Friday, 2 September 2011

मर्म ------ पुनर्जन्म

मर्म ------ पुनर्जन्म
सदर विषय व्यापक आहे. अव्याक्तातेचा असल्याने तर्काने साम्जाव्ण्यासही कठीण आहे. समाजात कोणत्याही अव्यक्त विषयाबद्दल जे अनेक गैर समज निर्माण होतात किंबहुना केले जातात त्या प्रमाणे ह्या विषायामाद्ध्येही स्वाभाविकपणे आहेत. ते मुळात दूर केल्या  शिवाय विषयाला हात घालता येणार नाही. त्यासाठी कदाचित मोठ्ठ्या प्रस्तावनेची गरजही लागेल. तेव्हा हा विषय ३-४ किंवा त्याहूनही अधिक भागात सदर करावा लागेल.
हा विषय घ्यावा किंवा नाही ह्या विषयी माझ्या मनात होकार व नकाराची अनेक वेळा द्वंद निर्माण झाली. कारण मर्मज्ञ मद्ध्ये लिखाण करतांना मी एक पथ्य प्रामाणिकपणे पाळले आहे ते म्हणजे
जे व्यासांनी श्री गणपती गजाननास सांगितले ते. श्री व्यास मुनींना साधनापुर्तीनंतर जे ज्ञान स्फुरले ते एव्हढे प्रचंड व वेगाने स्फुरत होते कि ते लिहिणे कठीण होते. त्यावर त्या शक्तीकदुनच संदेश आले कि ते लिहू शकणारा एकाच जण आहे तो म्हणजे श्री गजानन. म्हणून व्यासांनी श्री गजाननाला प्रार्थना करून आवाहन केले व माझ्यासाठी लेखणीस म्हणून काम करशील का? असे विचारले-विनंती केली. त्यावर श्री गजानन फाणले करीन पण सांगतांना थांबायचे नाही. थांबलास तर मी लिहिणे कायमचे बंद करीन. त्या वर श्री व्यास मुनी म्हणाले

समजल्याशिवाय लिहायचे नाही. काबुल? या वर श्री गाजनान्नानी स्मितहास्य करून ते कार्य स्वीकारले.

अव्यक्त विषयांबद्दल अनेकदा जे गैर समज निर्माण होतात ते व्यक्तिगत असतात उदाहरणार्थ शकून, अपशकून, द्रिष्ट, वगैरे बाबतचे गैरसमज हे बर्याचदा विविध प्रकारचे व परस्परांची विसंगत असे असतात व्यक्तिगतरित्या पसरतात. पण ह्या विषय बाबतचे गैर समज बऱ्याच वेळा समाज्यातील भोंदुगिरी करणारे, स्वतःला साधू, संत, गुरु वगैरे भासवून लोकांकडून मोठ्ठ्या प्रमाणात पसरवित असतात. त्यात अर्थातच बर्याचवेळा ते पसर्विनार्यांचा स्वार्थ असतो. अश्या वेळी अशा गोंधळलेल्या समाजाला तार्किक पद्धतीने एखादा विषय समजावून सांगणे अधिक अवघड होऊन बसते. कोणत्याही माणसाचे दुषित पूर्वग्रह पुसून टाकणे हि अत्यंत कठीण गोष्ट आसते. म्हणून हा विषय एक एक विचार समग्र सांगत वर्णन करावा लागणार आहे.
मग हा विषय कसा हाताळायचा हा प्रश्न पडला. कार्य कारण भाव हे लिखाण करतांना असे लक्षात आले कि कार्या कारण सर्व काही हा विचार करतांना भूतकाळातील करणे शोधता शोधता असा एक क्षण येतो कि याच्या मागे काय? कारण??? कसे कळणार.  कारण आत्ताच्या जन्मापर्यंत ठीक तरीही प्रश्नंची उत्तर मिळत नाहीत. तेव्हा त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीचे कारण म्हणजेच ह्याच जन्माचेच मुळात कारण काय ते शोधणे. म्हणजे ह्या जन्माआधी काही असे माझ्या हातून घडले आहे कि त्याचा परिणाम म्हणून मी हा आजचा जन्म उपभोगतोय. म्हणून त्याचे कारण पूर्व जन्मात जावून शोधणे आवश्यक आहे. तिथे काही या जन्मीच्या पूर्व घटनांवरून न मिळालेल्या प्रश्नांची उकल होते. हे खरे आहे का?
हा विचार व्यक्त करतांना कृपया आध्यत्मिक लोक मी कोण आहे हे शोधा. हे प्रत्येक सद्गुरू आपल्याला आवर्जून सांगत असतात, तो अध्यात्मिक मी इथे अभिप्रेत नाहीये एव्हढे ध्यानात ठेवावे. इथे मागचा मी म्हणजे माझा आत्ताच्या आधीचा जन्मात मी कोण होतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे असे अभिप्रेत आहे. ह्याम्द्ध्ये कधी कधी एकापेक्षा जास्त जन्मांचा शोध घेऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. प्रसंगी ती मिळतातही. ती कळली कि मन शांत होते यालाच कार्य करणात लीन होते असे म्हणतात.
 

No comments:

Post a Comment