Friday, 2 September 2011

Puja Bhag 2 te 5

 भाग २ ---------------- ५ ओगस्ट 
कालचा विषय होता गणेशोत्सव त्याचा पहिला भाग झाला तो होता गणेशाच्या मूर्ती संबंधी आशय जी व्यक्ती परिस्थितीची पूर्ण जाणीव असूनही प्लास्टर च्या मूर्तीचा स्वीकार करते ती व्यक्ती मुर्तीभांजाक्तेला प्रोत्साहन देत असते.
आजचा विषयही उत्सवच आहे तो आहे उत्सव साजरा करण्या संबंधीचा विचार.

उत्सव - उत्साह सामुहिक साजरा करणे. आनंद साजरा करणे. सामान्न्तः आपण आपला आनंद आपल्या व्यक्तिगत यशात आपल्या नातेवाईक  निरनिराळ्या क्षेत्रातील मित्र यांचा समवेत साजरा करतो. पण त्याला आपलेपणाच्या मर्यादा असतात. त्या परिघाच्या बाहेर जाऊन माणूस ज्या वेळी उत्सव साजरा करतो त्यावेळी त्याची सामजिक जाणीव प्रकट होते. मी पणा कमी होते. कारण आपण मानत असलेला देव किंवा ईश्वर सर्वांचा असतो. म्हणून देवांचे उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे देवाची आठवण आपल्याला आनंदातहि  राहावी.  याला अशा ह्या दोन सामाजिक व धार्मिक बाजू आहेत. उत्सवाची निर्मिती वर सांगितलेल्या हेतूनेच होते पण मी मागे म्हटल्याप्रमाणे हेतू दस्त झाल्या कि त्याच्या रूढी होतात. आणि मी पणा जाण्या ऐवजी अहंकार वाढीला लागतो. याची उदाहरणे आपल्याला व्यवहारात सतत दिसत असतात. त्या सांगणे हे माझे उद्दिस्त नाही तरीही लक्ष्यात येण्यासाठी एकच सांगतो कोणत्याही देवस्थानी विशिष्ट लोंकांना पूजेचा प्रथम मान. म्हणजे मीपणा जाण्यासाठी परमार्थ करयचा त्याचाच मीपणा, अहंकार, मोठ्ठेपणा. मग देवाचे काय? त्याच प्रमाणे आज वेळ नाही ह्या सबबीवर उत्सवात आपण सर्व गोष्टी रेडीमेड आणतो. हि पण एक विसंगतीच आहे.

परमार्थ हा स्वतःच्या मनाच्या उत्क्रांतीसाठी केला जातो. पूजा हे त्याचे एक साधन आहे हे आपण सर्वच जाणतो. उत्सव साजरा करतांना आपल्या मनाला ईश्वराजवळ ठेवण्यासाठी काय करायला हवे? ह्या मानसिक विचारांचा उहापोह आज इथे करणार आहे. आपण ज्या वेळी एखाद्यासाठी कोणतीही गोष्ट करतो त्या वेळी ती गोष्ट करत असतांना त्या मागच्या कारणाचे स्पंदन माणसाच्या मनात सतत चालू असते हे प्रत्येक स्पंदन आपल्या मनाला त्याच्या जवळ ठेवते. मग त्याच्या आवडीची सजावट करणे. आवडीचा पदार्थ करणे. त्याच्याशी त्याच्या आवडीचे बोलणे. त्याचा आदर करणे, तो आल्यावर, त्याच्या आवडीच्या सर्व वस्तू त्याला अर्पण करणे. साधा आपल्या घरी आपल्या आवडीचा पाहुणा येणार असेल तर आपण हे सर्व जेव्हा स्वतः करतो त्या पर्त्येक वेळी आपण त्या प्रिया व्यक्तीचा विचार करत असतो. हा अनुभव प्रत्येकाला असतोच. उत्सवात ह्या प्रिय व्यक्तीच्या जागी परमेश्वर ठेवला कि झाले. हेच आपण रेडीमेड आणले तर आपले मन त्याच्या सांनिद्ध्यात राहणार नाही हे मात्र खरे मग उत्सवातील पारमार्थिक बाजू पूर्ण नष्ट होते. कार्यकर्त्यांचा कर्तृत्वाचा आव,  डोनेशनची स्पर्धा आपला मोठ्ठेपणा समाजात दाखवण्याची हौस ह्याच गोष्टींना प्राद्धान्य दिले जाते. त्याही वर जाऊन ऐच्छिक वर्गणी ऐवजी सक्तीची वर्गणी.

यंदाच्या वर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्यांची संख्या भरपूर होती पण त्या मानाने माया जमा झाली नाही हे तेथील  संस्थांचे  दुक्ख आहे  असे  पेपरला स्पष्ट आले होते. याचाच अर्थ आम्ही सर्वच देवाला धंद्याला लावतो, त्याच्या मूर्ती प्लास्तेरची  करतांना ती आपलीच  माणसे भंगतात याचा  विचार करतच नाही आणि इतरांनी एखादा वेगळा शब्द उच्चारला तर त्याचे  संपूर्ण  विचार विचारात न घेता गदारोळ करतो, हैदोस घालतो. आम्हीच आमच्या देवांची विटंबना करतो त्याचे काय. यात परमार्थ  कुठे  आहे.

परमार्थ हा मनाच्या उत्क्रांतीचा हेतू आहे धर्म हे त्याचे साधन आहे उत्सव हे त्याचे सामाजिक साधन आहे आणि सामुहिक साधनेचा उपयोग जास्त लवकर व चांगला होतो. पण ती साधना अहंकार सोडण्याची हवी. अहंकार सोडणे हे परमार्थाचे अंतिम आहे आणि ते सामाजिक दुही कमी होण्यास परस्पर मैत्री निर्माण होण्यास एकूनच मानवजातीतील क ल ह दूर होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून एव्हढीच विनंती आहे देवाला हॉटेलचा नैवेद्द्य दाखवू नका जेव्हढे करता येईल तेव्हढेच करा देव तुमचा पैसा बघत नाही आपलेपणा तपासतो एकदा पर्यटना तर करून पहा आपल्या सर्वांनाच तो खरोखरच प्रसन्न होईल ह्यात संशय नाही. शुभम भवतु.    
 

No comments:

Post a Comment