Friday, 2 September 2011

भाग ३ -----------------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ आजारपणाच नको

भाग ३ -----------------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ आजारपणाच नको 
आत्तापर्यंत आपण ज्या विविध गोष्टी पहिल्या त्या वास्तव आहेत चमत्कार नाहीत. म्हणून आजारपण बरे होणे किंवा आजारपणाच  न होणे हे आपल्या हातात आहे. हे आपल्या लक्षात आले असेलच.
श्रीमती लुईस हे ह्या बाईंनी भीती, राग म्हणजे क्रोध, मद, मत्सर, आणि ह्या सर्वांवर प्रधान उपाय म्हणजे स्वतः सकट सर्वांवर प्रेम, परिस्थितीचा स्वीकार आणि निर्भयता ह्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, कामाबद्दल त्यांनी जे रोग सांगितले आहेत ते प्राधान्याने त्या त्या अवयावान्शीच निगडीत आहेत.
आपल्याकडे षड्रीपुंनाप्राधान्य दिले आहे. आपल्याला माहित आहेत १ काम २ क्रोध ३ लोभ ४ मोह ५ मद ६ मत्सर आणि त्याला जोड दंभ आणि भीती. वास्तविक ह्या सहा रिपून मद्ध्ये काम हि शक्ती आहे आणि बाकीच्या पाच वृत्ती आहेत. भीती हि पापाची म्हणजे वाईट विचारांची व सोबत आचारांची जननी आहे. दांभिकता रोगांवर पांघरून घालते पण शेवटी देहावर ते दिसतातच  किंबहुना मी जे निरीक्षण  केले त्यात  असे  लक्षात आले दाम्भिक्तेमुलेच रोग अधिक वेगाने वाढतात. आज ज्या चार रोगांचा उल्लेख मी मागे केला आहे त्या बाबतीत तरी  मला तसे  प्रामुख्याने जाणवले आहे. 
आज आपण एक वेगळाच दृष्टीकोन विचारात घेणार आहोत. सर्वसामान्णपणे माणूस आजारी पडला कि औषध घेतो. प्रामुख्याने अलिओपथिक. आपल्याला हे हि माहित आहे कि अन्तीबायोतीक्स हे विषासमान आहेत, नव्हे नव्हे विषच आहेत. औषधे घेऊन रोगांवर उपचार करणे म्हणजे शत्रू बरोबर लढाई करणे आहे आणि शत्रू एकदम समोर आला कि आपल्यालाही दुसरा इलाज नसतो तेही खरे आहे. पण लढाई करयचे म्हणजे दोन्हीबाजुचे सैनिक मरणारच म्हणजेच रोग्जान्तुन्बारोबारच आपल्या रक्तातील सैनिक पांढर्या पेशीही मरणारच. आणि आपले शरीर हे युद्ध भूमी म्हणजेच पर्यायाने त्याचे नुकसान होणारच होणार ते टाळणे अश्क्क्य. हे हि स्पष्ट आहे. त्या ऐवजी मी जर माझे शरीर सुधृढ बनविले तर???? हे सर्व नक्की टळू शकते. सुधृढ म्हणजे व्यायाम करून कमावलेले नव्हे आज तरुणानाच्यामाद्ध्ये स्वतःला सुंदर दिशाण्य्साठी सुडौल शरीराची गरज आहे अशी जाणीव झाल्यामुळे तरी बर्याच प्रमाणात व्यायामशाळा वाढलेल्या दिसतात. पण आयुर्वेदात वज्रदेही म्हणजे वज्रासारखा कठोर देह हे निरोगी ह्या अर्थी म्हटले आहे. तसे वज्रदेही होणे हे आपण प्रत्येकाने ठरवले तर????? शक्क्य आहे नाहीका??? आज पर्यंत ज्या विषयाचा उहापोह केला त्यावरून तरी आपल्याला ते नक्कीच जमेल.
आणि ते जमायला हवे असेल तर षड्रिपूंवर मात करायची असेल तर प्रेमाची जरूर आहे. आणि भीतीला दूर ठेवणे आवश्य आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे एकेक रिपू सोडणे कठीण तुम्ही मी पानच सोडा म्हणजे ज्याच्या आधारावर हे सर्वे वास करतात त्याचा आधारच गेला कि मग ते कुठे राहतील??? मी पानाच गेला षड्रिपू असून नसल्यासारखेच आहेत. षड्रिपू नाहीत म्हणजे शरीर निकोप आणि अहंकार नाही म्हणून परस्पर कलह, विद्रोह, त्वेष, तिरस्कार, दुरीत्व, एकटेपण, काही काही नाही. संत तुकारामांच्य भाषेत सांगायचे  झाले तर आनंदाचे डोही आनंद तरंग. हो आणि हे सर्व स्वार्थाने साधायचे कारण मला माझे शरीर वज्रदेही बनवायचे आहे. हे स्वप्न नाही प्रत्यक्ष शक्क्य आहे. तरच जर मला सुधरूढ व्हायचे असेल तर!!!!!!!!!!!! मनापासून विचार करून भाग सिरीअसली प्लीस
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे कि अन्सेल्फिश्नेस इस मोर पेइंग यु बट पिपल डोन्ट हेव पेशेंस तू प्रक्तीस इट बघूया प्रयत्न करून

No comments:

Post a Comment