Friday, 2 September 2011

स्वतंत्र्यता --------------- दिन विशेष

स्वतंत्र्यता ---------------  दिन विशेष
स्वतंत्र्य्तेची ओढ माणसाला जन्मापासूनच आहे. आईच्या गर्भात पारतंत्र्यात असलेला जीव बाहेर येताच स्वातंत्र्य अनुभवतो पण त्याचीही सवय नसल्याने रडू लागतो विश्वाला घाबरतो. आणि हळू हळू पारतंत्र्याच्या आठवणी विसरतो. आणि दत्त म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्यातील पारतंत्र्याच्या आनंदात पुन्हा गुरफटून जातो. आईच्या गर्भात असतांना त्याला ते पारतंत्र्य वाटत नाही. तिथेही तो सुखावलेलाच असतो कि. कारण त्याला त्या अवस्थेत जे जे हवे आहे ते ते ईश्वर पुरवीत असतो. त्या पलीकडील विश्वाची त्याला जाणीवच नसते म्हणून तो त्याच त्या सुखाला चातावतो हि चटक म्हणजेच गुलामगिरी हि कल्पनाच त्याला नसते. म्हणजेच पारतंत्र्याची जाणीव जीवाला प्रथम स्वातंत्र्यात आल्यावर होते हा केव्हढा विरोधाभास आहे पण हे प्रत्येकाच्या जन्माचे सत्य आहे.
हे झाले माणसाचे पण संपूर्ण विश्व स्वातंत्र्यासाठी झटतेय. नवग्रह सूर्याच्या बंधनातून दूर जाऊ पाहताहेत. पृथ्वीचा अणुरेणु तिच्या माद्ध्यापासून दूर जातो आहे. याचाच परिणाम पृथ्वी फुगते आहे. हे वैज्ञानिक सत्य आहे. आणि आजच्या प्रगत विज्ञानाला हे मानण्य आहे. मोठाल्या आकाश गंगा तेजोमेघ सर्वांना हीच स्वातंत्र्याची ओढ आहे पण कोणीही पूर्ण मुक्त नाही म्हणूनच ओढ आहे मुक्ती झाली तर ओढ राहणारच नाही. म्हणजेच नकळत माणूस पारातान्त्र्यालाच धरून ठेवतो. एका मुक्तीसाठी धडपडतो त्यातून मुक्त होतो पण दुसऱ्या इछेच्या पारतंत्र्यात गुरफटून जातो. ते हि सहज, अलगद. ह्याचेच नाव संसार. सुखासाठी आधी स्वतःला बंधनात घालतो आणि मग त्यात गुर्फात्याला लागला कि मुक्तीचा ध्यास लागतो. हे चक्र चालूच राहत.
हे झाले माणसाच्या स्वातंत्र्याचे आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. कारण कधीतरी आपला देश पारतंत्र्यात होता. पण आपण पहिला आहे माणूस पारतंत्र्याला कधीच नाही म्हणत नाही तो गुलामगिरीला नकार देतो. पैसा हवा म्हणून नोकरी करतोच कि सर्वच जण धंदा करू शकत नाहीत आणि त्यात गैरही काही नाही पण त्या जर काही कारणाने त्याला गुलामासारखी वागणूक कळत नकळत मिळायला लागली कि मग तो त्या नोकरीतून बाहेर पडतो व दुसरी नोकरी पारतंत्र्य स्वखुशीने स्वीकारतो त्याही रमतो पुन्हा वाढीव भूक लागेपर्यंत. मग मी ह्यातून खरोखर मुक्त कसा होईन? जर मी माझ्या इच्छांना थोड्या मर्यादा घातल्या तरच. स्वतंत्र हे देहाचे असते मनाचे असते जातीचे असते समाजाचे असते देशाचे असते ह्या सर्वातून मुक्त होण्यासाठी आहे त्याच अवस्थेत माझ्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिक पणे पार पडणे म्हणजे खरी मुक्ती. अनुभवून बघा. आपले काम चोख करणे म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त स्वतः होणे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पैकी संत एकनाथ महाराज आणि संत गाडगे महाराज ह्यांची शिकवण आपण आचरणात आणली तर आज आपल्याला तरणोपाय आहे नाही तर निव्वळ भ्रस्ताचारा विरुद्ध आरडओरड करून काहीही होणार नाही हे त्रिवार सत्य आही आपल्या कडे लोक संतांची सेवा करतो असे म्हणतात. संतांची सेवा करणे म्हणजे त्यांचे विचार आचरणात आणणे होय. आज मी वर ह्याच दोन संतांचा उल्लेख केला कारण बाकीच्या संतांनी देवाची भक्ती सांगितली भक्तीला प्राधान्य दिले ह्या दोन संतांनी कर्मयोग समाजाला आचरून सांगितला नाथांना तर स्वतःच्या मुलाचा विरोध होता तरीही त्यांनी समाजकारण सोडले नाही. आपल काय होत आपल्याला समोरचा स्वच्छ हवाय.  कारण प्रत्येकजण दुसऱ्याला काहीतरी सुचवतोय. आणि माझ्या देशाचा झेंडा आणि   नकाशा अंगाखांद्यावर मिरवला कि स्वातंत्र्यदिन साजरा कसा होतो. मी माझ्या स्वतःच्या आर्थिक शारीरिक मानसिक स्वातंत्र्याचा मनोमन प्रयत्न केला तरच मी माझ्या देशाला स्वतंत्र ठेऊ शकेन. दुसर्यावर प्रेम करण्यापूर्वी प्रत्येकाला आधी स्वतःवर प्रेम करणेही शिकायला लागते. अनुभव घेऊन बघा. दुसर्याकडून स्वातंत्र्याच्या अपेक्षा करणे हा उन्माद आहे आणि स्वतःच्या मनाला दुष्ट विचारांच्या भोवर्यातून सोडवणे म्हणजे मनाची उन्मनी अवस्था आहे आज स्वातंत्र्य दिनी त्याचा शुभारंभ करूया आणि आजच्या स्वातंत्र्यातील भयाण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी समर्थ होऊया
ह्याच साठी आजवरचे लिखाण मी करत आलो आहे व पुढेही चलू ठेवीन आपल्या सर्वांना स्वतान्त्या दिनाच्या शुभेच्या  

 

No comments:

Post a Comment