Friday, 2 September 2011

भाग १ आपल्या उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा

भाग १
आज जागतीक "युवादिन". ह्या युवा दिना निमित्त खास युवकांसाठी --------- आपल्या उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा
फेसबुक मद्ध्ये मी लिहायला सुरवात केली त्या वेळी सुरवातीला मित्र व नातेवाईक, मग त्यांचे  मित्र मग मित्रांचे मित्र असा गोतावळा गोळा केला सगळेच अनोळखी फेस माहित नसलेले फेसबुक फ्रेंड्स आणि सुमारे ४०० गोतावळा झाल्यावर लिहायला सुरुवात केली. सुरु कुठून करावे कळत नव्हते माझे काही लिखाण तयार होते पण राजकारण धर्मकारण हे टाळून लिहायचे होते म्हणून प्रथम मला आवडलेल्या एका पुस्तकातील काही भाग क्रमशः लिहायला सुरु केला. त्यात श्रावण सुरु झाला आणि हिंदू सणांची सुरुवात झाली. सणांच्या माहित्या   तर अनेक  जन  अनेक ठिकाणी लिहित असतात पौराणिक कथांनाही तोटा नाही. पण ती हि कॉपीच.  मग विषय तोच पण कार्य कारण मीमांसा शोधायची अशा भूमिकेतून ह्याच विषयावर लिहायचे असा विचार आला. मला प पु श्री के बेलसरेंनी स्वतः टीका केलेला दासबोध ग्रंथ दिला होता आणि त्यावर त्यांनी जो संदेश लिहिला होता तो असा  होता कि
जगदीशापरता लाभ नाही कार्या कारण सर्व काही संसार करीत असताना  हि समाधान आणि खाली समर्थ अशी सही केली होती (आहे) हा संदेश मला दासबोधा पेक्षा भावला आणि प्रत्येक गोष्टीमागील कार्य कारण भाव शोधाण्याचा छंदच लागला.
पुढची प्रत्येक पिढी अनुवौशिक्तेच्या उत्क्रांती वादाप्रमाणे अधिकाधिक बुद्धिवान आहे असे दिसते अशा वेळी त्यांच्या समोर आपण जे विषय ठेवणार आहोत ते तर्कशुद्ध असायला हवेत ते तसे नसेल तर एकतर  ती पिढी ते स्वीकारणार नाही नाहीतर मुद्दाम विरोध करेल म्हणून हि पद्धत अवलंबली. आणि चांगला प्रतिसाद मिळाला.
आजची युवा पिढी बर्याच औंशी दिशाहीन  आहे त्याला आपल्या भोवतालची आर्थिक अस्थिरता  राजकीय स्थिती व सुशिक्षित  प्रमाण वाढून  सुद्धा धार्मिक अंध श्रद्धा अशा विपरीत जाळीत गुंतत चाललेली दिसते जबाबदार आमची पिढी आहे हे मी का म्हणतो  मला आठवत कि माझ्या आजोबांच्या पिढीतील (आज हयात असती तर १०० ते १२० वर्ष्यांची असती)  म्हातारी माणसे  मरेपर्यंत सुधृढ  असायची.  माझ्या वडिलांच्या वयाची म्हणजे आज ७५ ते ९० व्र्ष्यांची जी पिढी हयात आहे त्यांत रोगांनी जर्ज्र्तेचे प्रमाण जास्त आहे. त्याहून आजच्या तरुण वयात सुद्धा हार्ट, मधुमेह, वात/ कंपवात आणि कर्क रोग अशा मोठ्ठ्या रोगांचे बळी होतांना दिसतात. त्याच वेळी दुसरीकडे देवाला सारख्या ठिकाणी माणसांचा ओघ वाढतोय आणि त्याच वेगाने रोगही वाढताहेत हि विसंगती मन विषनणं  करत होती त्यात वर दिलेलेल्या चार रोगान पैकी प्रत्येक रोगाचे बरेच रोगी पाहून त्याच्या मानासिक्तेमाद्ध्ये काय साम्म्या आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील समीक भाग लिहून ठेवला. आणि त्या नंतर एक हौ तू हिल युअर लाईफ हे लुईस ल हे नावाच्या  बाईने लिहिलेले पुस्तक वाचनात आले. त्याने मी अत्यंत भारावून गेलो पुढच्या पिढीसाठी मला हे पुस्तक गीता दासबोध सर्व  काही  वाटले.  
