Friday, 2 September 2011

षड्रिपू रोग

 षड्रिपू रोग
       
काम तो जाणावा विषयाचा ओघ आवेग तयाचा आवरेना
आवरतात्यासी उपजते प्रेम जैसे दुग्धामृत स्त्रीचे स्तन 1
 तुटता स्वामित्व उफाळतो क्रोध   वाताचे विकार कंप वात
आवरता त्यासी विश्व येई हाती जैसा अर्जुनाचा श्रीकृष्ण सारथी 2
 लोभ तो वाढावी हवेनाकोपणा हावची मनाची चौर्य कर्म
रक्तावरी दाब हृदयविकार सोडीताची लाभे दीर्घायुष्य 3
 मोह तो मोहवी दृश्यात जीवाला   विस्मृती आळस मधुमेह
सोडिता तयासी दुखः जाई लया   आनंदते मन जाणतेपणी 4
 मी पण मनाला दृढजरी करी आधार जो देई सर्व विकार
आधीभौतीकांच्या दहाला वेदना सोडिता निरसे वेदना संचित 5
 मत्सर तो करी अद्वैताचे द्वैत   पोखरी देहाला कर्क रोगे
त्यागिता तयासी प्रेम आणि मैत्री आनंदे संसार आणि जग 6
 दंभ हा पदर दिद्हातभर  झाकितो   मनाला उघडे शरीर
मानाविकाराला झाकितो परी जे      देहारोगे दावी जगाशी या 7

No comments:

Post a Comment