Friday, 2 September 2011

आपले सण आणि उत्सव

आपले सण आणि उत्सव
मंगला गौर
हा एक पूजेबरोबरच  खेळला जाणारा सामाजिक खेळ आहे. पूर्वी मुलांची लग्न बालवयात ६-८ वर्षांची असतांनाही केली जायची. त्याचं खेळायचे वय असायचे. त्या काळी निस्शंशय पुरुष प्रधान संस्कृती होती. आज ती आपल्याला काही अंशी कमी झालेली दिसते. ज्या समाजात मुलींना शिक्षणाचे प्रमाण कमी त्या प्रमाणात ती अजूनही घट्ट पाळे मूळे धरून आहे.
जुन्या काळी मुलींना बाहेरचे जगच  नव्हते. त्यांचे वयही खेळण्याचे असायचे. त्यातून मंगळागौर खेळणे हि संकल्पना आली.व एकूणच मूर्तिपूजक संस्कृती असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या मागे काही देव देवतांच्या पूजेचे निमित्त केले जात असे.
लग्न झाल्यावर वयाखेरीज अनेक नाती जोडली जातात त्याबरोबर अनेक पोक्त प्रवृत्ती अंगी बाळगावया  लागतात. हे खर तर बालविवाह प्रकारामुळे मुलींवर समाजाने लादलेले अकाली पोक्त्मान असायचे. अश्या वेळी वर्ष्यातून एकदातरी त्यांच्या वयाच्या बागडण्याची मोकळीक मिळावी म्हणून हा सण आहे. आज मुलामुलींची लग्न त्यांना योग्य समज आल्यानंतर होतात. किंबहुना कधी कधी आर्थिक परिस्थितीमुळे त्याही पेक्षा उशिरा होतात. अशा वेळी वास्तविक ह्या सणाच्या सादरीकरणावर विचार करून वेगळ्या प्रकारचे सादरीकरण होण गरजेचे आहे. समस्त मुलूंनी ह्यावर विचार करून ह्या रूढीचे नुतानिकर्ण करावे.



नाग पंचमी
हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणांच्या मागे काही ना काहीतरी कार्य कारण भाव असतोच असतो. पण कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारण भाव नष्टं होतो तेव्हा त्यची रूढी होते. हि रूढी नेहमी समाजाला चुकीच्या दिशेने वाहवत नेते. कोणच्याही थोड्याश्याहि उपुक्त्तेबद्दल समारंभपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे व  कोणत्याही बाबतीत जराही कृतघ्न नसणे हा हिंदू धर्माचा पाया आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रमुख प्रकार म्हणजे पूजा करणे. याच भावनेतून नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात-
नाग हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कारण ते शेतातील उंदीर खातात त्यामुळे शेताचे सहज रक्षण होते. विस्ताविक उंदीर हे नागाचे खाणच आहे. हा त्याचा निसर्ग धर्म असूनही, कळत नकळत त्यांच्याकडून होणाऱ्या सहकार्याबाद्दळी कृतज्ञता व्यक्त करणे हा नागपंचमीच्या सानामाग्चा हेतू आहे. 

नारळी पौर्णिमा
मानवाचा देह पंचाम्हाभूतांचा बनलेला आसतो. त्या पंचाम्हाभूतांच्या शक्तीची जाणीव माणसाला असते. त्या जाणिवेमुळेच जो समुद्र दर वर्षीच आषाढ श्रावणात खवळतो त्याला प्रार्थना करून नम्रपणे शांत राहण्याची विनंती करण्याचा  सोहळा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा केला जातो.
माणसाने कितीही शोध लावले तरी तो त्या भौतिकाच्या शक्तीचे नियम बदलू शकत नाही. त्याचा योग्य तो उपयोग करूनच माणसाला पुढे जावे लागते. गुरुत्वाकर्षण भेदून जाणारे अग्निबाण निर्माण केले तरी गुरुत्वाकर्षण कायमच असते. अग्निबाण आपल्याला काही कालच पृथ्वीपासून दूर नेऊ शकतात. ह्या वास्तवाची जाणीव ठेउन माणसाने आपला नम्रपणा कधीही न सोडणे हा ह्या सानान्माग्चा मुख्य उद्देश आहे.


गोकुळाष्टमी
देवाच्या मुर्तीपुजेची संकल्पना फक्त हिंदू संस्कृतीतच आहे. त्याला व्यक्तिगत व सामाजिक दोनही अंगे आहेत. कोणत्याही देवांच्या पौराणिक कथेचा नीट अभ्यास केला तर असे लक्षात येईल कि प्रत्येक देवाने कधी आपल्या भक्ताला तर कधी आपल्या समाजाला कोणत्याना कोणत्या तरी मोठ्या संकटातून सोडविले आहे. मुक्त केले आहे. त्याचे पर्यवसान त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणजेच पूजा. ती तर प्रत्येक माणूस आपापल्यापरीने रोजच करत असतो.

