्या गतीचा आपल्या रोजच्या जीवनावर सरळ सरळ परिणाम होतो हे मात्र आपण सर्वच जाणतो. सूर्याचा पावसावर, वाऱ्यावर, परिणाम होतो. चंद्राचा समुद्राच्या भारतीवर परिणाम होतो. हे सर्व परिणाम आपल्याला तत्काळ जाणवतात. त्याच प्रमाणे एकादशीला उपवास का करतात असा प्रश्न एकाने श्री के वी बेलसरे यांना शंका समाधान मद्ध्ये विचारला होता त्याचे त्यांनी देलेले उत्तर सांगतो. एकादशीला पृथ्वीशी सूर्य आणि चंद्र यांचा १२० औशांचा कोण होतो हा काल साधनेला फार चांगला आहे म्हणून एकादशीला महत्व आहे. प्रवाहाच्या बरोबर वाहने हे केव्हाही विरुद्ध वाहण्यापेक्षा सोपेच असते. म्हणून हा काल साधायचा अर्थात रोज नामस्मरण करायचेच. कारण साधना करणे म्हणजे शरीराला आणि मनाला तशी सवय लावणे होय. साधनेची सुद्धा आपण आपल्याला सवय लावायची इतकी कि ती सहज झाली पाहिजे. पुनरावृत्तीने साधना दृढ होते आणि सिद्धी हे साधनेचे फळ माणसाला प्राप्त होते.

No comments:
Post a Comment