हे ऐकून जरा विचित्र वाटेल पण हे असे का वाटले ते सांगतो आपण परमार्थाची कितीही बोंब आपण केली तरीही त्याचा प्रत्यक्ष परिणाम सामाजिकतेच्या दृष्टीने फारसा आशादायक नाही हे मानण्य करावेच लागेल. आणि स्वार्थ नाही तो परमार्थ हा सरळ सोत सत्य  नियम  विचारात घेतला तर एकीकडे  उत्सवाचे उधाण आणि त्याच बरोबर स्वर्थाचाही अतिरेक आणि त्याचे दुष्परिणाम प्रधान दिसतात. म्हणजे कुठे तरी चुकतंय हे नक्की. आपण आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो. एकूण एक संतांनी परमार्थाचा प्रचार केला. स्वतः गरीब राहून समाजाला माणुसकीचा धडा देणाऱ्या संतांना आजचा समाज सोन्याने माद्ध्वतो ह्या पेक्षा वेगळी सामाजिक विकृती कोणती?  आणि मन मात्र सतत धुमसलेले दिसते. तेच करणा आहे आज माणसां मद्ध्ये  उद्भवणाऱ्या अनन्वित रोगांचे. हे आता शास्त्र सिद्ध झालेले आहे होत आहे ह्यात वाद नाही.  धुम्सलेली मन हि  स्वार्थाची  प्रतीक आहेत. संतांच्या मठात अनेक वाऱ्या करूनही त्यांची मूर्तीवर सोन्याचे मुकुथ घालूनही आमची  म न शांत नाहीत उद्विग्नाच आहेत. मग उपाय काय ?????
मी ठरवल परमार्थ करा म्हणण्याच्या ऐवजी स्वार्थच बारा  असे सांगितले तर??  आणि तो स्वार्थ प्रामाणिकपणे साधला तर??  परमार्थ घडेल??? असे म्हटले तर ऐकायला कसे वाटेल ??????    विचित्र ????         पण खरे आहे. स्वार्थ तर सुटता सुटत नाही मग तो तरी नीट साधावा.
मला माझ्या शरीराचा मोह विलक्षण आहे. त्याला त्याचा अहंकार आहे. त्याला राग येतो. लोभी तर मी आहेच  आहे काम हा माझा स्थायी भाव आहे आणि हे सर्व लपविण्याचा मी काठोकाठ  प्रयत्न करतो म्हणजेच मी दांभिक सुद्धा आहे ह्या सर्व गुणांच्या रसायनातून माझ्यात अनेक रोगांचे मिश्रण तयार होत आहे त्याला कोण काय करणार????? आणि मी जे जे म्हणून काही करतो ते सर्व ह्या शरीरासाठी करतो. मग त्याल उत्तम ठेवणे चागलेच  नाही का???  
माझे शरीर आजारी पडते कारण माझे मन चुकीचे विचार करते जर ते योग्य विचार करेल तर माझे शरीर निकोप राहायला नक्की मदत होईल. आणि कोणाचे हि मन निकोप झाले म्हणजे काय होईल ?????? अधिक  स्पष्ट करायची गरजच नाही निकोप मन / प्रसन्न मन हेच सिद्धीचे सागर असे स्वतः संत तुकाराम महाराज म्हणाले आहेत. संतांचे वचने  एव्हढ्यासाठी महत्वाची ---- कारण ----  ती अनुभवसिद्ध  असतात  निस्पृह  आचरणातून आलेली असतात. म्हणून त्रिकाला बाधित सत्य असतात. म्हणजे आता हे तर नक्की ठरले मला सुदृढ राहायचे असेल तर मानाने निकोप राहिले पाहिजे निकोप मनच खर्या अर्थाने पारमार्थिक असते हे हि निर्विवाद आहे.

No comments:

Post a Comment