कंसाच्या अन्यायी हुकुमाची परवा न करता त्याच्या एकतंत्री राज्यसत्तेला उखडून टाकण्यासाठीच श्री क्रीश्नांचा जन्म झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून जीजीया कारासारखा असणारा दहीदूध रुपी कर न भारता आधी घरातील अबल वृद्धांना पोटासाठी मिळाल्याशिवाय कोणीही कंसाकडे काहीही पाठवायचे नाही. हि स्पष्ट भूमिका श्री कृष्णाची होती ह्या भावनेतून शिंक्याला लावलेल्या हंडीतले दही दुध लोणी  हे सर्व बालगोपाळांसह आपण आधीच खावून टाकायचे. शिवाय गोपी दुध घेवून मथुरेला पोहोचवायला जातांना त्यांना अडवायचं हा त्याच कार्याचा एक भाग होता. अन्न्न्याय आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई त्यांनी जन्मापासूनच सुरु केली होती. त्याच साठी त्याचा जन्म होता. त्याची प्रत्येक चाल निर्णय हा बहुजना हितायाच होता. आपल्या रावांना मी विनाणती करेन कि आपल्या मानतील देवत्वाची संकल्पना बाजूला ठेवून आपण श्रीकृष्ण वाचा म्हणजे तुम्हाला आपण कसे वागायचे ते तात्काळ कळेल. किंबुना तो तसा वागला म्हणूनच आपण आज त्याला देव मानतो  आणि  प्रेमाने एकारान्त हाक मारतो. 

हे करतांना आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे त्या वेळी श्री कृष्ण  बाल्ल्यावस्थेत होते. त्यामुळे त्यांच्या ह्या कृतीकडे बाललीला म्हणूनच बघणे कंसालाही भागच होते. कारण इतक्या लहान मुलावर त्यांनी कारवाई करण्याची कल्पनाही केली असती तरी त्याच्या इतर राज्ज्यात छी थू झाली असती. त्याला ते परवडला नसत अर्थात कपटाने त्याने शक्य तेव्हढे सर्व प्रयत्न केले पण राजा म्हणून त्याला कोणतीच कारवाई करता आली नाही आणि कर अर्थात तो जाचक होता म्हणून बुडवला जाणे हे सहन करण्याखेरीच गत्यंतरच नव्हते. 

आपल्या आदर व्यक्त करण्याचं प्रकारत आपण पूजा करतो त्याच प्रमाणे प्रतीकात्मक घटना साजरी करून आपल्या आदरणीय व्यक्तींबद्दल आपले प्रेम व्यक्त करतो. याचीच प्रतीकात्मक कृती म्हणजे दहीहंडी हा सण आहे. पण हा सण साजरा करतांना आज मात्र जी कृती श्री कृष्णांनी सत्तेचे विकेंद्रीकर्ण करण्यासाठी केली त्याच्या नेमके उलट तीच कृती आपल्या समाजात सत्तेच्या केंद्रीकार्नासाठी केली जात आहे. समाजात परस्पर प्रेमभाव उत्पन्न करण्या ऐवजी अवास्तव स्पर्धा लाऊन ईर्षेला खतपाणी घातले जात आहे. ह्या विकृती पासून सर्वांनीच  विशेषतः तरुणांनी संपूर्ण पणे दूर राहिले पाहिजे तरच खरी दहीहंडी साजरी होईल. खरी दहीहंडी आपल्या सभोवताली अश्या प्रकारची हुकुम शाही चालत असेल तर त्याला तोंड देण्याची क्षमता असणे हीच खरी दहीहंडी आहे. आज तर तरुणांसमोर प्रच्न्नड आव्हान आहे. आणि त्याला शांत पणे विचार पूर्वक सामोरे जाणे आवश्यक आहे.
आजची परिस्थिती कंसाच्या काला पेक्षा वेगळी नाही पण आज शत्रू नेमका कोण ह्या बाबतीत प्रचंड द्विधा अवस्था आहे. आणि प्रत्येक जण लाटेवर स्वर होऊन वाहत जातो आहे पोहत नाहीये हा काळजीचा भाग आहे. त्या श्रीक्रीश्नाकडे एकाच मागणी मागतो आजच्या तरुणांना कंस कोण ते कळूदे. श्रीक्रीश्णारपनावस्तू . शुभम भवतु.



 

No comments:

Post a Comment