भाग ५ ------------------ ८ ओगस्ट
वास्तविक पूजा हे परमार्थाचा साधन आहे पण आज ते सामाजिक मोत्ठेपणा मिळवण्याचे आपले ऐश्वर्य जगाला दाखवण्याचे साधन झाले आहे.
पहिला उपचार ----- ध्यान---- ध्यान म्हटले कि आपल्याकडे काही अवास्तव कल्पना आहेत पण हे इतके कठीण नाही आपल्या पैकी बरेचजण ध्यानाचा अनुभव घेत असतात पण ते ध्यान आहे हेच आपल्याला माहित नसते. ध्यान म्हणजे एकाग्रता एकाग्रतेच्या पायार्यांपैकी एक पायरी अष्टांग योगामाद्ध्ये ह्याचे स्पष्ट उत्तर आहे धारणा ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगाच्या शेवटच्या तीन पायरया आहेत.----- त्या सर्व मनाच्या एकाग्रतेचे कालमापन आहे ===== सुमारे
१२ सेकंद एखाद्या गोष्टीवर आपले मन एकाग्र होणे म्हणजे एक धारणा ६ वी पायरी
१२ धारणा म्हणजेच १४४ सेकंद आपले मन एकग्र होणे म्हणजे एक ध्यान होय ७ वी पायरी
१२ ध्यान म्हणजेच १७२८ (२८.८ मिनिट) आपले मन एकाग्र होणे म्हणजे एक समाधी होय ८ वी पायरी
सर्वसामान्य माणूस जेव्हा आपले शिक्षण घेतांना मनापासून अभ्यास करतो तेव्हा त्या प्रत्येकाला आपल्या मनाच्या एकाग्रतेचा हा अनुभव येतच असतो. ह्याच परमार्थाच्या अभ्यासालाच आपण साधना म्हणतो इतकेच. ह्या वरूनच आपल्याला माणसाच्या यशापयशाचे रहस्य
कळेल. आपले मन जितके लवकर व अधिक काळ एकाग्र होईल तितके यश निश्चित. आपण पाहतोच कि सारखाच वेळ कित्येक वेळा जास्त वेळ अभ्यास करणाऱ्या मुलालाही कमी मार्क मिळतात कारण हेच कि तो जरी जास्त काळ वाचत बसला असेल तरी त्याचे मन तितके (इतस्ततः न जाता) अभ्यासात एकाग्र होत नाही. लौकीदृष्ट्या समाधी म्हटले म्हणजे काहीतरी अतर्क्य अनपेक्षित चमत्कार निर्माण करणारे वगैरे आपल्या डोळ्यासमोर येते. वास्तविक ते सर्वस्वी खरे नाही. हा हे मात्र खरे ह्या समाधीच्या ३-४ पायरया आहेत त्यातील सुरवातीच्या अगदीच कठीण नाहीत तरीही जोपर्यंत एखाद्याची तयारी होत नाही तो पर्यंत त्याला त्या समजू शकणारच नाहीत पुढच्या तर राज्यागाच्या फार वरच्या आहेत डोंगर चढतांना जसे सुरुवातीला चढाव कमी असतो पुढे पुढे तो वाढत जातो शेवटी सुळका घोर्पदिसाखा चढावा लागतो तसेच हे आहे तेव्हा त्या बाबत सर्व सामान्ण्यानी विचार करण्या सारखे नाही पण तीच क्रिया माणसाच्या देहात प्रेमाने घडू शकते इथे ईश्वरावरच्या प्रेमालाच आपण भक्ती म्हणतो. म्हणून भक्ती हि समान्न्या म्हणजेच मेजोरीटी साठी सोपी आहे ह्यात वाद नी
उद्या आपण पूजेचा पुढील भाग पाहणार आहोत.
No comments:
Post a Comment